Posts

Showing posts from April, 2018

स्पर्धा परिक्षेची तयारी करताय, मग या गोष्टी टाळा:: भाग 4

© स्पर्धा परिक्षेची तयारी करताय, मग या गोष्टी टाळा:: भाग 4          आता झालेली पूर्वपरीक्षा व त्यामध्ये cutoff खूप जास्त जाईल अशी चर्चा. मग थोडेफार कमी मार्क्स पडलेल्या लोकांना पुढे काय करावे ते सुचतच नाही. तेंव्हा त्यांच्याकडून पुढे सांगितलेली चूक होऊ शकते. ते टाळण्यासाठी मार्गदर्शन करणारा हा लेख. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना टाळायच्या गोष्टी संदर्भातील लेखमालेतील चौथा लेख.       4. परीक्षेच्या एका टप्प्यावर अयशस्वी झाल्यावर फक्त त्याच टप्प्यावर लक्ष केंद्रित करणे:-          स्पर्धा परीक्षेच्या प्रक्रियेत अपयश येणे हे अतिशय साहजिक आहे. अपयश ही यशाची पायरी आहे हे वाक्य स्पर्धा परीक्षेच्या प्रवासाला तंतोतंत लागू पडते. त्यामुळे अपयश पचवणे आणि त्यातून यशाचा मार्ग बनवणे हे या प्रक्रियेचा एक अविभाज्य आणि अतिशय महत्वाचा असा भाग आहे.           परंतु बऱ्याचदा या प्रक्रियेत एका टप्प्यावर अपयश आले की विद्यार्थी त्याच टप्यावर सगळे लक्ष केंद्रित करतात आणि मग परीक्षेच्या इतर टप्प्यांवर आपोआप दुर्लक्ष होते. उदाहरणार्थ जर एक जण पूर्व परिक्षेतच उत्तीर्ण होत नसेल तर तो पुढची पूर्व परीक्षा येण

ऋतु

Image
ऋतु तसा प्रेमाचा कोणताही ऋतू नसतो तरी अवकाळी ढग आठवांना धुमारे आणतातच हवेतील गारवा वाढू लागला की तिच्या स्पर्शाची ऊब प्रकर्षाने आठवते नव्या पालवीची सळसळ ऐकून पैंजनाची किणकिण अजून ऐकू येते पहिल्या थेंबाबरोबर येणारा मातीचा गंध त्या गच्च मिठीच्या आठवणीत विरतो पावसासाठी झुरणारी रानपाखरं पाऊस आल्यावर पानांआड अंग चोरतात पळत येऊन मिठीत शिरणारी जणू ती स्पर्शाबरोबर लाजून आरक्त होणारी काळ्याभोर ढगांनी अंधारून येतं डोळे मिटून मग स्पर्शानेच पाहणं होतं  कोसळणाऱ्या आभाळाला न जुमानता  स्वप्नांचे इमले च्या इमले उभे राहतात पण कडाडणाऱ्या विजांची नजर लागतेच गारांबरोबर स्वप्नांचे इमलेही कोसळतात पाऊस संपता संपता गारवा संपतो उरते नुसती धग, कासावीस करणारी या पावसात जन्मलेली गवताची पाती अंकुरतात, फुलतात, टिकून राहतात तुझ्यामाझ्यातल्या अंतराला न जुमानता जिवंत असणाऱ्या आंतरिक ओढीसारखी           -©अमोल मांडवे(DYSP/ACP)