Posts

Showing posts from March, 2018

लेखणीग्रस्त

Image
    लेखणीग्रस्त जुन्या कवितांनी अलवार माझाच खून केला नव्या कवितेचा उमाळा आतच जळून गेला पहिल्या कवितेने प्रेमवीर केलं       दुसऱ्या कवितेने जणू सर्वस्व नेलं तिसऱ्यात तर झाली अब्रुची लक्तरे   पेन ठेवतो, हाती पांढरं निशाण आलं प्रत्येक कवितेला हवीच का नायिका?    दरवेळी मीच ती जगायला हवीय का? वाचणाऱ्याच्या एखाद्या शाबासकीसाठी    दरवेळी बळी मी जायलाच हवाय का? नागड्या चेहऱ्याने वावरलो आजवर, परि माझ्या अभिव्यक्तीचे मुखवटे जड जाहले कवितांच्या थारोळ्यात रक्तबंबाळ नि सुन्न मी ते रुधिरही काहींनी रंग म्हणूनी फासले कवितेचे कागद फाडून टाकले तरी ठिगळ कसं लागायचं चारित्र्याचं फुटलेलं आभाळ शब्दांनी कसं सांधायचं. माझ्यातले उरलेले "मी" पण लटकवावे फासावर की, माझ्यांनीच माझ्या "मी" चे गळे आवळलेलं पहायचं.                          -अमोल मांडवे(DYSP/ACP)

CSAT प्रत्यक्ष पेपरच्या 2 तासांचे नियोजन

Image
            CSAT प्रत्यक्ष पेपरच्या 2 तासांचे नियोजन                           अगदी 100% विद्यार्थी मन लाऊन अभ्यास करत नसले तरी 70-80% तरी अगदी मन लाऊन अभ्यास करतात. सगळा syllabus पूर्ण करतात, अगदी काही लोकांची तर पुस्तकं च्या पुस्तकं पाठ असतात. काहीही विचारा उत्तरं त्यांच्या जिभेवर असतात. एक एक विषय दहा-दहा, पंधरा-पंधरा वेळा वाचलेले लोकं असतात. परीक्षा पास होण्यासाठी लागतो त्याच्या कित्येक पट जास्त अभ्यास झालेला असतो अनेकांचा. पण एवढं सगळं असून यातील बरेच जण अंतिम यादीत मात्र नसतात. पूर्व परीक्षेचा पहिला टप्पाच अनेकांना अनेक वर्षे पार करता येत नाही.           काय चुकते नक्की? अभ्यास कमी असतो का? की गरजेपेक्षा जास्त अभ्यास होतो? की केलेल्या अभ्यासाचा योग्य वापर करायचे चुकते? की परीक्षेच्या वेळच्या तणावामुळे अडचणी येतात? परीक्षेची आणि निकालाची भीती इथे प्रॉब्लेम करून जाते का? की ऐन वेळी वेळेचे गणित चुकते? की गोंधळ उडतो अनेक गोष्टी एका वेळी सांभाळता सांभाळता?           यातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे लपली आहेत तुम्ही परीक्षेचा दिवस आणि परीक्षेचे दोन अधिक दोन असे चार तास