बडबड(बायकोची)
बडबड(बायकोची)
(Sketch credit- Deepti Patwardhan, a friend with amazing skills with pencil and colours)
किती बोलतेस
अगदी कशावरूनही
कधीही आणि कुठेही
बऱ्याचदा उगाचच
पुष्कळदा नकळत
काहीवेळा असंबद्धही
घडाघडा बोलतेस
भडाभडा बोलतेस
तडातडा बोलतेस
लोकांशी बोलतेसच
वस्तूंशीही बोलतेस
वेड्यासारखी स्वतःशीही
आईसारखं बोलतेस
मुलीसारखं बोलतेस
बायकोसारखं तर बापरे
आनंदांत बडबड
दुःखात रडारड
सगळं कसं शब्दांत
उत्साहात तार स्वर
काळजीत कातर
भावनांचा पूर ओठांत
शब्दांचीच मिठी
शब्दांचीच आदळआपट
प्रणय तेवढा मुका
तुझ्या शब्दांच्या उन्हात
माझं जगणं बहरून येतं
तुझ्या एवढ्याश्या अबोल्यात
सारं जग अंधारून जातं
- अमोल मांडवे

Superb
ReplyDeleteKhup masta
ReplyDeleteमस्त 👍
ReplyDeleteSuperb 👍
ReplyDeleteछान सर👌
ReplyDeleteखुपच सुंदर 👏👏👌👌👌
ReplyDeleteKhup chan Amol sir👌🏻👌🏻
ReplyDeleteKhup sundar 👍🏻
ReplyDeleteकविता खूप सुंदर आणि प्रभावी आहे...बडबडीतून उमटणाऱ्या स्त्रीच्या असंख्य भावछटा, तिचं विविध रूपांतील अस्तित्व, तिचं नात्यांमध्ये मिसळलेलं बोलणं, हे सगळं फार सूक्ष्मपणे आणि जिवंतपणे मांडलेलं आहे. शेवटचे ओळीतला "अबोल्यात अंधारणं" हे तर फारच अस्वस्थ करतं... जणू तिचं बोलणं म्हणजेच आयुष्याचं उजेड आहे, आणि तिचं मौन म्हणजे पूर्ण निरुत्साह...!
ReplyDelete