Posts

Showing posts from September, 2017

डंख

                         डंख तुझीच म्हणत म्हणत दुसऱ्याची होताना ढगाआड लपत लपत चंद्र पाताळी जाताना तुझ्या पावलांचे ठसे उरतातच भल्या पहाटेच्या मंद चांदण्यासारखे तुझ्या प्रेमळ आश्वासनांचा खच पडलेला दिव्याभोवती मरून पडलेल्या चिलटांसारखा तुझ्या पोकळ काळजीचा शब्दसडा विस्कटलेला वादळाने उधळलेल्या वाळक्या कस्पटांसारखा                    तुझ्या आठवणींचा व्रण उरतोच                    अश्वत्थामाच्या भळभळत्या जखमेसारखा तुझ्या गोड हाकांचा गहिवर झालेला गाईपासून तुटलेल्या वासराच्या हंबरड्यासारखा तुझ्या हळव्या स्पर्शाचा ओरखडा झालेला काट्यांमध्ये अडकून फाटलेल्या पदरासारखा                    तुझ्यावरच्या मायेचा अंश राहतोच                    दगडाखाली गारव्याला बसलेल्या विंचवासारखा                                        डंख मारणारा.......

"राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तयारी कशी करावी"

Image
MPSC चे यावर्षीचे वेळापत्रक आल्याने आणि पूर्वपरीक्षा फेब्रूवारी महिन्यात असल्याने बऱ्याच लोकांचा मोर्चा परत prelim च्या अभ्यासाकडे वळाला असेल. तसेच prelim 4 महिन्यावर आली असल्याने पहिल्या attempt वाल्यांना तयारी बाबत अनेक प्रश्न पडत असतील तर त्यावर काही उत्तरे जशी मला माझ्या स्पर्धापरिक्षा प्रवासात समजली तशी देत आहे. Prelim चा अभ्यास कधी सुरु करावा?                ज्यांनी अगोदर Mains दिली आहे किंवा mains चा पूर्ण अभ्यास केला आहे त्यांच्यासाठी 3 महिने हा कालावधी prelim साठी पुरेसा आहे. परंतु ज्यांना अगोदर prelim मध्ये अपयश आलेले आहे त्यांनी आणि पहिला attempt असलेल्यांनी 4-5 महिन्याचा कालावधी राखून ठेवावा. कारण prelim पास न झाल्यास mains च्या अभ्यासाचा कसलाही फायदा नाही. म्हणून किती अभ्यास लागणार आहे त्याचा अंदाज नसेल तर लवकर सुरु करणे कधीही उत्तम. प्रत्येकाला स्वतःच्या वाचनाच्या गतीनुसार आणि अगोदर च्या अभ्यासाच्या अंदाजावर किती कालावधी लागणार हे ठरवावे लागेल. कोणत्या पेपर ला जास्त महत्व द्यावे?               खरे तर हा प्रश्नच पडू नये. जर प्रत्येक पेपर 200 मार्क ला असेल तर एकाला

संध्याकाळच्या गोष्ठी(१)

Image
                  संध्याकाळच्या गोष्ठी(१)                  SKETCH CREDIT: Amol Bhosale(Dy Superintendent of Land Records) पावसाचे काळे ढग दाटून आलेल्या आभाळासारखे डोळे भरून आले होते, अंधारून गेलं सगळं. ओघळणारा प्रत्येक अश्रू, काळ्या ढगातून लख:कन खाली येणाऱ्या विजेसारखा, जाळून टाकणारा. प्रत्येक अश्रू बरोबर एक एक आठवण गळून पडत होती. माझ्यातली ती हळू हळू विरून झडत होती. गालावरून ओघळणाऱ्या अश्रूंच्या स्पर्शात तिच्या सहवासाची उत्कट भावना परत आठवत होती. पण गम्मत बघा ना, बरं वाटण्याआधीच तो अश्रू गालावरून ओघळून मिसळून जायचा मातीत. समोर दिसायची मग फक्त रिकामी खुर्ची आणि चहाचा अर्धा संपलेला कप. सगळा चहा संपवण्या एवढाही वेळ नव्हता तिच्याकडे. अचानक वाटलं मीच बुडतोय त्या अर्ध्या राहिलेल्या चहात, पण ते पण धुसरच दिसायचं भरलेल्या जड पापण्याआडून. आणि मग अश्रूंचा महापूर. माझ्याच मरण्यावर माझ्याच डोळ्यांनी केलेल्या आक्रोशातून. थेंब थेंब ओघळणाऱ्या आठवणी खळखळ वाहू लागल्या, गढूळ ओढ्यासारख्या. या आठवसरींना उलट-सुलट फिरवून तडाखे देणारा वारा होताच. पावसा आधीच्या वावटळीत हेलकावे खाणारं कस्पट भिजून चिखला

पाऊस.. पडायचं विसरून गेलेला

Image
पाऊस.. पडायचं विसरून गेलेला    (Sketch credit-Amol Bhosale, Dy Superintendent of Land Records)       पाऊस.. पडायचं विसरून गेलेला       डोळ्यातला पूर ओसरून गेलेला ।। ढग येतात दाटून पण पांढरे फिक्कट गतप्राण डोळ्याचे तेजहीन बुब्बुळ जणू क्षितिजावरून येताना आशा आणणारा आईला पोटातल्या जिवाच्या पहिल्या चाहुलीसारखा पण तू आशेबरोबर पाणी आणायला विसरून गेलेला पुन्हा एकदा डोळ्यातला पूर ओसरून गेलेला ।।           कडाडणाऱ्या विजांचा प्रकोप           गडाडणाऱ्या ढगांचा प्रक्षोभ           लतातांडवात जाणारे जीव           छत्ररहितांची येणारी कीव सगळं क्षम्य होतं तू आणणाऱ्या अमृतासाठी तू मात्र आशेच्या किरणांवर ग्रहण पसरून गेलेला पुन्हा एकदा डोळ्यातला पूर ओसरून गेलेला ।। श्रावणात श्रावण पकडल्यासारखाच अडलास गणपतीत गणपतीसारखाच दीड दिवस पडलास हत्तीच्या नक्षत्रातसुद्धा रुसल्यासारखा वागलास आभाळाची माया,धरतीचा वसा सहज त्यागलास तरीही तुला बोल नाही लावला रे कोणी तू मात्र हुंदकेही ऐकायचे विसरून गेलेला पुन्हा एकदा डोळ्यातला पूर ओसरून गेलेला ।। हातातोंडाशी आलेलं पीक मात्र अवेळी घेऊन

I had a dream. Yours.

Image
                     I had a dream. Yours.            {Sketch credit-Amol Bhosale(Dy.                     Superintendent of Land Records)}            I had a dream. I have rehearsed it in my mind so many times.            I have a house at the foothills of the almighty Sahyadri. A single storey house. Surrounded by the trees, many and different-a few flowering ones. Because she loves them.            My wife goes to work, kissing me on the forehead. I stand in the balcony, waving to her as she closes the old rusted iron gate of our compound wall. As she gets out of sight, i get on with my pen and paper. For the whole day, I think, I imagine, I see and finally I write... alphabets, words, lines, pages, poems, stories, books.            Then the distant horizon becomes a shade of  yellow and orange. Even the waves washing the shore wear those shades.             I put my pen down though all the other processes are ON. Three cups of coffee. I have made them. I love doing it. I