Posts

Showing posts from January, 2018

माझिया प्रियाला

Image
माझिया प्रियाला,         सुरुवात कशाने करावी ठरवताना अडखळलो म्हणून हा पत्राचा अट्टाहास, पण सुरुवात कुठून करावी हा ही गहन प्रश्नच. एरवी एवढा नसतो अडखळलो पण तुझ्याबाबतीत उगीचच विचार कंप पावतात.         तुला काय वाटेल हे माहिती नसताना पत्र लिहितोय आणि त्यात पुन्हा तुझ्या नावापुढं 'माझिया' वापरतोय, रागावू नकोस. शब्द कदाचित चुकतील, पण तू भावना समजून घे. त्रयस्थाच्या नजरेने सुरुवातीला पूर्ण पत्र वाचून काढ. कदाचित स्वतः म्हणून वाचायला गेलीस तर विचारांचा गोंधळ उडेल आणि कदाचित पूर्ण पत्रावर तुझं लक्षच नाही राहणार. इतक्या सुचनांबद्दल परत रागावू नकोस कारण पुढचं सगळं खूप नाजूक आहे. प्रत्येक शब्द जिवाच्या मोलाचा आहे, आत्ता फक्त माझ्या आणि काही वेळानंतर कदाचित तुझ्याही.  sketch credit to dearest friend Amol Bhosale(DSLR)          सरळच सांगायचं तर, 'माझं प्रत्येक स्वप्न तुझ्याभोवती गुंफलय, माझा प्रत्येक श्वास तुझ्या श्वासात घुटमळतोय. माझ्या प्रत्येक पावलाचा ठसा तुझ्या हळुवार पावलांना अलगद उचलायला आसुसलेला आहे. तुझी स्वप्ने पाहताना मला डोळे बंद करावे लागत नाहीत. तुझी आठवण याय

स्पर्धा परिक्षेची तयारी करताय, मग या गोष्टी टाळा : भाग 1

स्पर्धा परिक्षेची तयारी करताय, मग या गोष्टी टाळा: भाग 1          स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यात प्रत्यक्षात यशस्वी होणाऱ्यांची संख्या पाहता 1000 जणांत 1 जण यशस्वी होतो. यशाची आणि अपयशाची कारणे व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असतात परंतु काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या आणि यशाचा मध्ये अडथळा निर्माण करू शकतील किंवा आपले यश लांबवू शकतील. म्हणून स्पर्धा परीक्षेची तयारी करताना काही गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. तशा काही गोष्टींचा हा उहापोह करण्यासाठी एक नवीन लेखांची मालिका लिहित आहे.           या लेखांच्या मालिकेतला हा पहिला लेख. असे एका लेखामध्ये एक किंवा दोन गोष्टींवर चर्चा होईल. नजीकच्या काळात परीक्षेचा कोणता टप्पा जवळ आहे त्यानुसार या बाबींचा क्रम ठरविला आहे. मुख्य परीक्षेचा अपेक्षित असलेला निकाल व मुलाखतीची तयारी अशा वेळीची विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन लिहिलेला लेख. 1. मुख्यपरिक्षेच्या Key नुसार येणाऱ्या मार्कांवरून पोस्ट मिळणार की नाही, कोणती मिळू शकते याची गणिते मांडत बसणे-          मुख्य परीक्षा झाली की लगेच आयोगाची answer key येते आणि

पहिला पाऊस, पहिलं प्रेम आणि पहिला स्पर्श

Image
           पहिला पाऊस, पहिलं प्रेम आणि पहिला स्पर्श.                                   (प्रास्ताविक: प्रस्तुत लेखामध्ये दोन कथांचे समांतर सादरीकरण केले आहे. एकी मध्ये जमिनीला ढगाबद्दल वाटणारी ओढ, तर दुसरीमध्ये मुलाचे एका मुलीवरील प्रेम दाखवले आहे. जमिनीच्या आणि मुलाच्या, दोघांच्या भावनांतील सारखेपणा दाखवण्यासाठी, दोघांकरिता एकाच अर्थाची दोन वेगवेगळी वाक्ये वापरली आहेत. 'ती' हे जमिनीसाठी आणि 'तो' हे मुलासाठी वापरले आहे.)         'ती' झाडांच्या वाळक्या आणि गळक्या पानांचा आश्रय घेत होती, आणि 'तो' पेन आणि कागदाचा.          'ति'ला ग्रीष्माच्या दाहकतेची पर्वा नव्हती, पण 'ति'ला त्या ढगाचा विरह सहन होत नव्हता. 'ती' त्याच्याकडे आशाळभूत नजरेने याचना करीत होती, काही थेंबांची. पण तो त्याच्या असंख्य थेंबरूपी नेत्रातून फक्त अहंकारी कटाक्ष टाकत होता, 'ति'च्याकडे. त्याच्याजवळच्या असंख्य थेंबापैकी काही 'ति'ला हवे होते, कारण भाळली होती 'ती' त्याच्यावर. कित्येक दिवस तिष्ठत होती, त्याची वाट बघत. पण एवढाच तिटक