Posts

Showing posts with the label MPSC राज्यसेवा

शेवटचा एक आठवडा#MPSC_Prelim

Image
                        शेवटचा 1 आठवडा # MPSC राज्यसेवा पूर्वपरिक्षे पूर्वीचा कोणत्याही पूर्व परिक्षेवेळी शेवटचा 1 आठवडा हा अत्यंत महत्वाचा असतो. या अगोदर केलेले सर्व श्रम फलित होणार की नाही हे बऱ्याचदा हा एक आठवडा ठरवतो. शेवटच्या 4 तासात उत्तम perform करून जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी या 1 आठवड्यात पुढील गोष्टी केल्या तर निश्चित फायदा होऊ शकेल- 1) विश्वास ठेवा की जेवढा गरजेचा होता तेवढा तुमचा अभ्यास ऑलरेडी झालेला आहे. चुकून काही राहीले असेल तर त्याने एकूण परीक्षा किंवा निकालावर फारसा परिणाम होणार नाही. त्यामुळे तुम्ही पास होण्याकरिता लागणारा सर्व अभ्यास केला आहे हे स्वतःच्या मनाला पटवून द्या. 2) परीक्षेत आपण पास होऊ की नाही हा विचार मनातून पूर्णतः काढून टाका. अभ्यास करणे तुमच्या हातात आहे ते करत राहा. तुम्ही आवश्यक तो अभ्यास केलेला आहे आणि आता फक्त फॉर्मलिटी म्हणून जाऊन परीक्षा द्यायची आहे अशा mindset ने परीक्षेला जा.  3) शेवटचे 2 आठवडे म्हणजे शेवटची 1 revision. अगोदर वाचलेल्या सर्व गोष्टींची एक revision या वेळेत पूर्ण करा. सर्व विषयांना पोहोचायचा प्रयत्न करा. यामध्ये पुनः पूर्ण वाच

वर्णनात्मक पेपर मधील निबंधाची तयारी कशी करावी?

Image
वर्णनात्मक पेपर चा अभ्यास कसा करावा: वर्णनात्मक पेपर अभ्यास करायला अतिशय सोप्पा पण थोडासा tricky आहे. मराठी आणि इंग्रजी दोन्ही पेपर मध्ये निबंध, भाषांतर आणि सरांशलेखन एवढे तीनच प्रश्न असल्याने खुप अभ्यास करावा नाही लागत, परंतु यातील कोणत्याही प्रकारात एखादी लक्षात येण्यासारखी चूक झाली तर मार्क्स एकदम खूप कमी होतात. म्हणून तिन्ही बाबींचा व्यवस्थित नियोजनबद्ध अभ्यास व सराव लागतो. निबंध/ Essay:          मराठी व इंग्रजी दोन्ही पेपर मध्ये 25 मार्क्स साठी एक एक निबंध विचारला जातो. भाषा वेगळ्या असल्या तरी दोन्ही निबंधांमध्ये अपेक्षित असणाऱ्या बाबी सारख्याच असतात. त्यामुळे दोन्हीच्या अभ्यासाची पद्धत सारखीच आहे.            निबंध हा भाषेच्या पेपर मध्ये आहे, तो GS चा भाग नाही हे लक्षात घ्यावे. त्यामुळे त्यात माहितीचा भडीमार नको. तसेच GS चे उत्तर लिहितोय असंही वाटता कामा नये. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात आपणाला प्रत्येक गोष्टीबद्दल खुप काही माहिती असते. त्यामुळे एखादा विषय समोर येताच त्याबद्दल आपल्याला माहिती असलेले सगळे कसे लिहिता येईल याकडे आपला भर असतो. त्यामुळे निबंध हा रुक्ष

मराठी-इंग्रजी वर्णनात्मक पेपर: अभ्यास कसा, कधी , किती करावा.

Image
मराठी-इंग्रजी वर्णनात्मक पेपर:         अगोदर 200 मार्क्स साठी असणारा हा घटक आता मराठीसाठी 50 आणि इंग्रजीसाठी 50 असा 100 गुणांचा करण्यात आला आहे. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मराठी आणि इंग्रजीचे गुण अंतिम निकालात पकडले जात नसल्याने कधी कधी सुरुवातीला विद्यार्थ्यांचा असा ग्रह होतो की राज्यसेवेच्या परिक्षेतही या पेपर चे गुण फक्त qualifying आहेत. परंतु तसे नसून या पेपर चे मार्क अंतिम निकालात पकडतात आणि किंबहुना निकालात उल्लेखनीय फरकही पाडतात. वर्णनात्मक पेपर चे महत्व:          सगळी परीक्षा objective type प्रश्नांची असल्याने ज्यांना वर्णनात्मक पेपर मध्ये गती आहे त्यांना हा एकच पेपर आधार देतो. तसेच objective type पेपर मध्ये अनिश्चितता खूप जास्त असते. म्हणून मग त्यातल्या त्यात थोडेफार स्थैर्य आणण्याचे काम हाच पेपर करतो. या पेपर मध्ये जर खूप जास्त मार्क पडले तर तुमचा न येणार result येऊ शकतो, तुम्हाला क्लास 2 पोस्ट मिळणार असेल तर क्लास 1 मिळू शकते. आणि तुम्ही जर टॉप च्या पोस्ट साठी प्रयत्न करत असाल तर मग यामध्ये उत्तम मार्क पडण्याशिवाय गत्यंतर नाही.            मला स्वतःला जे

प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव कसा करावा

Image
प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव कसा करावा आपण नेहमी ऐकतो की, खूप अभ्यास केला पण मार्क कमी पडले, ऐन पेपर वेळी गडबड झाली, प्रश्नपत्रिका सोडविण्याचा खूप सराव केला पण तरी परीक्षेत गोंधळ उडाला. कशामुळे विद्यार्थ्यांना असे प्रश्न पडतात? कशामुळे सगळे करूनही यश हुलकावणी देते? याचा एक कारण असते की प्रत्यक्ष परीक्षेमध्ये जे करावे लागते त्याचा कमी सराव किंवा सरावमध्ये कमतरता किंवा चुकीचा सराव. यास्तव हे टाळण्यासाठी सराव पुरेसा आणि सरावाची पद्धत योग्य असावी. सरावाच्या योग्य पद्धतीवर प्रकाश टाकणारा हा पाठ. 1. प्रश्नपत्रिका किती व कधी सोडवाव्यात?          प्रश्नपत्रिका किती सोडवण्यात याव्यात याचे कोणतेही मापदंड नाहीत. प्रत्येकाला कमी जास्त सराव लागू शकतो. परंतु सर्वसाधारणपणे राज्यसेवेच्या सर्व प्रश्नपत्रिका सोडवून व्हायलाच हव्यात. याशिवाय पूर्वपरिक्षेनंतर प्रत्येक आठवड्यात दोन पेपर सोडवून व्हायलाच हवे. पेपर सोडवल्याने आपल्या अभ्यासाची दिशा योग्य रहाते व आपला अभ्यास योग्य दिशेने चालू आहे हे पडताळण्यास मदत होते.            बऱ्याचदा विद्यार्थी सुरुवातीला फक्त वाचन करतात व शेवटच्या महिन

GROUP DISCUSSION का आणि कसे करावे?

Image
       GROUP DISCUSSION का आणि कसे करावे.           स्पर्धा परीक्षा म्हणलं की प्रचंड अभ्यासक्रम आणि त्यात प्रत्येक विषयाची अनेक पुस्तके आलीच. त्यात एकामागून एक धडकणाऱ्या परीक्षा आणि त्यांचे विविध टप्पे म्हणलं की अभ्यास म्हणजे एक मोठी मोहीम ठरते. आणि ती एकदा फसत गेली की तीन चार वर्षे प्रयत्न करूनही पार पडत नाही. म्हणून अशा वेळी चांगले सोबती असतील तर वाट जरा सोप्पी होते. अभ्यास सुसह्य होतोच होतो पण तो परिणामकारक देखील होतो. अशा वेळी गट चर्चा(group discussion) अत्यंत उपयोगी पडते. Group Discussion का महत्वाचे आहे?         MPSC च्या सगळ्या परीक्षा objective झाल्या आहेत. त्यामुळे बऱ्याचदा factual गोष्टी, आकडेवारी, नावे या गोष्टींवर भर असतो. त्यातही बऱ्याच गोष्टी प्रथमदर्शनी एकसारख्या असतात. ऐन परीक्षेत नक्की कशात काय हेच कळत नाही आणि मग confidence जातो. सगळं वाचलंय असं वाटतं पण नक्की हेच का? किंवा मग हे याच्यातच आहे का? असे प्रश्न पडतात. उदाहरणार्थ, सामान्य ज्ञान पेपर-२  मध्ये काही विशेष कायदे अभ्यासाला आहेत त्यांची कलमे नक्की कोणती कोणाची हे लक्षात ठेवणे अवघड जाते. किंवा सामान

यश आणि अपयश कसे स्वीकारावे

                यश आणि अपयश कसे स्वीकारावे       महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे किंवा संघ लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये काही हजार विद्यार्थ्यांमधून 1 जण, असे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण आहे. म्हणजे तसे पहिले 99.9 % विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात. पण इथे लक्षात घ्यायची गोष्ट अशी की "अनुत्तीर्ण" विद्यार्थ्यांचे प्रमाण जरी जास्त असले तरी "अपयशी" विद्यार्थ्यांचे प्रमाण मात्र अतिशय कमी आहे. अनुत्तीर्ण म्हणजे अपयशी हे समीकरण इथे लागू पडत नाही. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थी राज्यसेवेतून चांगली पदे मिळवतात, राज्यसेवेत यश न मिळालेले इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवतात. आयोगाच्या परीक्षांच्या अभ्यासाच्या जोरावर आज अनेक जण बँकिंग, journalism, education या क्षेत्रात प्रचंड यश संपादित करत आहेत. तर अनेक जण यशस्वी उद्योजक आहेत. आणि ते अगदी सहज आपल्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासादरम्यान मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून घेताना दिसतात. त्यामुळे अशा लोकांना अपयशी म्हणता येणार नाही. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासातून मिळालेले ज्ञान, आलेली प्रगल्भता ह

10वी 12वी नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करावी का?

Image
10वी 12वी नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करावी का?                         १०वी आणि १२वी चे निकाल नुकतेच लागले आणि पुढे काय हा प्रश्न विद्यार्थ्यांना आणि त्याहून जास्त त्यांच्या पालकांना पडला. बऱ्याच जणांचे फोन आले. या सगळ्यात एक खटकणारा प्रश्न विचारला जात होता. "माझ्या मुलाला/मुलीला स्पर्धा परीक्षा करायची आहे मग कोणत्या शाखेला प्रवेश घेणे योग्य राहील?" "स्पर्धापरिक्षेसाठी आत्तापासून काय तयारी करावी लागेल?" खरे तर या गोष्टी ज्याच्या त्याने ठरवायच्या. पण याबाबतीतील गोष्टींबाबत माझी काही मते आहेत, त्यांचा केलेला हा उहापोह. विद्यार्थ्यांची स्वतः निर्णय घेण्यास असमर्थता:          सर्वात अगोदर लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे १०वी १२वी च्या फार कमी मुलांना आपल्या भविष्याचा निर्णय घेण्याइतके ज्ञान किंवा अनुभव असतो. त्यामुळे यावेळचे निर्णय बऱ्याचदा पालकांनी घेतलेले किंवा ऐकीव गोष्टींवरून घेतलेले असतात. त्यामुळे पुढे जाऊन विद्यार्थ्यांमध्ये वेगळी आवड निर्माण होऊ शकते. अशावेळी अपुऱ्या माहितीवर अगोदर घेतलेले निर्णय अडचणी निर्माण करू शकतात. अशावेळी सर्व क्षेत्रातील स्पर्धेमुळे

©राज्यसेवा : यशाची गुरुकिल्ली - माझ्या येणाऱ्या नवीन पुस्तकाबद्दल थोडेसे

Image
©राज्यसेवा : यशाची गुरुकिल्ली - माझ्या येणाऱ्या नवीन पुस्तकाबद्दल थोडेसे    जवळपास दोन वर्षे स्पर्धापरिक्षांचे विविध विषय शिकवण्याचा अनुभव असल्याने आणि नंतर DYSP/ACP पदी निवड झाल्याने अनेक विद्यार्थी अनेक शंका घेऊन भेटायचे, प्रश्न विचारायचे. बऱ्याचदा प्रत्यक्ष भेटून तर कधी फोन, फेसबुक, व्हाट्सअँप या माध्यमातून. शिकवण्याची आवड असल्याने अशा प्रश्नांची उत्तरे देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविणे हा माझ्या आवडीचा विषय होता.           परंतु DYSP म्हणून सेवेत रुजू झाल्यावर विद्यार्थ्यांना हवा तेवढा वेळ द्यायला जमेना म्हणून मग वाटाड्या(vataadya) नावाचा ब्लॉग लिहिणे सुरु केले. त्यामार्फत अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता आले. परंतु तरीही या माध्यमाने सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे शक्य होत नव्हते. तसेच सर्व जणांच्या विचारल्या जाणाऱ्या शंकांचे समाधानही करता येत नव्हते. तेंव्हा महेश शिंदे सरांनी ही पुस्तकाची कल्पना सुचवली आणि मग आम्ही तात्काळ त्यावर काम सुरु केले.            अगदी राज्यसेवा करावी का असा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते स्पर्धा परीक्षा क्षेत्रात खूप दिवस असणाऱ्

स्पर्धा परिक्षेची तयारी करताय, मग या गोष्टी टाळा:: भाग 4

© स्पर्धा परिक्षेची तयारी करताय, मग या गोष्टी टाळा:: भाग 4          आता झालेली पूर्वपरीक्षा व त्यामध्ये cutoff खूप जास्त जाईल अशी चर्चा. मग थोडेफार कमी मार्क्स पडलेल्या लोकांना पुढे काय करावे ते सुचतच नाही. तेंव्हा त्यांच्याकडून पुढे सांगितलेली चूक होऊ शकते. ते टाळण्यासाठी मार्गदर्शन करणारा हा लेख. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना टाळायच्या गोष्टी संदर्भातील लेखमालेतील चौथा लेख.       4. परीक्षेच्या एका टप्प्यावर अयशस्वी झाल्यावर फक्त त्याच टप्प्यावर लक्ष केंद्रित करणे:-          स्पर्धा परीक्षेच्या प्रक्रियेत अपयश येणे हे अतिशय साहजिक आहे. अपयश ही यशाची पायरी आहे हे वाक्य स्पर्धा परीक्षेच्या प्रवासाला तंतोतंत लागू पडते. त्यामुळे अपयश पचवणे आणि त्यातून यशाचा मार्ग बनवणे हे या प्रक्रियेचा एक अविभाज्य आणि अतिशय महत्वाचा असा भाग आहे.           परंतु बऱ्याचदा या प्रक्रियेत एका टप्प्यावर अपयश आले की विद्यार्थी त्याच टप्यावर सगळे लक्ष केंद्रित करतात आणि मग परीक्षेच्या इतर टप्प्यांवर आपोआप दुर्लक्ष होते. उदाहरणार्थ जर एक जण पूर्व परिक्षेतच उत्तीर्ण होत नसेल तर तो पुढची पूर्व परीक्षा येण

CSAT प्रत्यक्ष पेपरच्या 2 तासांचे नियोजन

Image
            CSAT प्रत्यक्ष पेपरच्या 2 तासांचे नियोजन                           अगदी 100% विद्यार्थी मन लाऊन अभ्यास करत नसले तरी 70-80% तरी अगदी मन लाऊन अभ्यास करतात. सगळा syllabus पूर्ण करतात, अगदी काही लोकांची तर पुस्तकं च्या पुस्तकं पाठ असतात. काहीही विचारा उत्तरं त्यांच्या जिभेवर असतात. एक एक विषय दहा-दहा, पंधरा-पंधरा वेळा वाचलेले लोकं असतात. परीक्षा पास होण्यासाठी लागतो त्याच्या कित्येक पट जास्त अभ्यास झालेला असतो अनेकांचा. पण एवढं सगळं असून यातील बरेच जण अंतिम यादीत मात्र नसतात. पूर्व परीक्षेचा पहिला टप्पाच अनेकांना अनेक वर्षे पार करता येत नाही.           काय चुकते नक्की? अभ्यास कमी असतो का? की गरजेपेक्षा जास्त अभ्यास होतो? की केलेल्या अभ्यासाचा योग्य वापर करायचे चुकते? की परीक्षेच्या वेळच्या तणावामुळे अडचणी येतात? परीक्षेची आणि निकालाची भीती इथे प्रॉब्लेम करून जाते का? की ऐन वेळी वेळेचे गणित चुकते? की गोंधळ उडतो अनेक गोष्टी एका वेळी सांभाळता सांभाळता?           यातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे लपली आहेत तुम्ही परीक्षेचा दिवस आणि परीक्षेचे दोन अधिक दोन असे चार तास