स्पर्धा परिक्षेची तयारी करताय, मग या गोष्टी टाळा:: भाग 4
© स्पर्धा परिक्षेची तयारी करताय, मग या गोष्टी टाळा:: भाग 4 आता झालेली पूर्वपरीक्षा व त्यामध्ये cutoff खूप जास्त जाईल अशी चर्चा. मग थोडेफार कमी मार्क्स पडलेल्या लोकांना पुढे काय करावे ते सुचतच नाही. तेंव्हा त्यांच्याकडून पुढे सांगितलेली चूक होऊ शकते. ते टाळण्यासाठी मार्गदर्शन करणारा हा लेख. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना टाळायच्या गोष्टी संदर्भातील लेखमालेतील चौथा लेख. 4. परीक्षेच्या एका टप्प्यावर अयशस्वी झाल्यावर फक्त त्याच टप्प्यावर लक्ष केंद्रित करणे:- स्पर्धा परीक्षेच्या प्रक्रियेत अपयश येणे हे अतिशय साहजिक आहे. अपयश ही यशाची पायरी आहे हे वाक्य स्पर्धा परीक्षेच्या प्रवासाला तंतोतंत लागू पडते. त्यामुळे अपयश पचवणे आणि त्यातून यशाचा मार्ग बनवणे हे या प्रक्रियेचा एक अविभाज्य आणि अतिशय महत्वाचा असा भाग आहे. परंतु बऱ्याचदा या प्रक्रियेत एका टप्प्यावर अपयश आले की विद्यार्थी त्याच टप्यावर सगळे लक्ष केंद्रित करतात आणि मग परीक्षेच्या इतर टप्प्यांवर आपोआप दुर्लक्ष ...