अपूर्णत्व

अपूर्णत्व
(Sketch credit: Dearest friend Amol Bhosale)


बदलून गेलेल्या नदीच्या पात्रातील 
सुकलेल्या ओघळांच्या ओरखड्यांसारखं

पाकळ्या गळून गेलेल्या 
बोडक्या हिरमुसल्या देठासारखं

विधवेच्या कपाळावरील 
कुंकवाच्या पांढऱ्या वणासारखं

सूर्य बुडल्यावर मागे उरलेल्या
निराधार निस्तेज कांतीसारखं

कसायाच्या दारात सोडलेल्या वासराच्या
घरच्या दावणीला राहिलेल्या दाव्यासारखं

पिलं घरट्यातून उडून गेलेल्या
म्हाताऱ्या जोडप्याच्या संसारासारखं

लाखो श्वापदांचे अस्तित्व असूनही
निपचित अरण्यातील भयाण शांततेसारखं

तिची दूर जाणारी आकृती साठवत
पापणीवर थिजलेल्या आसवासारखं

      -अमोल मांडवे(ACP/DYSP)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला