GROUP DISCUSSION का आणि कसे करावे?

       GROUP DISCUSSION का आणि कसे करावे.  

        स्पर्धा परीक्षा म्हणलं की प्रचंड अभ्यासक्रम आणि त्यात प्रत्येक विषयाची अनेक पुस्तके आलीच. त्यात एकामागून एक धडकणाऱ्या परीक्षा आणि त्यांचे विविध टप्पे म्हणलं की अभ्यास म्हणजे एक मोठी मोहीम ठरते. आणि ती एकदा फसत गेली की तीन चार वर्षे प्रयत्न करूनही पार पडत नाही. म्हणून अशा वेळी चांगले सोबती असतील तर वाट जरा सोप्पी होते. अभ्यास सुसह्य होतोच होतो पण तो परिणामकारक देखील होतो. अशा वेळी गट चर्चा(group discussion) अत्यंत उपयोगी पडते.

Group Discussion का महत्वाचे आहे?
        MPSC च्या सगळ्या परीक्षा objective झाल्या आहेत. त्यामुळे बऱ्याचदा factual गोष्टी, आकडेवारी, नावे या गोष्टींवर भर असतो. त्यातही बऱ्याच गोष्टी प्रथमदर्शनी एकसारख्या असतात. ऐन परीक्षेत नक्की कशात काय हेच कळत नाही आणि मग confidence जातो. सगळं वाचलंय असं वाटतं पण नक्की हेच का? किंवा मग हे याच्यातच आहे का? असे प्रश्न पडतात. उदाहरणार्थ, सामान्य ज्ञान पेपर-२  मध्ये काही विशेष कायदे अभ्यासाला आहेत त्यांची कलमे नक्की कोणती कोणाची हे लक्षात ठेवणे अवघड जाते. किंवा सामान्य ज्ञान पेपर-१ मधील समाजसुधारकांची माहिती असेल. या गोष्टींचा अभ्यास फक्त वाचून केला तर पुन्हा पुन्हा विसरतो आणि ऐन परीक्षेत तर नक्की गोंधळ उडतो. अशावेळी चर्चा हा चांगला उपाय असतो.
         एखादी गोष्ट आपण वाचतो तेंव्हा त्याचा एकाच बाजूने आणि फार थोडा वेळ विचार करतो. त्यामुळे ती गोष्ट डोक्यात अगदी पक्की बसेलच असे नाही. परंतु जेंव्हा आपण त्या विषयावर चर्चा करतो तेंव्हा त्यावर अनेक बाजूंनी विचार होतो. त्यावर विचार करायला जास्त वेळ घेतला जातो. यामुळे त्यातील बारकावे समोर येतात. असे बारकावे समोर आल्याने वरकरणी सारख्या दिसणाऱ्या गोष्टींमधले लहानसहान वेगळेपण समोर येते आणि ते पक्के लक्षात राहते. मग अशा समोर आलेल्या गोष्टींच्या साहाय्याने आपण अनेक गोष्टी लक्षात ठेऊ शकतो. तसेच असे बारकावे पक्के लक्षात राहिल्याने दिलेल्या चार पर्यायांपैकी एक पर्याय निवडताना कमी गोंधळ उडतो आणि खूप माहिती नसताना आपण बरोबर उत्तराचा अंदाज बांधू शकतो. उदाहरणार्थ, जेंव्हा आपण ब्रिटिश गव्हर्नर आणि viceroy यांच्या नावांची यादी लक्षात ठेवायचा प्रयत्न करत असतो तेंव्हा कोणतरी आपल्याला लॉजिक सांगते की Lawrence, Mayo आणि Northbook एका पाठोपाठ एक येतात. यांचे initial वरून L-M-N असा क्रम आहे. असं एकमेकांमध्ये बोलणं झाल्याने ही गोष्ट कायम पक्की लक्षात राहते. मग याच्याशी संबंधित प्रश्न आला की आपण तो बरोबर सोडवू शकतो.
          वाचताना फक्त डोळ्याने पाहणे ही एकच क्रिया होते परंतु जेंव्हा आपण चर्चा करतो तेंव्हा वाचणे, बोलणे, ऐकणे, आकलन, समजावणे या अनेक क्रिया होतात. एकच गोष्ट इतक्या क्रियांमधून गेल्याने डोक्यात ती जास्त पक्की आणि जास्त काळ राहते.
          Objective type परीक्षेमध्ये प्रचंड स्पर्धा वाढल्याने जवळपास सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य झाले आहे. दिवसें-दिवस cut-off चे मार्क वर वर चाललेत. त्यामुळे अगदी येणारे प्रश्नही सोडवावे लागतात. कसलंही लॉजिक लाऊन किंवा अंदाजाने का होईना पण सर्व प्रश्न सोडवावे लागतात. अशा वेळी जर group discussions  करून केलेला अभ्यास असेल तर, माहिती नसलेली उत्तरे guess करता येऊ शकतात. तसेच गोंधळ कमी झाल्याने अचूकता वाढविण्यातही group discussions मदतगार होतात.
          तसेच अभ्यासाची quantity लक्षात घेता, एकट्याने सगळे व्यवस्थित करायचे म्हणले तर 2 वर्षे फक्त सगळं नीट वाचून व्हायलाच लागेल. मग त्याच्या revisions कधी करणार? आणखी एखादी परीक्षा असेल तर त्याची तयारी कधी करणार? ज्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्या कधी ठेवणार? त्यामुळे जर group मध्ये मिळून अभ्यास केला तर जबाबदारी वाटून घेता येते आणि कमी वेळात जास्त गोष्टी करता येतात. 

Group किती लोकांचा असावा?
         Group चा अभ्यास करणे हा असलेला हेतू आणि त्याच्या परिणामकारकतेची लक्षात घेता Group मध्ये मर्यादित संख्या असावी. गरजेपेक्षा कमी लोक असतील, म्हणजे दोन किंवा तीन, तर चर्चेचा उद्देशच नाहीसा होतो. फारसे नवीन मुद्दे, नवीन दृष्टिकोन मांडलाच जात नाही. असा group फक्त अभ्यास उरकायच्या मागे लागतो. मग हा अभ्यास एकाट्याने केल्यासारखाच ठरतो. Group मध्ये खूप जास्त लोक असले तरी चालत नाही. जास्त लोक झाले की गरजेपेक्षा जास्त मते येतात. त्यातून मग अगदी वाद पण होण्याची शक्यता असते. किंवा एखादा विषय निघाला की प्रत्येकाला त्या अनुषंगाने काही ना काही सुचत जातं आणि मग चर्चेचा विषय बाजूलाच राहून जातो. जास्त लोक असतील तर discussion च्या वेळा ठरवणे, विषय ठरवणे, पद्धत ठरवणे यासारखे छोटे निर्णय घेतानाही एकमत होत नाही आणि त्यात वेळ खूप जातो. कोणाला चहा घ्यायचा असतो, कोणाचं काही विसरत, या सगळ्यात वेळ वाया जातो. म्हणून group मध्ये 5-6 पेक्षा जास्त लोक नसावेत. 4-5 हा एकदम optimum नंबर आहे group discussion साठी.

Group Discussion ची वेळ काय असावी? किती वेळ द्यावा?
          Group discussion साठी म्हणून अभ्यासातून उठायचे झाल्यास अभ्यासात खूप break पडतात. म्हणून तुम्ही चहा किंवा जेवणाचा ब्रेक घेता त्याच्या आधी किंवा नंतर discussion ची वेळ ठरवावी. सकाळचा वेळ वाचनासाठी चांगला असतो त्यामुळे तेंव्हा शक्यतो discussion करू नये. बऱ्याचदा संध्याकाळी ४-७ दरम्यान अभ्यास मंदावतो किंवा जेवणानंतर ३-५ मध्येही अभ्यासात लक्ष लागत नाही, झोप येते. Discussion साठी अशी वेळ निवडणे उत्तम राहते. कारण discussion करताना झोप येत नाही आणि कंटाळाही येत नाही. त्यामुळे जी वेळ self study साठी अनुकूल नसते तिचा उपयोग group study साठी केला तर वेळेचा फार चांगला उपयोग होतो.
           Group मध्ये चांगला अभ्यास होतो म्हणून दिवसभर तेच करत बसू नये. Group study चे फायदे असले तरी तो self study ची जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे self study cha वेळ self study लाच दिला गेला पाहिजे. Group study कमी वेळ असेल तरच परिणामकारक ठरतो. प्रत्येक group किती वेळ highest efficiency ने काम करू शकते त्याची एक मर्यादा असते. त्याच्या पुढे जेवढा वेळ जाईल तेवढी अभ्यासाची परिणामकारकता कमी होते. वेळ वाढत चालली की अभ्यास सोडून इतर गप्पांचा ओघ सुरु होण्याची शक्यता असते. वेळेचे बंधन ठेवले नाही तर बऱ्याचदा discussion हे discussion न राहता debate होऊ पाहते. त्यामुळे आपापल्या सोयीनुसार १.५ ते २ तास चर्चा करायला हरकत नाही. एवढा वेळ पुरेसा ठरतो आणि परिणामकारक सुद्धा.

Group Discussion कसे करावे?
         Group discussion दोन गोष्टींकरिता करता येते. एक म्हणजे अभ्यास पूर्ण करण्यासाठी आणि दुसरे म्हणजे revision करण्यासाठी. 

१. अभ्यास पूर्ण करण्यासाठी:-
        स्पर्धा परीक्षेचा अभ्यास प्रचंड आहे. त्यात बऱ्याचदा अनेक विषयांचा अभ्यास एकाहून अधिक पुस्तकातून करावा लागतो. चालू घडामोडी चा अभ्यास देखील बराच जास्त असतो. एकट्याने सगळे वाचणे कमी वेळेत शक्य होत नाही. अशावेळी अभ्यास वाटून घेऊन केला जाऊ शकतो. जसे की इतिहासचा अभ्यास करताना जेंव्हा समाजसुधारकांच्या अभ्यास करणार असता तेंव्हा प्रत्येकाने पाच-पाच समाजसुधारक वेगवेगळ्या source मधून वाचून आणि नोट्स काढून आणायच्या. मग एकत्र बसून प्रत्येकाने ते वाचून दाखवायचं आणि समजावून सांगायचे. 
         असे करताना कमी वेळेत सर्व समाजसुधारकांच्या अभ्यास झाल्याने आपल्याला त्यांचा तुलनात्मक अभ्यास करता येतो. त्यामुळे गोष्टी लक्षात ठेवायला मदत होते. अशाप्रकारे एका विषयाचे भाग करून ते वाटून घेता येतात किंवा विषयच वाटून घेता येतात. असे केल्याने कोणताही विषय कमी वेळेत कानावरून जातो. कमी वेळात सर्व गोष्टी ऐकल्यामुळे त्यांचे एकमेकांशी परस्परसंबंध लक्षात येतात. एक गोष्ट दुसऱ्यावर कशी अवलंबून किंवा निगडित आहे ते कळते आणि त्यामुळे गोष्टी लक्षात रहायला मदत होते. ज्या गोष्टी २-३ पुस्तकातून वाचायच्या असतात त्या बाबतीत एकेकाने एका एका पुस्तकातून वाचले आणि नवीन व वेगळ्या गोष्टी इतरांना सांगितल्या तर सगळ्यांचा सगळी पुस्तके वाचण्यास लागणारा वेळ वाचतो. अशा प्रकारे कमी वेळात सर्व अभ्यास पूर्ण करण्यात group discussion मदतगार ठरते.

२. Revision करण्यासाठी:-
           Objective type परीक्षेमध्ये खूप जास्त वाचण्यापेक्षा जे वाचले आहे त्याच्या जास्तीत जास्त revisions होणे गरजेचे असते. जेंव्हा आपण objective प्रश्न सोडवत असतो तेंव्हा चार पर्याय असे असतात की माहिती असलेल्या गोष्टींमध्ये देखील आपण confuse होतो. हे वाचलंय खरं, पण नक्की हे याचेच उत्तर आहे का असा प्रश्न पडतो. अशावेळी कोणी तरी बोलता बोलता सांगितलेले, जाता जाता कानावर पडलेले अशा गोष्टी अचानक आठवतात व उत्तर लिहिण्यात मदत होते. याच तंत्राचा वापर करून आपण group discussion च्या माध्यमातून revision करू शकतो. 
         पुस्तक किंवा नोट्स न उघडता एकत्र बसून जो विषय घेतला आहे त्यातील महत्वाच्या गोष्टी आठवायचा प्रयत्न करावा. चार पाच जण एकत्र बसल्यावर बहुतेक सर्व गोष्टी आठवतातच. जर एखादी गोष्ट आठवली नाही तर शेवटी ती पुस्तकातून पाहून घ्यावी. अशा प्रकारे आठवण्याची सवय ठेवल्यास गोष्टी लक्षात राहायला सुरुवात होते. जर लक्षात राहत नसेल एखादी गोष्ट तर ते आपल्याला वेळीच कळते आणि आपण जाणीवपूर्वक ती लक्षात ठेवायचा प्रयत्न करू शकतो. तसेच तसे केल्याने revision कमी वेळात होते. जेंव्हा आपण वाचनाच्या पद्धतीने revision करतो तेंव्हा ज्या गोष्टी लक्षात आहेत त्याही वाचण्यात आपण वेळ घालवतो आणि त्यामुळे न येणाऱ्या गोष्टींकडे पुन्हा एकदा हवे तेवढे लक्ष दिले जात नाही. याउलट आपण बसून गोष्टी आठवायचा प्रयत्न केला की आपल्याला काय येतंय याची नेमकी कल्पना येते. त्यामुळे मग न येणाऱ्या गोष्टींवर concentrate करता येते.
          तसेच या प्रकारची revision तुम्ही कधीही आणि कुठेही करू शकता. अगदी चहा प्यायला जाताना एकमेकांना प्रश्न विचारून तुम्ही अनेक गोष्टी कायमस्वरूपी लक्षात ठेऊ शकता. उदाहरणार्थ रोज चहा प्यायला जाताना संविधानाचे 5 articles एकमेकांना विचारायचे. मग वेगळा वेळ न देता आपोआप सगळे महत्वाचे articles लक्षात राहतील. तसेच प्रश्न विचारण्याच्या पद्धतीमुळे आपली विचारशक्ती वाढते व मेंदू जास्त क्रियाशीलतेने काम करतो. त्यामुळे ऐन परीक्षेत होणारे confusion, गोंधळ कमी होतो.
           

Group Discussion अधिक परिणामकारक करताना पाळावयाचे नियम:-
१. जो वेळ ठरवला जाईल तो प्रत्येकाने पाळावा. दोन मिनिटे अगोदरच सर्वांनी एकत्र जमावे. बाकीच्या लोकांना आपली वाट पहावी लागू नये याची काळजी घ्या. त्यामुळे इतरांचा वेळ जातो आणि discussion च्या quality वर फरक पडतो.

२.  Discussion मध्ये नियमितता हवी. दोन दिवस केले, मग दोन दिवस गॅप पडला असे नको व्हायला. यामुळे नीट link लागत नाही. आणि उत्पादकता कमी होते.

३. Discussion करताना त्याचे काटेकोर नियोजन हवे. पुढच्या आठवड्यात आपण कोणते विषय करणार, किती वेळ करणार, कशा प्रकारे करणार, प्रत्येक जण काय काय करणार हे सर्व अगोदर ठरवून घ्यावे. तसेच उद्या काय करणार आहे हे आज discussion संपवताना ठरवून मगच उठावे. आणि शक्य तेथवर या नियोजनावर अंमलबजावणी करावी.

४. कामाची विभागणी करणे हे discussion नियमित आणि परिणामकारक होण्यास फार गरजेचे आहे. सर्वजण वेळा पाळतील याची जबाबदारी एकाने घ्यावी, चर्चा भरकटू द्यायची नाही हे एक जण पाहू शकेल, नोट्स बनवायचे काम देखील आळीपाळीने वाटून घेता येईल. प्रत्येकाच्या skill set प्रमाणे विषयांची वाटणी करावी.

५. एका दिवशी एकाच विषय असावा. अनेक विषय घेतल्यास कोणताच व्यवस्थित होत नाही.

६. दिलेल्या वेळेत discussion पूर्ण करावे. अन्यथा चर्चा रंगून खूप वेळ जायची शक्यता असते. 

७. सर्वांना एकाच तराजूत तोलू नये. Group मधील प्रत्येकाच्या क्षमता, skills वेगळे असतात हे कायम लक्षात ठेवा. त्यामुळे सर्वांकडून सारखी अपेक्षा ठेऊ नये. 


Group Discussion ही team मध्ये करायची गोष्ट असल्याने team spirit असावेच लागते. एकमेकांचे यशापयश स्वतःचे वाटावे इतकी जवळीक तयार व्हावी लागते. प्रत्येकाचे input वेगळे असू शकते परंतु सर्वांची commitment मात्र सारखी हवी.
                             -अमोल मांडवे(ACP/DYSP)

          

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला