तुझ्या आठवणीत भिजताना
तुझ्या आठवणीत भिजताना ढग दाटून आले की तुझी किणकिणणारी पैंजणे आठवतात पाऊस आणणाऱ्या ढगांसारखी ती तुझ्या येण्याची चाहूल देतात पावसाच्या कोसळणाऱ्या सरी पाहता तुझे ओलेचिंब केस आठवतात खिडकीवर ओघळणाऱ्या सरींसारखे ते तुझ्या चेहऱ्यावर पसरतात मग मी खिडकी उघडून काही धारा चेहऱ्यावर घ्यायचा प्रयत्न करतो तू तुझ्या केसांमधील पाणी झटकून जागी करतीयेस असा भास होतो. मात...