Posts

स्पर्धा परिक्षेची तयारी करताय, मग या गोष्टी टाळा: भाग 3

स्पर्धा परिक्षेची तयारी करताय, मग या गोष्टी टाळा:  भाग 3          स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यात प्रत्यक्षात यशस्वी होणाऱ्यांची संख्या पाहता 1000 जणांत 1 जण यशस्वी होतो. यशाची आणि अपयशाची कारणे व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असतात परंतु काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या आणि यशाचा मध्ये अडथळा निर्माण करू शकतील किंवा आपले यश लांबवू शकतील. म्हणून स्पर्धा परीक्षेची तयारी करताना काही गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. तशा काही गोष्टींचा हा उहापोह करण्यासाठी एक नवीन लेखांची मालिका लिहित आहे.            त्या मालिकेतील हा तिसरा लेख. राज्यसेवेच्या जाहिरातीत यावर्षी असलेल्या कमी जागा, न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असल्याने काही गोष्टींबाबतची अनिश्चितता या एकूण पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे अभ्यासावरून लक्ष विचलित होण्याची शक्यता असते. प्रचंड स्पर्धेच्या क्षेत्रात असे थोडेसे Diversion खूप नुकसानकारक ठरू शकतो म्हणून अशा गोष्टींबाबतचा हा लेख. 3. जे आपल्या नियंत्रणात नाही त्या गोष्टींचा खूप विचार करत बसणे. ...

स्पर्धा परिक्षेची तयारी करताय, मग या गोष्टी टाळा: भाग 2

Image
स्पर्धा परिक्षेची तयारी करताय, मग या गोष्टी टाळा:  भाग 2          स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यात प्रत्यक्षात यशस्वी होणाऱ्यांची संख्या पाहता 1000 जणांत 1 जण यशस्वी होतो. यशाची आणि अपयशाची कारणे व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असतात परंतु काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या आणि यशाचा मध्ये अडथळा निर्माण करू शकतील किंवा आपले यश लांबवू शकतील. म्हणून स्पर्धा परीक्षेची तयारी करताना काही गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. तशा काही गोष्टींचा हा उहापोह करण्यासाठी एक नवीन लेखांची मालिका लिहित आहे.            त्या मालिकेतला हा दुसरा लेख. राज्यसेवेची मुख्यपरीक्षा समोर असताना विद्यार्थ्यांचे 100% लक्ष अभ्यासावर असले पाहिजे. तसेच सकारात्मकता या टप्प्यावर खूप महत्वाची आहे. त्यादृष्टीने अभ्यासाच्या प्रक्रियेतील काही गोष्टींवर टाकलेला हा प्रकाशझोत. 2. Negative बोलणे, आपण कसा कमी अभ्यास करतो हे लोकांना पटवून देत बसणे:-           'तुम्ही जसा विचार करता तसे बनता' असे गांधीजी म्हणाले होते....

माझिया प्रियाला

Image
माझिया प्रियाला,         सुरुवात कशाने करावी ठरवताना अडखळलो म्हणून हा पत्राचा अट्टाहास, पण सुरुवात कुठून करावी हा ही गहन प्रश्नच. एरवी एवढा नसतो अडखळलो पण तुझ्याबाबतीत उगीचच विचार कंप पावतात.         तुला काय वाटेल हे माहिती नसताना पत्र लिहितोय आणि त्यात पुन्हा तुझ्या नावापुढं 'माझिया' वापरतोय, रागावू नकोस. शब्द कदाचित चुकतील, पण तू भावना समजून घे. त्रयस्थाच्या नजरेने सुरुवातीला पूर्ण पत्र वाचून काढ. कदाचित स्वतः म्हणून वाचायला गेलीस तर विचारांचा गोंधळ उडेल आणि कदाचित पूर्ण पत्रावर तुझं लक्षच नाही राहणार. इतक्या सुचनांबद्दल परत रागावू नकोस कारण पुढचं सगळं खूप नाजूक आहे. प्रत्येक शब्द जिवाच्या मोलाचा आहे, आत्ता फक्त माझ्या आणि काही वेळानंतर कदाचित तुझ्याही.  sketch credit to dearest friend Amol Bhosale(DSLR)          सरळच सांगायचं तर, 'माझं प्रत्येक स्वप्न तुझ्याभोवती गुंफलय, माझा प्रत्येक श्वास तुझ्या श्वासात घुटमळतोय. माझ्या प्रत्येक पावलाचा ठसा तुझ्या हळुवार पावलांना अलगद उचलायला आसुसलेला आहे. तुझी स्व...

स्पर्धा परिक्षेची तयारी करताय, मग या गोष्टी टाळा : भाग 1

स्पर्धा परिक्षेची तयारी करताय, मग या गोष्टी टाळा: भाग 1          स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यात प्रत्यक्षात यशस्वी होणाऱ्यांची संख्या पाहता 1000 जणांत 1 जण यशस्वी होतो. यशाची आणि अपयशाची कारणे व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असतात परंतु काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या आणि यशाचा मध्ये अडथळा निर्माण करू शकतील किंवा आपले यश लांबवू शकतील. म्हणून स्पर्धा परीक्षेची तयारी करताना काही गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. तशा काही गोष्टींचा हा उहापोह करण्यासाठी एक नवीन लेखांची मालिका लिहित आहे.           या लेखांच्या मालिकेतला हा पहिला लेख. असे एका लेखामध्ये एक किंवा दोन गोष्टींवर चर्चा होईल. नजीकच्या काळात परीक्षेचा कोणता टप्पा जवळ आहे त्यानुसार या बाबींचा क्रम ठरविला आहे. मुख्य परीक्षेचा अपेक्षित असलेला निकाल व मुलाखतीची तयारी अशा वेळीची विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन लिहिलेला लेख. 1. मुख्यपरिक्षेच्या Key नुसार येणाऱ्या मार्कांवरून पोस्ट मिळणार की नाही, कोणती मिळू शकते याची गणिते मांडत बसणे-     ...

पहिला पाऊस, पहिलं प्रेम आणि पहिला स्पर्श

Image
           पहिला पाऊस, पहिलं प्रेम आणि पहिला स्पर्श.                                   (प्रास्ताविक: प्रस्तुत लेखामध्ये दोन कथांचे समांतर सादरीकरण केले आहे. एकी मध्ये जमिनीला ढगाबद्दल वाटणारी ओढ, तर दुसरीमध्ये मुलाचे एका मुलीवरील प्रेम दाखवले आहे. जमिनीच्या आणि मुलाच्या, दोघांच्या भावनांतील सारखेपणा दाखवण्यासाठी, दोघांकरिता एकाच अर्थाची दोन वेगवेगळी वाक्ये वापरली आहेत. 'ती' हे जमिनीसाठी आणि 'तो' हे मुलासाठी वापरले आहे.)         'ती' झाडांच्या वाळक्या आणि गळक्या पानांचा आश्रय घेत होती, आणि 'तो' पेन आणि कागदाचा.          'ति'ला ग्रीष्माच्या दाहकतेची पर्वा नव्हती, पण 'ति'ला त्या ढगाचा विरह सहन होत नव्हता. 'ती' त्याच्याकडे आशाळभूत नजरेने याचना करीत होती, काही थेंबांची. पण तो त्याच्या असंख्य थेंबरूपी नेत्रातून फक्त अहंकारी कटाक्ष टाकत होता, 'ति'च्याकडे. त्याच्याजवळच्या असंख्य थेंबापैकी काही 'ति'ला हवे होते, कारण...

तू घरी नव्हतास म्हणून.....

Image
              तू घरी नव्हतास म्हणून......                Sketch credit: Amol Bhosale(DSLR) तू घरी नव्हतास म्हणून                     मग भिजले पावसात अंगांगावरून ओघळणारा                     तुझा स्पर्श आठवत ओठांवरच्या थेंबांना                     तुझ्या ओठांची सर नाही पण ओठांवरून मानेवर मात्र                     पाऊस तुझ्यासारखाच उतरतो थंडगार पावसात वाऱ्याची                      झुळूकही उष्ण जाणवते खांद्यांवर विसवणाऱ्या                       तुझ्या फुलत्या श्वासांसारखी भिजल्या मातीच्या गंधाला                       तुझ्या गंधाची सर नाही ...

जायचं का परत खेड्याकडे?

                    जायचं का परत खेड्याकडे? दोन्ही जावई आज टीव्ही वर झळकले पण सासऱ्यांच्या जीव मात्र नखात आला. एकीकडं एका जावयाने कांद्याचं विक्रमी उत्पन्न काढलं म्हणून सरकारकडून बक्षीस मिळालं तर दुसरा जावई एल्फिन्स्टन ला झालेल्या चेंगराचेंगरीतून जेमतेम वाचला. पोरीनं बसून खावं म्हणून तिला मुंबईला कामाला असलेला मुलगा पहिला. दुसरीला मात्र नाईलाजास्तव एका शेतकऱ्याला दिली ते पण तिला काम करावं लागणार नाही या बोलीवर.            पहिली जिला सुखात राहावी म्हणून मुंबईत दिली तिचं काही नवऱ्याच्या पगारात भागेना. पगार चांगला होता आणि वेळच्या वेळी वाढत पण होता पण महागाई काय जवळ येऊ देत नव्हती. नवरा 6 ची ट्रेन पकडतो म्हणून हिची धावपळ 5 पासूनच. धावपळ करूनदेखील काही ताजे नव्हतेच मिळत खायला. गटारावरच्याच भाज्या. पगारात भागत नाय म्हणून मग शिवण मशीन. त्यात पण जास्त पैसे मिळेनात म्हणून मग आणखी असले छोटे मोठे उद्योग करत बस. नवरा काय 9 वाजेपर्यंत पोचायचा नाही रात्री. पोचल्यावर लोकलच्या गर्दीचा सगळा राग बायको आणि पोरांवर. घरात ...

अनोळखी वाटेवर अनामिक व्यक्तीवर अव्यक्त प्रेम

Image
अनोळखी वाटेवर अनामिक व्यक्तीवर अव्यक्त प्रेम               तुला काय वाटेल या भीतीने                        माझं वाटणं विरून गेलं पाझर फुटण्याआधीच डोळ्यातलं                        पाणी झरून गेलं 'अनोळखी पणाच्या' ग्रहनाने                        चंद्र झोकाळून टाकला 'अनामिक पणाच्या' अंतराने                        बंधही जाळून टाकला अंधाराच्या गर्दीत माझं मंद                        टिमटीमनं मुरून गेलं कालांतराने पहाट झालीही,                         पण चांदणं सरून गेलं... आपल्या तारा जुळण्याआधी तुझे सुत जुळाले आपले बोलणे होण्याआधी गीत तुझे वळाले मला 'मी' नीटसा कळण्याआधी तुला प्रेम कळा...

"लवकर सेटल व्हायचंय?" मग नक्की वाचा.

Image
           "लवकर सेटल व्हायचंय?" मग नक्की वाचा.             [Sketch credit goes to a dear friend, Amol Bhosale(DSLR), who has amazing command over lines and he can put life into anything. Will always be grateful.☺]           दिवसेंदिवस मागे सरकून 'विमानतळाला' जागा करून देणाऱ्या 'केशसंभारा'वरून हात फिरवताना सहजच वृत्तपत्रातील त्या जाहिरातीवर लक्ष गेलं, "'well settle' असलेला मुलगा पाहिजे." लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या रणकुंडात उडी घेतली असल्याने तसा 'सेटल' होण्याशी अजून विशेष संबंध आला नव्हता. पण 'सेटल' होणे म्हणजे नक्की काय? या प्रश्नाने मात्र तेंव्हापासून अगदी पिच्छाच पुरवला.          माझे तेंव्हा engineering कॉलेजला admission झाले तेंव्हा शेजारचे काका म्हणाले होते, 'अरे या कॉलेज ला प्रवेश मिळाला म्हणजे तू आता सेटल झालास असेच समज.' म्हणजे 'कॉलेज ला प्रवेश मिळणे' हे सेटल होण्याचे पहिले परिमाण. टाटा मोटर्स ची नोकरी लागली तेंव्हा बरेच जण म्हणाले, 'एवढ्या नामांकि...

MPSC राज्यसेवा मुलाखतीची तयारी: भाग 2

         MPSC राज्यसेवा मुलाखतीची तयारी: भाग 2 मुलाखत हा राज्यसेवेच्या प्रवासातील तिसरा आणि निर्णायक टप्पा. Mains च्या score ने तुम्ही final list मध्ये येणार की नाही हे ठरते तर तुमचा rank कोणता राहणार हे interview ने ठरते. फक्त interview मुळे post मिळालेली अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे जरी फक्त 100 मार्क्स साठी असला तरी interview अतिशय महत्वाचा आहे. संभाव्य चुका:          Mains पास होउनदेखील काही विद्यार्थी मुलाखतीचा म्हणावा तेवढा चांगला अभ्यास करत नाहीत किंवा त्याकडे थोडे दुर्लक्ष करतात याची दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे cutoff च्या खूप जवळ मार्क्स असणे आणि दुसरे म्हणजे cutoff पेक्षा खूप जास्त मार्क्स असणे.           ज्यांचे मार्क्स cutoff च्या जवळ असतात ते असा ग्रह करून घेतात की margin कमी असल्यामुळे आपल्याला पोस्ट मिळणार नाही. मग अभ्यास कशाला करायचा. मग अभ्यास नसल्याने आपसूकच मार्क्स कमी येतात. ज्याचें मार्क्स cutoff पेक्षा खूप जास्त असतात त्यांना आपल्याला कोणती ना कोणती post मिळणारच असं वाटून ...

राज्यसेवा मुलाखतीची तयारी::भाग 1

                राज्यसेवा मुलाखतीची तयारी::भाग 1 MPSC राज्यसेवा MAINS ची ANSWER KEY आल्यामुळे बऱ्याच लोकांना मुलाखतीचे वेध लागले असतील. बरेच जण कसे प्रश्न विचारले जातात याबद्दल चौकशी करतात. म्हणून माझी आणि माझ्या काही अधिकारी मित्रांच्या INTERVIEW TRANSCRIPT इथे SHARE करत आहे. तसेच PROFILE मधील एखाद्या घटकाबद्दल कसे प्रश्न विचारू शकतील यासाठी एका घटकावर काढलेले काही प्रश्न देखील टाकतोय.  Nilam Bafna(DC) 1. 10 वी चे मार्क्स 2. 12 वी चे मार्क्स 3. Degree कुठून केली? कधी passout झाला? 4. Job पण केला का? कुठे? 5. Hobby काय आहे? 6. Extra curricular activities? 7. तुम्ही mechanical engineering केलंय तर Newton's first law of motion सांगा 8. 2nd, 3rd law सांगा 9. तिन्ही laws चे practical example सांगा 10.  3rd law चे example तुम्ही सांगितले पण याच संदर्भाने गांधीजींचे एक वाक्य माहिती आहे का? ते याला contradict करत नाही का? 11. What is satyagraha/Passive resistance? 12. सध्या Medical termination of pregnancy ...

तुझ्यावरचा राग

Image
                  तुझ्यावरचा राग         (Sketch Credit - Amol Bhosale, DSLR) कधी कधी सकाळीच तुझा प्रचंड राग येतो वागण्याचा विचित्र तुझ्या जीवघेणा त्रास होतो एखादेदिवाशी अचानक वेड्यासारखी वागतेस ऐकायचंच नाही कुणाचं ठरवूनच टाकतेस जेवढं समजवावं तेवढा पारा चढतो शहाणपणाच्या गोष्टींनी तिढा आणखी वाढतो तुझी आदळआपट आणि माझी चिडचिड माझी आरडाओरड आणि तुझी धुसमुस मी नाष्ता न करता तसाच तडक निघतो तुझ्या ताटातला नाश्ताही ताटातंच निवतो माझा राग तो गाडीच्या दारांवर निघतो तुझा मात्र माडीच्या पायऱ्यांवर सजतो नकोशी सकाळ जाते सरून तुझ्या चुका आठवत बांध तुझाही फुटतो तू कधीचा आलेली साठवत आतड्याला पीळ पडला कि मग येते आठवण तुझी 'हॉटेलात खाऊ' ची हौस पहिल्या घासात भागते माझी तेंव्हा मला जाण होते तुझ्या अगतिकतेची कळ उठते काळजात माझ्या अहंपणाची काय हवं असतं तिला? कधीतरी तिच्या हातच्या चवीची स्तुती कधी तिने उधळून टाकलेल्या प्रेमाची नुसती पोचपावती "दमली असशील" म्हणून नकळत पुढे झालेला पाण्याचा ग्लास वॉशिंग मशीन चं चा...

तिच्या घराचा ओटा: भाग 2

Image
                     तिच्या घराचा ओटा: भाग 2                        (Thank you Amol Bhosale(DSLR) for such a wonderful sketch. You make the article worth it.)         ओट्यावर झोपून होतो. आजूबाजूला पाडलेला वाळक्या पानांचा सडा दूर करावा एवढाही उत्साह नव्हता. सहा महिने बंद असलेल 'तिच्या' घराचं दार आजही बंद होतं. मातीत दिसणाऱ्या खुणांवरून कळत होतं की घर आता रिकामं नाही. साप, विंचू , पाली यांचा वावर असणार. एके दिवशी अगदी उशालाच चांगली तीन फूट कातण सापडली. पण बरंय, एकट असण्यापेक्षा सोबत बरी. सोडून जाणाऱ्या माणसांपेक्षा न मागता साथ देणारे प्राणी काय वाईट. आणि असाही मी तक्रार करण्यापलीकडे गेलो होतो.      दाढी वाढली होती, करायला वेळ नव्हता असं नाही. स्वतःच्याच दुःखाच्या तिव्रतेची स्वतःलाच जाणीव करून देण्याचा केविलवाणा प्रयत्न. रात्री जे लोक पाहायचे ते वेडाच म्हणायचे.  सुरुवातीला काही वेळा तर एका आजीबाईने जेवण आणून दिलं. हळू हळू कळल...

MPSC राज्यसेवा CSAT ची तयारी कशी करावी

      MPSC राज्यसेवा CSAT ची तयारी कशी करावी             मागच्या लेखात prelim च्या अभ्यासाचा overall आढावा घेऊन झाल्यावर आता CSAT च्या पेपर चे महत्व आणि त्यात जास्तीत जास्त मार्क्स कसे पाडता येतील, हे जसं मला समजलं तसं मांडायचा हा एक प्रयत्न. CSAT पेपर चे महत्व:-          एप्रिल 2017 मध्ये झालेल्या राज्यसेवा prelim चा cutoff अनपेक्षित रित्या वाढून 189 वर गेला. पण यात खूप आश्चर्य चकित होऊन चालणार नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांनी CSAT ला 130-150 दरम्यान मार्क मिळवले. त्यामुळे एकूण 200 चा टप्पा पार करणे त्यांना अवघड गेले नाही.           Prelim हि 400 मार्कांची असते. त्यात GS आणि CSAT दोन्हींना प्रत्येकी 200 गुण असतात. परंतु आपल्यापैकी किती जण जेवढा वेळ GS च्या तयारीला देतात तेवढाच CSAT ला देतात?? कोणीही नाही.           पाच पाच महिने prelim च्या GS चा अभ्यास करणारे विद्यार्थी CSAT कसेबसे 2 महिने करतात आणि तेही रोज एखादा तास. परीक्षा जवळ आली कि करू म्हणून C...

तिच्या घराचा ओटा: भाग 1

Image
                      तिच्या घराचा ओटा: भाग 1                           (Sketch Credit - Amol Bhosale, DSLR)         आयुष्याची नवीन सुरूवात करत होतो. नवीन सुरूवात नविन घरात करायची असच दोघांनी ठरवलेलं. घर अगदी तिला हवं तसं बनवत होतो. समोर मोठा ओटा हवा होता तिला-संध्याकाळी बसायला आणि मुलांना खेळायला.  बसून राहिली होती दिवसभर ओटा बांधून होईपर्यंत. नुसता सूचनांचा भडीमार. गवंडी वैतागले होते तिला अक्षरशः. म्हणायची देवघर छोटं पण प्रसन्न असावं. मोठी परसबाग लावली तिने तिच्या हातानेच. सगळ्यांची नजर चुकवून यायची ती झाडे लावायला. मोगरा आणि निशिगंध तिच्या विशेष आवडीचा. मला मोठी झाडे आवडतात म्हणून तीही लावली तिने चारी कोपर्यावर. आणि त्यांच्या बाजूने बाकीची फुलझाडे. म्हणायची तुझ्या झाडाशेजारी माझी रोपटी कशी भराभर वाढतील आणि फुलतिल.           सगळ्या परसबागेत तिच्याच पावलांचे ठसे उमटले होते. मी कधी गेलो तरी ते पुसले जाणार नाही याच...

डंख

                         डंख तुझीच म्हणत म्हणत दुसऱ्याची होताना ढगाआड लपत लपत चंद्र पाताळी जाताना तुझ्या पावलांचे ठसे उरतातच भल्या पहाटेच्या मंद चांदण्यासारखे तुझ्या प्रेमळ आश्वासनांचा खच पडलेला दिव्याभोवती मरून पडलेल्या चिलटांसारखा तुझ्या पोकळ काळजीचा शब्दसडा विस्कटलेला वादळाने उधळलेल्या वाळक्या कस्पटांसारखा                    तुझ्या आठवणींचा व्रण उरतोच                    अश्वत्थामाच्या भळभळत्या जखमेसारखा तुझ्या गोड हाकांचा गहिवर झालेला गाईपासून तुटलेल्या वासराच्या हंबरड्यासारखा तुझ्या हळव्या स्पर्शाचा ओरखडा झालेला काट्यांमध्ये अडकून फाटलेल्या पदरासारखा                    तुझ्यावरच्या मायेचा अंश राहतोच                    दगडाखाली गारव्याला बसलेल्या विंचवासारखा       ...

"राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तयारी कशी करावी"

Image
MPSC चे यावर्षीचे वेळापत्रक आल्याने आणि पूर्वपरीक्षा फेब्रूवारी महिन्यात असल्याने बऱ्याच लोकांचा मोर्चा परत prelim च्या अभ्यासाकडे वळाला असेल. तसेच prelim 4 महिन्यावर आली असल्याने पहिल्या attempt वाल्यांना तयारी बाबत अनेक प्रश्न पडत असतील तर त्यावर काही उत्तरे जशी मला माझ्या स्पर्धापरिक्षा प्रवासात समजली तशी देत आहे. Prelim चा अभ्यास कधी सुरु करावा?                ज्यांनी अगोदर Mains दिली आहे किंवा mains चा पूर्ण अभ्यास केला आहे त्यांच्यासाठी 3 महिने हा कालावधी prelim साठी पुरेसा आहे. परंतु ज्यांना अगोदर prelim मध्ये अपयश आलेले आहे त्यांनी आणि पहिला attempt असलेल्यांनी 4-5 महिन्याचा कालावधी राखून ठेवावा. कारण prelim पास न झाल्यास mains च्या अभ्यासाचा कसलाही फायदा नाही. म्हणून किती अभ्यास लागणार आहे त्याचा अंदाज नसेल तर लवकर सुरु करणे कधीही उत्तम. प्रत्येकाला स्वतःच्या वाचनाच्या गतीनुसार आणि अगोदर च्या अभ्यासाच्या अंदाजावर किती कालावधी लागणार हे ठरवावे लागेल. कोणत्या पेपर ला जास्त महत्व द्यावे?             ...