तुझ्यावरचा राग

                 तुझ्यावरचा राग
      
 (Sketch Credit - Amol Bhosale, DSLR)

कधी कधी सकाळीच तुझा प्रचंड राग येतो
वागण्याचा विचित्र तुझ्या जीवघेणा त्रास होतो

एखादेदिवाशी अचानक वेड्यासारखी वागतेस
ऐकायचंच नाही कुणाचं ठरवूनच टाकतेस
जेवढं समजवावं तेवढा पारा चढतो
शहाणपणाच्या गोष्टींनी तिढा आणखी वाढतो

तुझी आदळआपट आणि माझी चिडचिड
माझी आरडाओरड आणि तुझी धुसमुस
मी नाष्ता न करता तसाच तडक निघतो
तुझ्या ताटातला नाश्ताही ताटातंच निवतो

माझा राग तो गाडीच्या दारांवर निघतो
तुझा मात्र माडीच्या पायऱ्यांवर सजतो
नकोशी सकाळ जाते सरून तुझ्या चुका आठवत
बांध तुझाही फुटतो तू कधीचा आलेली साठवत

आतड्याला पीळ पडला कि मग येते आठवण तुझी
'हॉटेलात खाऊ' ची हौस पहिल्या घासात भागते माझी
तेंव्हा मला जाण होते तुझ्या अगतिकतेची
कळ उठते काळजात माझ्या अहंपणाची

काय हवं असतं तिला?

कधीतरी तिच्या हातच्या चवीची स्तुती
कधी तिने उधळून टाकलेल्या प्रेमाची नुसती पोचपावती
"दमली असशील" म्हणून नकळत पुढे झालेला पाण्याचा ग्लास
वॉशिंग मशीन चं चालू केलेलं बटन, ऐकून तिचा दमता श्वास
कधीतरी अचानक मारलेली मिठी साजरी
कधी एकटक नजर,समोर सखी लाजरी

मी माझ्याच धुंदीत, तुला गृहीतच धरलं
माझ्या माझ्यापणात, तुझं तुझंपण सरलं

संध्याकाळ सरली अबोल, रात्र मुकीच जन्मली
अंथरुणावर ओल्या डोळ्यांनी पाठ एक निजली
स्पर्श होताच माझा हलकीशी तू शहारली
ढगाआड चंद्र जणू तशी कुशीत शिरली

शर्टवर आवळलेल्या मुठींनी पुन्हा उधळलीस तू माया
पश्चाताप आणि प्रेमभराच्या द्वंद्वात कापणारी माझी काया
उपेक्षा निराशा तुझी माझ्या मिठीत सरली
उद्विग्नता माझी माझ्याच डोळ्यातून झरली

Comments

  1. छान आहे कविता. भावनांची उत्कटता आहे पण शब्दांची सांगड बसत नाही. ओढून ताणून यमक आणले आहेत असे वाटत आहे. मुक्तछंदात आंतरिक लय असते की नाही हा विवाद्य मुद्दा असला तरी कवितेचा सेंद्रिय परिणाम अपेक्षित असतो. यात कविता तोकडी पडते. प्रयत्न खूप स्तुत्य आहे पण. एका अधिकाऱ्यात संवेदनशील माणूस आहे याची पोचपावती आहे ही..बाकी वरील कवितेमधून पुरुषसत्ताक जडण-घडणीचा अंश वा पुरुषी अहं जाणवतोय. आजच्या काळात तो टाळणे हे कधीही श्रेयस्कर होय. लिहित रहा...अजून वाचायला आवडेल..शुभेच्छा !!

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you for such an elaborate critique. I dont know technicalities of poetry. Will consider all the suggestions. Thank you.☺

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला