आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला

सवयीच्या, comfort zone च्या, सोयीच्या, असंघर्षाच्या आपण एवढे आहारी जातो त्यातून होणारे नुकसान समोर दिसत असतानाही आपण त्यातून बाहेर पडण्यासाठी आजिबात हातपाय मारत नाही. मला ते "आपल्याच मरेकरऱ्यांच्या आसऱ्याला" जाण्यासारखं वाटतं.


आपल्याच  मारेकऱ्यांच्या आसऱ्याला


निधड्या माना नि उघड्या छात्या

म्यान केलेल्या तलवारी घेऊन

आपल्याच बुरुजात सुरुंग लावून

चाललो आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला


त्यांनीच सांडलेल्या आमच्या रक्ताने

त्यांच्याच पायांवर अभिषेक घालून

त्यांच्या टापांनी ठेचलेली प्राक्तने घेऊन

चाललो आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला


स्वत्वाचे मुडदे महत्वाकांक्षांच्या थारोळ्यात

अन गतप्राण स्वप्ने कर्तव्याच्या चितेवर सोडून

गलितगात्र जगण्याची भीक मागायला

चाललो आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला

                                -अमोल मांडवे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी