स्पर्धा परिक्षेची तयारी करताय, मग या गोष्टी टाळा:: भाग 4

©स्पर्धा परिक्षेची तयारी करताय, मग या गोष्टी टाळा:: भाग 4

         आता झालेली पूर्वपरीक्षा व त्यामध्ये cutoff खूप जास्त जाईल अशी चर्चा. मग थोडेफार कमी मार्क्स पडलेल्या लोकांना पुढे काय करावे ते सुचतच नाही. तेंव्हा त्यांच्याकडून पुढे सांगितलेली चूक होऊ शकते. ते टाळण्यासाठी मार्गदर्शन करणारा हा लेख. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना टाळायच्या गोष्टी संदर्भातील लेखमालेतील चौथा लेख.
     
4. परीक्षेच्या एका टप्प्यावर अयशस्वी झाल्यावर फक्त त्याच टप्प्यावर लक्ष केंद्रित करणे:-

         स्पर्धा परीक्षेच्या प्रक्रियेत अपयश येणे हे अतिशय साहजिक आहे. अपयश ही यशाची पायरी आहे हे वाक्य स्पर्धा परीक्षेच्या प्रवासाला तंतोतंत लागू पडते. त्यामुळे अपयश पचवणे आणि त्यातून यशाचा मार्ग बनवणे हे या प्रक्रियेचा एक अविभाज्य आणि अतिशय महत्वाचा असा भाग आहे.
          परंतु बऱ्याचदा या प्रक्रियेत एका टप्प्यावर अपयश आले की विद्यार्थी त्याच टप्यावर सगळे लक्ष केंद्रित करतात आणि मग परीक्षेच्या इतर टप्प्यांवर आपोआप दुर्लक्ष होते. उदाहरणार्थ जर एक जण पूर्व परिक्षेतच उत्तीर्ण होत नसेल तर तो पुढची पूर्व परीक्षा येण्यापर्यंत पूर्व परीक्षा कशी पास करता येईल त्यावरच भर देतो. मग मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांकडे दुर्लक्ष होते. परिणामी, समजा पुढच्या वर्षी जरी तो पूर्व परीक्षा पास झाला तरी मुख्य परीक्षेचा अभ्यास इतकासा न झाल्याने तो स्पर्धेत मागे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून अभ्यास करताना कायम तिन्ही टप्यांचा विचार करणे आवश्यक आहे.
         पूर्व परीक्षा पास होणार नाही असे वाटले तरी जणू काही ती पास होणार आहे या जोमाने मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला लागावे. कारण पुढच्या पूर्व परीक्षेला अजून एक पूर्ण वर्ष वेळ असतो त्यामुळे अशा वेळी पूर्व परीक्षेच्या अभ्यासाचा फारसा फायदा होत नाही. तसेच त्यावर्षी पूर्व परीक्षा पास झालेले विद्यार्थी त्या कालावधीत मुख्य परीक्षेच्या चार ते पाच Revisions पूर्ण करतात. अशा मुख्य परिक्षा देणाऱ्यांपैकी 90% विद्यार्थी पुन्हा पुढच्या वर्षी mains ला असतात. मग समजा तुम्ही पुढच्या मुख्य परीक्षेला ला पात्र झालात तर तुमच्या मुख्य परिक्षेआधी चार ते पाच revisions होतील. पण त्याच वेळात मागच्या वर्षी मुख्य परीक्षेचा अभ्यास केलेल्यांच्या सात ते आठ revisions झालेल्या असतील. आणि मग आपसूकच ते स्पर्धेत तुमच्या थोडंस पुढं गेलेले असतील. हे टाळायचं असेल तर एखाद्या परीक्षेच्या टप्यावर अपयश आले तरी  वेळापत्रक आणि नियोजनात फार बदल न करता आपण त्या टप्यावर आपल्या थोडं पुढे गेलेल्या लोकांच्या पातळीवर कसे राहू हे डोक्यात ठेऊन अभ्यास केलेला बरा.
           तसेच असा अभ्यास केल्यावर जरी तुम्ही यावर्षी राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेली मुख्य परीक्षा officially देऊ शकत नसला तरी प्रश्नपत्रिका मिळवून त्या घरी किंवा अभ्यासिकेत बसून, वेळ लाऊन सोडवू शकता. आयोगाच्या Answer key नुसार किती मार्क पडतायत याचा अंदाज घेऊ शकता. बाकीच्या मुख्य परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणांशी पडताळून तुम्ही स्पर्धेत नक्की कुठे आहात याचा एक पक्का अंदाज तुम्हाला येईल.
        जर उत्तीर्ण होण्यास लागणाऱ्या गुणांपेक्षा कमी गुण पडले तर तुम्ही तुमच्या चुका ओळखून, त्यात सुधारणा करून पुढील वर्षी पूर्ण तयारीने उतरू शकता. आणि समजा सरासरीपेक्षा जास्त गुण पडले तर तुम्हाला प्रचंड आत्मविश्वास येईल, ज्याच्या जोरावर तुमचा अभ्यास पण चांगला होईल आणि पुढील वर्षी तुमचे यश जवळजवळ निश्चितच होईल.
           असं केल्यास पुढच्या प्रयत्नात तुम्ही एका दमात परीक्षेचे तिन्ही टप्पे यशस्वीरीत्या ओलांडून जाण्याची शक्यता वाढते. त्यामुळे एक एक पायरी चढत जाण्यात वाया जाणारी तीन-चार वर्षे वाचू शकतात.
                         ©अमोल मांडवे(DYSP/ACP)

Comments

  1. Hi amol sir... Tumhi ek chaan asa pustak lihu shakta... Tumach guidance to the point astat

    ReplyDelete
  2. मागील वर्षीचे प्रश्नपत्रिका चे विश्लेषण नेमके कसे करायचे ते एका वेगळ्या लेखात detail मध्ये सांगा ना सर.... खूप मोठी हेल्प होईल.... कारण नवीन अभ्यास करणारे विद्यार्थी खूप confuse असतात या बाबतीत

    ReplyDelete
  3. सर तयार करतोय पण जसा पाहिजे तस score येत नाही . प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल method असेल तर cmnt

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला