MPSC राज्यसेवा मुलाखतीची तयारी: भाग 2

         MPSC राज्यसेवा मुलाखतीची तयारी: भाग 2

मुलाखत हा राज्यसेवेच्या प्रवासातील तिसरा आणि निर्णायक टप्पा. Mains च्या score ने तुम्ही final list मध्ये येणार की नाही हे ठरते तर तुमचा rank कोणता राहणार हे interview ने ठरते. फक्त interview मुळे post मिळालेली अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे जरी फक्त 100 मार्क्स साठी असला तरी interview अतिशय महत्वाचा आहे.

संभाव्य चुका:
         Mains पास होउनदेखील काही विद्यार्थी मुलाखतीचा म्हणावा तेवढा चांगला अभ्यास करत नाहीत किंवा त्याकडे थोडे दुर्लक्ष करतात याची दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे cutoff च्या खूप जवळ मार्क्स असणे आणि दुसरे म्हणजे cutoff पेक्षा खूप जास्त मार्क्स असणे.
          ज्यांचे मार्क्स cutoff च्या जवळ असतात ते असा ग्रह करून घेतात की margin कमी असल्यामुळे आपल्याला पोस्ट मिळणार नाही. मग अभ्यास कशाला करायचा. मग अभ्यास नसल्याने आपसूकच मार्क्स कमी येतात. ज्याचें मार्क्स cutoff पेक्षा खूप जास्त असतात त्यांना आपल्याला कोणती ना कोणती post मिळणारच असं वाटून  complacency येण्याची शक्यता असते. त्यामुळे नकळत अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. Cutoff पेक्षा फक्त 2 मार्क्स जास्त असूनही class 1 पोस्ट मिळालेले माझे काही मित्र आहेत आणि Mains ला one of the highest मार्क्स असूनही पोस्ट न मिळालेली देखील काही उदाहरणे आहेत. त्यामुळे मार्क्स वरून पूर्वग्रह करून न घेता अभ्यास केलेला चांगला.
         आणखी एक महत्वाची चूक म्हणजे over analysis करून आणि अवाजवी भीतीपोटी गरजेपेक्षा जास्त आणि जसा अभ्यास लागतो त्यापेक्षा वेगळाच अभ्यास करणे. MPSC profile मध्ये माहिती भरताना चूका करणे आणि interview वेळी देखील त्या न सुधारणे, यामुळेही मुलाखतीवर वाईट परिणाम होतो. कधीकधी Profile मधील एखादा section पूर्णपणे दुर्लक्षित केला जातो आणि नेमका त्यावर प्रश्न आला की आपण गडबडून जातो. म्हणून असे करणे जाणीवपूर्वक टाळावे.

मुलाखतीच्या अभ्यासाला कधी सुरुवात करावी?
      पूर्णवेळ मुलाखतीचा अभ्यास करणार असेल तर 2 महिने पुरेसे आहेत. अर्धवेळ करणार असेल तर एखादा महिना आणखी वाढेल. Interview ला जास्त नव्हे तर नेमक्या अभ्यासाची गरज असते. साधारणपणे जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात मुलाखती सुरु होतात. त्यामुळे 1 नोव्हेंबर पासून अर्धवेळ अभ्यास सुरु करता येईल. Interview चे timetable आल्यानंतर पूर्णवेळ अभ्यास केला तरी चालेल.

अभ्यास कशाचा, किती आणि कसा करावा?
          स्वतःचे नाव आणि गाव यासंबंधी प्रश्न विचाराने गेल्या काही वर्षात बंद केले असले तरी त्याबाबत वाजवी तयारी करून ठेवावी. आपल्या गावाच्या, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या, देशाच्या 3 प्रमुख समस्या कोणत्या याबाबत विचार करून त्या समस्या लिहून काढाव्यात. तसेच त्या समस्या कशा सोडवाव्यात हे पण प्रत्येकी 3 मुद्यात लिहून काढावे. या प्रकारच्या प्रश्नात general उत्तरे न देता त्या भागाविषयी specific उत्तरे द्यावीत. उदा. शेतमालाला भाव न मिळणे असे न म्हणता xyz तालुक्यात पिकणाऱ्या बटाटा या पिकास योग्य भाव मिळत नाही असे म्हणणे जास्त परिणामकारक ठरेल.
         त्यानंतर दुसरा महत्वाचा भाग म्हणजे Graduation. तुमच्या ज्या शाखेत आणि विषयात graduation झालेले असेल त्याबद्दल तुम्हाला वाजवी माहिती असणे अपेक्षित आहे. बऱ्याचदा interview चा एक तृतियांश वेळ हा या प्रश्नांना दिला जातो. Degree च्या सर्व अभ्यासक्रमाचा अभ्यास करणे फक्त interview साठी शक्य होत नाही. अशावेळी त्या विषयाच्या एकदम मूलभूत संकल्पना आणि त्या विषयाशी निगडित चालू घडामोडी मधील बाबी आणि त्या विषयाशी निगडित रोजच्या वापरातील बाबी यांचा तरी अभ्यास करून ठेवावा. उदा. जर तुम्ही Electronics Engineering केलं असेल तर diode, transistor, AM, FM, OS, convertor, processor अशा संकल्पना विचारल्या तर सांगता याव्यात. तसेच सध्या चर्चेत असणारे व रोजच्या वापरात असणारे 3G, 4G, LCD, LED, satellite technology, electric vehicles, degree चा project इत्यादी गोष्टी बद्दल माहिती करून घ्यावी. खूप खोलात जाऊन Degree चा अभ्यास करण्यात वेळ घालवू नये परंतु मूलभूत संकल्पना माहिती असाव्यातच.
         त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे जर अगोदर चा कामाचा अनुभव असेल तर त्याबद्दल. यात जर अगोदर सरकारी नोकरी केली असेल तर प्रश्न आणखी वाढतात. याचा अभ्यास करताना तुमच्या कामाचे स्वरूप, त्या organisation मध्ये तुमचे स्थान आणि Role, त्या संस्थेची रचना आणि कार्ये, त्यातून तुम्हाला आलेले बरे वाईट अनुभव आणि त्यातून तुम्ही काय शिकला इत्यादी गोष्टींवर विचार करून ठेवावा. त्याचबरोबर Job संबंधी technical गोष्टींचा देखील आढावा घेऊन ठेवावा.
        Degree नंतर दुसरा महत्वाचा घटक म्हणजे Profile. MPSC चा फॉर्म भरताना आपण आपले hobbies, achievements, awards तसेच education, co-curricular activities टाकतो. त्यावर देखील प्रश्न विचारले जातात. त्यावर खूप खोलात जायची गरज नसते परंतु जे लिहिलंय ते आपण खरोखर केलंय हे तरी panel ला कळावे इतपत माहिती आवश्यक आहे. त्यामुळे एखादी गोष्ट केली नसेल परंतु profile मध्ये लिहिली असेल तर ती अभ्यासावी लागेल. उदा. वाचन छंद असेल तर आवडता लेखक, आवडते पुस्तक, इतर पुस्तकांची व लेखकांची नावे, साहित्याचे प्रकार, ते का आवडतं, वाचून फायदा काय, प्रशासनात उपयोग आहे का वगैरे प्रश्न विचारले जाऊ शकतात.
          आणि आता शेवटचा पण सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे चालू घडामोडी. कधी कधी पूर्ण interview पण फक्त चालू घडामोडींवर होऊ शकतो त्यामुळे हा विषय व्यवस्थित करणे भागच आहे. त्यातही interview च्या आठवड्यात चर्चेत असलेले विषय विचारण्याची शक्यता खूप जास्त असते. चालू घडामोडी मध्ये त्या बाबींबाबत आपल्या मतांना खूप जास्त महत्व असते. त्यामुळे प्रत्येक विषयाचा सर्व बाजूनी विचार करून अगोदरच आपले मत बनवून ठेवावे. यासाठी वर्तनमानपत्रातील संपादकीय लेख उपयोगी पडतात. यासाठी कोणतेही एक वर्तमानपत्र पुरेसे आहे आणि त्याच्या जोडीला काही ठराविक issues वर magazines किंवा websites वर येणारे लेख वाचणे फायदेशीर ठरू शकते.
          वरील विषयव्यतिरिक्त बऱ्याचदा mains च्या अभ्यासक्रमातील Polity, इतिहास, भूगोल या विषयांवर देखील प्रश्न विचारले जातात तेंव्हा त्याचीही उजळणी केलेली बरी.

Facts वर भर द्यायचा की opinion?
          राज्यसेवा मुलाखतीमध्ये बऱ्याचदा facts विचारले जातात परंतु opinion ला देखील तेवढेच महत्व असते. मागील वर्षी factual पेक्षा analysis वर जास्त भर असणारे प्रश्न विचारले गेले. हे लक्षात घेता आपल्या मुलाखतीत संभाव्य सगळ्या गोष्टींचा अनेक बाजूंनी विचार करून ठेवणे योग्य. तसेच या सगळ्या बाबींबाबत मते तयार करून ठेवलेली असावीत. एकवेळ factual question नाही आला तर फारसा फरक पडत नाही पण आपल्याशी निगडित गोष्टींबद्दल मत तयार नसणे negative impact करू शकते. त्यामुळे त्यावर भर द्यावा. उदा. शेतकरी आत्महत्येचा आकडा सांगता नाही आला तरी त्याची कारणे, परिणाम आणि उपाय सांगता यायला हवेतच.

Group Study आणि mock interviews:-
         कमी वेळ, अनेक मुद्दे, तसेच प्रश्न व प्रतिप्रश्न हे सगळे विचारात घेता फक्त वाचण्यापेक्षा group study फायदेशीर ठरतो. यामुळे विषयाचे वेगवेगळे पैलू तसेच त्याबाबतची मते माहिती पडतात व स्वतःचे मत तयार करायला मदत होते.
           मुलाखतीपूर्वी सराव म्हणून 2-3 mock interview दिलेले चालू शकेल. त्यामुळे आपल्या चुका समजून त्या सुधारता येतात. तसेच मुलाखतीच्या वातावरणाची सवय होते, भीती मोडते, आत्मविश्वास वाढतो, आपली उत्तरे मांडण्याची शैली सुधारता येते. पण यापेक्षा जास्त mock दिल्यास आपल्या शैली मध्ये rigidity येऊन आपल्या बोलण्यातील सहजता निघून जाऊन कृत्रिमपणा येतो. याबरोबर group मध्ये एकमेकांचे mock interview घेणेही खूप फायद्याचे ठरते आणि बाहेरच्या mocks पेक्षा त्यात बराच वेळ वाचतो.

Last but not the least:-
       Interview is not a test of your knowledge, it is the test of your being. Interview मध्ये तुम्हाला काय माहिती आहे याबरोबरच तुम्ही कशा प्रकारच्या व्यक्ती आहात हेही तपासले जाते. तुमचा आत्मविश्वास, सदसद्विवेकबुद्धी, निर्णय क्षमता, निर्धारिपणा अशा अनेक निकषांवर तुमची परीक्षा होते. एखादे उत्तर येत नसेल तर किती सकारात्मकरित्या तुम्ही ते panel ला सांगता तसेच त्याने गडबडून जात नाही यासारख्या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. Panel ने pressure टाकले तरी तुम्ही किती स्थितप्रज्ञ राहता हे हि पाहीले जाते. त्यामुळे होता होईल एवढी प्रामाणिक उत्तरे द्यावीत आणि त्यासाठी तेवढाच प्रामाणीक अभ्यास करावा लागेल.
         याचबरोबर तुमचा आवाज मोठा आणि स्पष्ट हवा त्यातून आत्मविश्वास आणि clarity दिसून येते. तुमच्या चालण्यात आणि बोलण्यात संयम आणि कारारीपणा दिसणे आवश्यक आहे. Panel बरोबर eyecontact आणि लागेल तिथे smile आलीच पाहिजे.
          Interview ला तुम्ही काय नाही सांगितलं याचा काहीच फरक पडत नाही. फरक पडतो तो जे तुम्ही सांगितलंय ते कसं सांगितलंय याचा. तिथे तुमचे किती प्रश्न बरोबर आले आणि किती चुकले याचा हिशोब panel करत बसत नाहीत. तुम्हाला मिळणारे मार्क्स हे तुमच्याशी 15-20 मिनिटे बोलून panel ला एकूण काय वाटले याचा परिपाक असतो. म्हणून तेवढा तुम्ही जास्तीत जास्त pleasant आणि confident असण्याची गरज आहे.

         मला माझ्या 3 mpsc interviews चा जो अनुभव आला त्यातील काही share करण्याचा हा प्रयत्न. अजून काही प्रश्न असतील तर blog च्या comment section मध्ये लिहून पाठवा. जमेल तशी उत्तरे देण्याचा प्रयत्न करिन.
                              - अमोल मांडवे(पोलीस उपअधीक्षक)

Comments

  1. Shabas Amol !! Excellent write ups.... Very useful ! All the Best !!! Vivek, Savitatai

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला