Posts

Showing posts from December, 2017

तू घरी नव्हतास म्हणून.....

Image
              तू घरी नव्हतास म्हणून......                Sketch credit: Amol Bhosale(DSLR) तू घरी नव्हतास म्हणून                     मग भिजले पावसात अंगांगावरून ओघळणारा                     तुझा स्पर्श आठवत ओठांवरच्या थेंबांना                     तुझ्या ओठांची सर नाही पण ओठांवरून मानेवर मात्र                     पाऊस तुझ्यासारखाच उतरतो थंडगार पावसात वाऱ्याची                      झुळूकही उष्ण जाणवते खांद्यांवर विसवणाऱ्या                       तुझ्या फुलत्या श्वासांसारखी भिजल्या मातीच्या गंधाला                       तुझ्या गंधाची सर नाही पदरावरून कमरेवर मात्र                       पाऊस तुझ्यासारखाच दरवळतो पैंजनावरचे थेंब                     हळुवार पायावर उतरतात केसांमधले थेंब खट्याळ,                     पाठीवर खेळत बसतात पावसाच्या वाढत्या जोराला                     तुझी सर नाही ओसरता पाऊस मात्र तुझ्यासारखाच                     माझ्या मिठीत मुरत जातो                       -अमोल मांडवे(DYSP)                  

जायचं का परत खेड्याकडे?

                    जायचं का परत खेड्याकडे? दोन्ही जावई आज टीव्ही वर झळकले पण सासऱ्यांच्या जीव मात्र नखात आला. एकीकडं एका जावयाने कांद्याचं विक्रमी उत्पन्न काढलं म्हणून सरकारकडून बक्षीस मिळालं तर दुसरा जावई एल्फिन्स्टन ला झालेल्या चेंगराचेंगरीतून जेमतेम वाचला. पोरीनं बसून खावं म्हणून तिला मुंबईला कामाला असलेला मुलगा पहिला. दुसरीला मात्र नाईलाजास्तव एका शेतकऱ्याला दिली ते पण तिला काम करावं लागणार नाही या बोलीवर.            पहिली जिला सुखात राहावी म्हणून मुंबईत दिली तिचं काही नवऱ्याच्या पगारात भागेना. पगार चांगला होता आणि वेळच्या वेळी वाढत पण होता पण महागाई काय जवळ येऊ देत नव्हती. नवरा 6 ची ट्रेन पकडतो म्हणून हिची धावपळ 5 पासूनच. धावपळ करूनदेखील काही ताजे नव्हतेच मिळत खायला. गटारावरच्याच भाज्या. पगारात भागत नाय म्हणून मग शिवण मशीन. त्यात पण जास्त पैसे मिळेनात म्हणून मग आणखी असले छोटे मोठे उद्योग करत बस. नवरा काय 9 वाजेपर्यंत पोचायचा नाही रात्री. पोचल्यावर लोकलच्या गर्दीचा सगळा राग बायको आणि पोरांवर. घरात ना कसला संवाद ना शांती. पोरांना इंग्लिश शाळेत टाकलं पण नाव सोडून त्यातही काही व

अनोळखी वाटेवर अनामिक व्यक्तीवर अव्यक्त प्रेम

Image
अनोळखी वाटेवर अनामिक व्यक्तीवर अव्यक्त प्रेम               तुला काय वाटेल या भीतीने                        माझं वाटणं विरून गेलं पाझर फुटण्याआधीच डोळ्यातलं                        पाणी झरून गेलं 'अनोळखी पणाच्या' ग्रहनाने                        चंद्र झोकाळून टाकला 'अनामिक पणाच्या' अंतराने                        बंधही जाळून टाकला अंधाराच्या गर्दीत माझं मंद                        टिमटीमनं मुरून गेलं कालांतराने पहाट झालीही,                         पण चांदणं सरून गेलं... आपल्या तारा जुळण्याआधी तुझे सुत जुळाले आपले बोलणे होण्याआधी गीत तुझे वळाले मला 'मी' नीटसा कळण्याआधी तुला प्रेम कळाले मावळतीच्या सुर्याइतके चित्र जलद पळाले... हातपाय मारण्या आधीच                          पाणी डोक्या वरून गेलं वाचला जीव त्यातूनही पण                          मन मात्र मरून गेलं कालांतराने पहाट झालीही,                           पण चांदणं सरून गेलं... तूच एकदा म्हणालीस, बोलला नाहीस ते आधी तूच सांग आता, खरचं आली का तशी वेळ कधी मला वाटलं एकदा, वेळ आली,... पण