तू

तू



सह्याद्रीच्या कड्याचा काळा पाषाण मी
आणि तू समुद्राचा निळसर किनारा

विशाल जटाधारी वृक्ष मी
आणि तू गर्द गार सावली

चंद्र गिळालेला दाट अंधार मी
आणि तू चांदणं निखळ रात्रीचं 

त्सुनामीच्या मागून येणारा विध्वंस मी
आणि तू तिथे उमललेलं इवलंसं फुल

उथळ अवखळ खळाळता ओढा मी
आणि तू नदी गूढ गहिरी

रसरसत्या वणव्याच्या राक्षसी दाह मी
आणि तू देव्हाऱ्यातील समई

अथांग अनादी वाळवंट मी
आणि तू ओल्या आठवणींचा शिंपला

-©अमोल मांडवे(ACP/DYSP)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला