उन्हाळ्याची सुट्टी
उन्हाळ्याची सुट्टी (A Stroke of your pensil is worth a hundred words. Thank you Amol Bhosale Sarkar for such an apt sketch) गुरुजींनी परीक्षेची तारीख सांगितली अन कुठे कुठे आंब्याच्या झाडांना मोहर लागाय सुरुवात झाली की आमच्या डोक्यात उन्हाळ्याची सुट्टी सुरू व्हायची. मागच्या वर्षीच्या उन्हाळ्यात केलेल्या आणि करायला न भेटलेल्या गोष्टींचा हिशोब लावून मग यावर्षी काय काय करायचंय याची गणितं मांडणं सुरू व्हायचं. लपवून ठेवलेले गट्टयांचे डबे, पत्त्यांचे कॅट, रबरी बॉल सगळं जागेवर आहे ना याची घरच्यांची नजर चुकवून खात्री करणं सुरू व्हायचं. घरातल्या एकूण चर्चेवरून आणि पाहुण्याच्या येण्या जाण्यावरून घरात यावर्षी उन्हाळ्यात कुणाचं लग्न होणार याचा अंदाज लावून त्यात आपल्याला काय करायचंय ह्याचं planning आम्ही करू लागायचो. तसा भर फक्त खाण्याची किती चंगळ होणार आणि नवीन कपडे भेटणार यावरच असायचा. परीक्षा मानगुटीवर येऊन बसली असली तरी पोरापोरांच्यात चर्चा सुट्टीचीच असायची. एखादा मित्र परीक्षा झाल्यावर गावाला जाणार आहे म्हणला तर त्याला आम्ही कशी लय मज्जा करणार आहोत आणि तो