प्रतिभेचा अथांग महासागर : शांताबाई
प्रतिभेचा अथांग महासागर : शांताबाई सिध्देश्वर मंदिर : राजगुरुनगर शांताबाईंबद्दल मला अथांग आदरभाव आहे आणि अपार कौतुक आहे. एका माणसाच्या ठायी एवढी प्रतिभा कशी असू शकते हाच विचार शांताबाईंचा विषय निघाला की प्रत्येक वेळी माझ्या मनात येतो. मी पुस्तके वाचतो, पण मी एक अजाण वाचक आहे. एखाद्या पदार्थाच्या चवीची फक्त जिभेला जेवढी जाणीव असते तेवढीच वर वर माझी वाचन आवड आहे. त्यामुळे एखाद्या प्रसिद्ध पुस्तकाचा लेखक मला माहिती असेल असे नाही आणि असला तरी आठवेल असे नाही. किंवा एखादे अगदी लोकांच्या मनामनात असणारे आणि माझ्याही घडी घडी जिभेवर येणारे एखादे गाणे कोणाचे असेल वगैरे असा विचार मला फारसा येत नाही. असंच एकदा वसईतील यात्रेतील बुकफेअर मधून मी "निवडक शांता शेळके" हा कवितासंग्रह घेतला होता. मी जेव्हा तो वाचायला घेतला तेव्हा त्यातील बहुतेक प्रत्येक गीत वाचताना "अरे हे एवढे प्रसिद्ध गाणे शां...