Posts

Showing posts from September, 2018

अंघोळीच्या पाण्याची चूल

Image
                      अंघोळीच्या पाण्याची चूल ( Sketch Credit:- To the dear friend with magical skills Amol Bhosale. Great pencil work🙏 )          घराबाहेर न्हाणीच्या भिताडाला लागूनच मातीनं लिपलेली विटांची चूल. पहाटे केंव्हातरी(अलार्म च्या दुनियेपासून लांब) दोन पावलं पेंडंची किटली घेऊन घराबाहेर पडायची आणि दुसरी दोन पावलं घराला वळसा घालून मागच्या दाराला जाऊन, खाली लाकडाची एक ढपली लाऊन त्यावर चिपाडं ठेऊन अंघोळीच्या पाण्याची चूल पेटवायची. आणि त्या उबीत हळू हळू घराला जाग यायची. पेटवताना चुलीवरचं भगुलं मोकळंच असायचं. त्या पावलांनी संसार सुरु केला तेंव्हा पण असाच मोकळा होता की. जाळ एकदा लागला की मग कळशीनं पाणी आणून आई ते भगुलं भरायची. पुढं तिनं असाच संसार पण भरून टाकला सुखानं, समृद्धीनं. पारूसं झाडून काढे पर्यंत आणि परसाकडं जाऊन येईपर्यंत पाणी तापायचं. अंघोळ केल्याशिवाय आईला दुसरं कुठलं काम करवत नसायचं. म्हणजे अंघोळीची चूल पेटल्याशिवाय भाकरीची चूल काय पेटायची नाय.             तिला अंघोळीला पाणी काढून आई दीदी साठी पाणी ठेवायची आणि जाळ घालून ठेवायची. त्यो घातलेला जाळ विझायच्या आत

GROUP DISCUSSION का आणि कसे करावे?

Image
       GROUP DISCUSSION का आणि कसे करावे.           स्पर्धा परीक्षा म्हणलं की प्रचंड अभ्यासक्रम आणि त्यात प्रत्येक विषयाची अनेक पुस्तके आलीच. त्यात एकामागून एक धडकणाऱ्या परीक्षा आणि त्यांचे विविध टप्पे म्हणलं की अभ्यास म्हणजे एक मोठी मोहीम ठरते. आणि ती एकदा फसत गेली की तीन चार वर्षे प्रयत्न करूनही पार पडत नाही. म्हणून अशा वेळी चांगले सोबती असतील तर वाट जरा सोप्पी होते. अभ्यास सुसह्य होतोच होतो पण तो परिणामकारक देखील होतो. अशा वेळी गट चर्चा(group discussion) अत्यंत उपयोगी पडते. Group Discussion का महत्वाचे आहे?         MPSC च्या सगळ्या परीक्षा objective झाल्या आहेत. त्यामुळे बऱ्याचदा factual गोष्टी, आकडेवारी, नावे या गोष्टींवर भर असतो. त्यातही बऱ्याच गोष्टी प्रथमदर्शनी एकसारख्या असतात. ऐन परीक्षेत नक्की कशात काय हेच कळत नाही आणि मग confidence जातो. सगळं वाचलंय असं वाटतं पण नक्की हेच का? किंवा मग हे याच्यातच आहे का? असे प्रश्न पडतात. उदाहरणार्थ, सामान्य ज्ञान पेपर-२  मध्ये काही विशेष कायदे अभ्यासाला आहेत त्यांची कलमे नक्की कोणती कोणाची हे लक्षात ठेवणे अवघड जाते. किंवा सामान