Posts

Showing posts from June, 2018

कबुली जबाब

Image
                    कबुली जबाब             (Sketch credit- Amol Bhosale, DSLR) पाऊस पण आता तुझ्याकडेच पडला माझ्याकडे येणारा ढग दारातच अडला त्यालाही भीती वाटली असेल, माझ्यासारखं चार भिंतीत अडकला तर? की बघवली नसेल माझी असहाय्यता, पावसात मनाचा माझ्या बांध फुटला तर? वाट तर मीही पहात होतोच की, पण कोणाची- पावसाची की तिची? पाऊस येणार, पाठोपाठ तिची आठवण वैतागला असेल का यावेळी पाऊस पण? पावसाशिवायपण आठवण आलीच की बेभान गतीच्या कोरड्या वावटळीसारखी "तुझ्याकडे पाठवतेय रे पाऊस", स्वतःवरच्या अजून एका कवितेचा मोह तिचा. पावसाबरोबर तिलाही मीच आठवतो, उघड उघड कबुली जबाब तिचा.             - अमोल मांडवे(ACP/DYSP)©

10वी 12वी नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करावी का?

Image
10वी 12वी नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करावी का?                         १०वी आणि १२वी चे निकाल नुकतेच लागले आणि पुढे काय हा प्रश्न विद्यार्थ्यांना आणि त्याहून जास्त त्यांच्या पालकांना पडला. बऱ्याच जणांचे फोन आले. या सगळ्यात एक खटकणारा प्रश्न विचारला जात होता. "माझ्या मुलाला/मुलीला स्पर्धा परीक्षा करायची आहे मग कोणत्या शाखेला प्रवेश घेणे योग्य राहील?" "स्पर्धापरिक्षेसाठी आत्तापासून काय तयारी करावी लागेल?" खरे तर या गोष्टी ज्याच्या त्याने ठरवायच्या. पण याबाबतीतील गोष्टींबाबत माझी काही मते आहेत, त्यांचा केलेला हा उहापोह. विद्यार्थ्यांची स्वतः निर्णय घेण्यास असमर्थता:          सर्वात अगोदर लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे १०वी १२वी च्या फार कमी मुलांना आपल्या भविष्याचा निर्णय घेण्याइतके ज्ञान किंवा अनुभव असतो. त्यामुळे यावेळचे निर्णय बऱ्याचदा पालकांनी घेतलेले किंवा ऐकीव गोष्टींवरून घेतलेले असतात. त्यामुळे पुढे जाऊन विद्यार्थ्यांमध्ये वेगळी आवड निर्माण होऊ शकते. अशावेळी अपुऱ्या माहितीवर अगोदर घेतलेले निर्णय अडचणी निर्माण करू शकतात. अशावेळी सर्व क्षेत्रातील स्पर्धेमुळे

जगावेगळी माणसं- विजय चौधरी(ट्रिपल महाराष्ट्र केसरी)... १. बाळाचे पाय..गदालोटचा पहिला डाव

Image
जगावेगळी माणसं- विजय चौधरी(ट्रिपल महाराष्ट्र केसरी)          १. बाळाचे पाय..... गदालोटचा पहिला डाव                                     अस्लम काझी. नावातच दरारा. ते कमी का काय म्हणून असतानाच आडदांड पैलवान आणि तरीपण वाऱ्यासारखा चपळ. पंचानं हातात हात दिला आणि पंच मागं सरला. तसा अस्लम लक्खकण खाली वाकला आणि दोन मुठी भरून माती पुढच्या पैलवानाच्या खांद्यावर आन पाठीवर टाकली. पुढं कोण होता? पोरकट दिसणारा, दाढी वाढवलेला, सहा फूट उंचीचा देखणा पण कवळा पैलवान. गांगरलेल्या पुढच्या पैलवानानं पण अस्लम काझीनं केलं तेच करायचं म्हणून मुठी भरल्या. माती अंगावर पडल्यावर काझी न असं गदागदा सगळं धूड हालवलं ना. माती काय चिटकल अंगाला. ह्यो तर माती अंगाला लागून दिना, ह्यो काय पाठ लागू देणार मातीला? बोटात बोटं फसली, ताकद आजमावायला सुरुवात झाली. समोरचं पोरगं बघून अस्लम चांगलाच चेकाळला. डोळ्याच्या एका कोपऱ्यातन त्यानं गदेवर आणि गर्दीवर नजर फिरवली. आणि दुसऱ्या सेकंदाला डावा हात गर्रदिशी फिरून पुढच्या पैलवानाच्या उजव्या कानावर बसला. सनक डोक्यात गेली आणि कान बधिर झाले. बरंच झालं, नाहीतर मैदानातल्या प्रेक्