स्पर्धा परिक्षेची तयारी करताय, मग या गोष्टी टाळा: भाग 3

स्पर्धा परिक्षेची तयारी करताय, मग या गोष्टी टाळा: भाग 3

         स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यात प्रत्यक्षात यशस्वी होणाऱ्यांची संख्या पाहता 1000 जणांत 1 जण यशस्वी होतो. यशाची आणि अपयशाची कारणे व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असतात परंतु काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या आणि यशाचा मध्ये अडथळा निर्माण करू शकतील किंवा आपले यश लांबवू शकतील. म्हणून स्पर्धा परीक्षेची तयारी करताना काही गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. तशा काही गोष्टींचा हा उहापोह करण्यासाठी एक नवीन लेखांची मालिका लिहित आहे.
           त्या मालिकेतील हा तिसरा लेख. राज्यसेवेच्या जाहिरातीत यावर्षी असलेल्या कमी जागा, न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असल्याने काही गोष्टींबाबतची अनिश्चितता या एकूण पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे अभ्यासावरून लक्ष विचलित होण्याची शक्यता असते. प्रचंड स्पर्धेच्या क्षेत्रात असे थोडेसे Diversion खूप नुकसानकारक ठरू शकतो म्हणून अशा गोष्टींबाबतचा हा लेख.

3. जे आपल्या नियंत्रणात नाही त्या गोष्टींचा खूप विचार करत बसणे.
           स्पर्धा परीक्षा म्हटले की अनेक बाबी, अनेक पैलू आलेच. त्याच बरोबर स्पर्धा परीक्षा म्हटले की ताणतणाव आणि विचारांचा गोंधळ आलाच. यातील काही गोष्टी, पैलू आपल्या नियंत्रणात असतात तर काही आपल्या नियंत्रणाच्या बाहेर. एवढे असंख्य पैलू असले की सगळ्यांना वेळ देणे, सगळ्या गोष्टींचा विचार करणे नक्कीच शक्य होणार नाही. म्हणून मग कशाचा विचार करायचा आणि कशाचा नाही हे ठरवावं लागेल.
          आपल्या नियंत्रणात असणाऱ्या गोष्टींचा यथासांग विचार करून, त्यांचे योग्य नियोजन करून त्या गोष्टींना सामोरे जाणे केंव्हाही योग्य. पण ज्या गोष्टी आपल्या हातातच नाहीत त्यांच्यावर माथेफोड करून काही उपयोग आहे का?
उदाहरणार्थ बऱ्याचदा एखाद्या वर्षाच्या जाहिरातीमध्ये किती जागा आहेत यावर विद्यार्थी तासनतास चर्चा करताना आढळतात. जागा कमी असतील तर काही जण अगदी फॉर्म भरायचं टाळतात देखील, तेही attempt चे कसलेही बंधन नसताना. जागांच्या संख्येवरून अभ्यासात फरक करतात तो वेगळा. पण माझा अनुभव असं सांगतो की ज्यांनी ज्यांनी जाहिरातीतील जागांचा खूप विचार करून planning केला त्यांना फायदा कमी आणि नुकसानच जास्त झालं.
           एक तर चर्चेत जाणार वेळ, अभ्यासाची तुटणारी link, जागा कमी असतील तर आधीच मनात तयार होणारे negative वातावरण, अभ्यास करताना येणारा निरुत्साह, तसेच त्यावर्षी जोमाने अभ्यास करणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत मागे पडण्याचा धोका या सगळ्या गोष्टी मग आपला डाव साधतात. आणि मग ज्याची भीती वाटते तेच होते.
           तसेच MPSC जवळपास प्रत्येक वर्षी अचानक मधेच जागांची संख्या वाढवते. आणि मग वरील प्रकारच्या लोकांचे डोळे खाडकन उघडतात पण एव्हाना वेळ गेलेली असते.
            अशाच आपल्या नियंत्रणाबाहेर असणाऱ्या आणखी गोष्टी म्हणजे, आपल्याला कोणते पॅनल मुलाखतीला येणार, विशिष्ट category मधील जागांच्या संख्येत कमीजास्त होणे, कोणत्या विषयावर प्रश्न कमी जास्त होणार, CSAT ची काठिण्य पातळी अचानक बदलली तर आणि अशा अनेक गोष्टी.
              सध्या या प्रकारची आपल्या नियंत्रणाबाहेरची गोष्ट म्हणजे न्यायालयाने आणलेली स्थगिती आणि आरक्षणाच्या मुद्द्यांची संदिग्धता. जरी दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या असल्या तरी याबाबत विद्यार्थी काही करू शकत नाहीत. तसेच या असल्या गोष्टींचा जास्त विचार करून अभ्यासात खंड पडल्याने होते असे की, जेंव्हा अचानक सर्व सुरळीत होते तेंव्हा याकडे लक्ष न देता अभ्यास करत बसलेले विद्यार्थी स्पर्धेत पुढे निघून जातात आणि बाकीचे झाले ते योग्य की अयोग्य याचा विचार करत बसतात. जरी एखाद्याला एखादा निर्णय अयोग्य वाटला तरी एकदा आयोगाने किंवा न्यायालयाने तसे ठरवल्यावर आपण त्याला सकारात्मक दृष्टीने घ्यावे आणि कामाला लागावे. म्हणून आत्ता देखील विद्यार्थ्यांना मी विनंती करेन की त्यांनी बाहेर चाललेल्या सगळ्या घडामोडीकडे तठस्थपणे पाहत, अभ्यास , जो सर्वस्वी आपल्या हातात आहे त्याचा विचार करावा.

Comments

  1. सर, परीक्षेत जस्तीत जास्त attempt ला खुप महत्त्व आहे त्या बद्दल तुमचा experience आणि काही tricks...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला