पंख पावसाळी

                              पंख पावसाळी



असं म्हणतात की सुख क्षणिक असते आणि दुःख अनंतकाळाचे असते. असेलही तसेच. पण आजूबाजूला असणारे हे आनंदाचे क्षण जरी वेचायला शिकलो तरी आनंतकाळच्या दुःखाचा विसर पडतो. हे क्षण इतके वेचावे की की त्यांची क्षणिकता जाऊन एक शृंखला तयार व्हावी. तशाच काही क्षणांना शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न.



पंख पावसाळी


रात्रीच्या प्रहरी

निखळता तारा

क्षणाची सोबत

आसमंती शहारा


निळ्या-तप्त नभी

शुभ्र एक मेघ

हाय रे! दिलासा

सावलीची रेघ


उभ्या पावसात

कोसळती वीज

डोळे पाणीदार

कातर-काळीज


अंतर क्षणाचे

कळी होते फुल

क्षण असा यावा

नी पडावी भूल


जातील गळुनी

पंख पावसाळी

शेवटाचे जरी

उड्डाण आभाळी

         - अमोल मांडवे




Comments

  1. खूप सुंदर रचना आहे सर

    ReplyDelete
  2. खूप सूंदर कविता सर जी

    ReplyDelete
  3. Khupch chan😊

    ReplyDelete
  4. 👌🏾👌🏾

    ReplyDelete
  5. अप्रतिम

    ReplyDelete
  6. Very nice thought sir,

    ReplyDelete
  7. No words to say, khup sundar 👍🏻

    ReplyDelete
  8. Khup chan sir Sundar

    ReplyDelete
  9. फार अप्रतिम सिर

    ReplyDelete
  10. अमोल तळेकर1:53 pm, August 27, 2023

    फार अप्रतिम सर..

    ReplyDelete
  11. 👌👌👌

    ReplyDelete
  12. फारच सुंदर सर

    ReplyDelete
  13. मंसतच सर

    ReplyDelete
  14. Mayuresh Gaikwad6:43 pm, August 27, 2023

    मस्तच ...

    ReplyDelete
  15. अप्रतिम कविता...💐💐

    ReplyDelete
  16. वाह! अतिशय सुंदर पद्धतीने, मोजक्या शब्दांमध्ये आयुष्यात येणार्‍या क्षणिक सुखाची शृंखला मांडली आहे सर. प्रत्येक कडव्यात येणारे उदाहरण संपूर्ण दृष्यच डोळ्यापुढे उभे करते..तुटणारा तारा, पांढरा शुभ्र मेघ, कोसळणारी वीज, उमलणारी कळी आणि सरतेशेवटी गळून पडणारे पंख पावसाळी! आयुष्यातील अनेक गोष्टी या क्षणिक असून सरणार्या आहेत. या गोष्टीची एक सुंदर माला आठवणीत तिचा सुगंध बहरत ठेवते यात शंकाच नाही... आपण मात्र हे निसर्ग सौंदर्य साठवून ठेवण्यास कमी पडतो. आपल्या या कवितेने पुन्हा एकदा या पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य डोळ्यात भरून ठेवायला सुचवले हे नक्की. अप्रतिम काव्यासाठी धन्यवाद सर... आणि पुढील लिखाणासाठी शुभेच्छा!

    ReplyDelete
  17. अप्रतिम रचना अमोल 👌👌👌

    ReplyDelete
  18. सुंदर निसर्ग कविता.. खूप छान सर

    ReplyDelete
  19. Your poetry mesmerized me. You have a great flow in words. A perfect choices of words and you pour your all feelings in it. Keep writing ✍️

    ReplyDelete
  20. Khupach cchan sir

    ReplyDelete
  21. अप्रतिम सर

    ReplyDelete
  22. kosalti vij... dole panidar... waah sundar kavita Sir.

    ReplyDelete
  23. आधी तर तुमच्या वाटाड्या या शब्दाबद्दल असणाऱ्या भावना आणि त्या स्पष्ट करणारे शब्द यांचे कौतुक करतो.
            पंख पावसाळी..., आयुष्य जगत असताना घडणाऱ्या घटना, येणारे प्रसंग, भेटणाऱ्या व्यक्ती आणि सुख दुःख यांची सांगड घालून मार्गक्रमण करावे लागते. या सर्व गोष्टींचा सार आपल्या कवितेतून व्यक्त होतो. हे सगळे मांडताना शब्दांची अचूक निवड, यमक जुळणी, आणि लयबद्ध उतरण ही फार प्रेमाने जपली आहे आपण. निखळता तारा, आसमंती शहारा, शुभ्र एक मेघ,सावलीची रेघ वाह किती अप्रतिम वाचतच राहावे आणि सारी अनुभूती घ्यावी असच वाटत राहते.
    कळीचे फुल होतांना ते क्षणाचे अंतर आणि ती पडणारी भुल. नक्कीच या कवितेने खूप वेळ घेतला असेल आणि तो सत्कारणी लागला. आमच्या सारख्या वाचकांना एक उत्कृष्ट कविता वाचनात भेटली. अप्रतिम भावना व्यक्त करणारे आणि विचार करायला लागणारे शब्द.... अझहर.....

    ReplyDelete
  24. वाह ! अप्रतिम रचना...👌👌👌

    ReplyDelete
  25. मनाला भावणारे शब्द... सुंदर 👌👌

    ReplyDelete
  26. Khup sundar 👌🏻

    ReplyDelete
  27. Apritam rachna sir 👌🏻

    ReplyDelete
  28. Apritam rachna sir 👌🏻

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला