निर्माल्य

 निर्माल्य


तुझ्या नवीन वाटेच्या सुरुवातीला
माझ्या जुन्या आठवणी विसरायच्यात

तुझ्या नवीन स्वप्नांच्या पहाटेत
माझ्या जागून घालवलेल्या रात्री संपवायच्यात

तुझ्या सुखी जीवनाच्या अवकाशात
माझ्या दुःखाचं आभाळ लपवायचंय

तू नदीसारखी तुझ्या समुद्राला भेटताना
मला त्या डोंगरासारखं पाठमोरं व्हायचंय

तू थंडीसारखी हळूहळू बहरत जाताना
मला पावसासारखं अचानक सरून जायचंय

तू तुझ्या कॅनव्हासवर एक एक रंग भरताना
मला मात्र रोज थोडंस पुसट होत जायचंय

तुझ्या पदरी कायमचा शुक्लपक्ष बांधून
कृष्णपक्ष माझ्या कपाळी धारण करायचाय

तुझ्या शेवटीच्या वैकुंठ वारीवेळी
मला ओवाळून टाकलेलं निर्माल्य व्हायचंय
    -अमोल मांडवे(ACP/DYSP)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला