मराठी-इंग्रजी वर्णनात्मक पेपर: अभ्यास कसा, कधी , किती करावा.

मराठी-इंग्रजी वर्णनात्मक पेपर:


        अगोदर 200 मार्क्स साठी असणारा हा घटक आता मराठीसाठी 50 आणि इंग्रजीसाठी 50 असा 100 गुणांचा करण्यात आला आहे. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मराठी आणि इंग्रजीचे गुण अंतिम निकालात पकडले जात नसल्याने कधी कधी सुरुवातीला विद्यार्थ्यांचा असा ग्रह होतो की राज्यसेवेच्या परिक्षेतही या पेपर चे गुण फक्त qualifying आहेत. परंतु तसे नसून या पेपर चे मार्क अंतिम निकालात पकडतात आणि किंबहुना निकालात उल्लेखनीय फरकही पाडतात.

वर्णनात्मक पेपर चे महत्व:
         सगळी परीक्षा objective type प्रश्नांची असल्याने ज्यांना वर्णनात्मक पेपर मध्ये गती आहे त्यांना हा एकच पेपर आधार देतो. तसेच objective type पेपर मध्ये अनिश्चितता खूप जास्त असते. म्हणून मग त्यातल्या त्यात थोडेफार स्थैर्य आणण्याचे काम हाच पेपर करतो. या पेपर मध्ये जर खूप जास्त मार्क पडले तर तुमचा न येणार result येऊ शकतो, तुम्हाला क्लास 2 पोस्ट मिळणार असेल तर क्लास 1 मिळू शकते. आणि तुम्ही जर टॉप च्या पोस्ट साठी प्रयत्न करत असाल तर मग यामध्ये उत्तम मार्क पडण्याशिवाय गत्यंतर नाही. 
          मला स्वतःला जेंव्हा सहाय्यक निबंधक ही पोस्ट मिळाली होती तेंव्हा मुख्य परिक्षेत फक्त 220 गुण होते. या मार्कांवर पोस्ट तर दूर, मुख्य परीक्षा उत्तीर्ण होणे देखील अशक्यप्राय होते. परंतु माझी मुख्यपरिक्षा उत्तीर्ण तर झालीच व  फर्स्ट चॉईस क्लास 2 पोस्ट देखील मिळाली. आणि क्लास 1 पोस्ट थोडक्यात गेली. नंतर जेंव्हा मी result पहिला त्यात मला मराठी-इंग्रजी वर्णनात्मक पेपर मध्ये 130 मार्क्स मिळाले होते. म्हणजे फक्त या एका पेपर मुळे मला पोस्ट मिळाली. अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यामध्ये फक्त या पेपरमुळे विद्यार्थी अधिकारी झालेत आणि काही जण मात्र फक्त याच पेपर मुळे अधिकारी होऊ शकले नाहीत. म्हणून नेहमी दुर्लक्षिल्या जाणाऱ्या या पेपर कडे इतर पेपर इतकेच महत्व देणे गरजेचे आहे.
         वर्णनात्मक पेपर चे मार्क 200 वरून 100 वर आल्याने हा पेपर विद्यार्थ्यांकडून दुर्लक्षित होण्याची शक्यता वाढली आहे. परंतु हीच धोक्याची घंटा समजून वेळीच या विषयाची पुरेशी तयारी करणे उचित ठरेल. आता याची तयारी कशी करायची हे पाहू.

वर्णनात्मक पेपर चा अभ्यास कधी करावा:
         बऱ्याचदा परीक्षेच्या 7-8 दिवस किंवा फार फार तर 1 महिनाभर अगोदर विद्यार्थी या विषयाकडे मोर्चा वळवतात. तेंव्हा नेमके इतर विषयांचा अभ्यास न झाल्याने tension आलेले असते आणि मग हा विषय फक्त वर वर पाहिला जातो. सराव तर अगदी क्वचित केला जातो. आणि मग हमखास कमी मार्क्स पडतात. काही लोकांना लिखाणात सुरुवातीपासूनच गती असते. ते इतरांना सांगतात की या विषयाचा अभ्यास 2 दिवसांचा आहे फक्त वगैरे. पण सर्वांना इतकी गती असेलच असे नाही. 
          म्हणून या विषयाचा अभ्यास देखील पूर्व परीक्षा झाल्या झाल्या लगेच सुरु करावा. अगदी सुरुवातीला रोज अभ्यास करायची गरज नाही पण आठवड्यातून 2 दिवस प्रत्येकी 4-5 तास वेळ दिला तरी पुरेसा ठरतो. तसेच प्रत्येक weekend ला एक पेपर सोडवून पाहायला हरकत नाही. एका शनिवारी मराठी सोडवावा, पुढच्या शनिवारी इंग्रजी सोडवावा. 
          जशी परीक्षा जवळ येईल तसे अभ्यासाचे तास व सरावाची वारंवारता वाढवावी.

वर्णनात्मक पेपर चा अभ्यास कसा करावा:

वर्णनात्मक पेपर अभ्यास करायला अतिशय सोप्पा पण थोडासा tricky आहे. मराठी आणि इंग्रजी दोन्ही पेपर मध्ये निबंध, भाषांतर आणि सरांशलेखन एवढे तीनच प्रश्न असल्याने खुप अभ्यास करावा नाही लागत, परंतु यातील कोणत्याही प्रकारात एखादी लक्षात येण्यासारखी चूक झाली तर मार्क्स एकदम खूप कमी होतात. म्हणून तिन्ही बाबींचा व्यवस्थित नियोजनबद्ध अभ्यास व सराव लागतो.

यातील निबंध , भाषांतर, सारांश लेखन या प्रत्येकाचा अभ्यास कसा करावा आणि जास्तीत जास्त गुण कसे मिळवता येतील याचे सविस्तर विवेचन "राज्यसेवा : यशाची गुरुकिल्ली" MPSC Planner या पुस्तकात दिले आहे. सर्व मुख्य परीक्षा देणाऱ्या aspirants ना हे पुस्तक उपयोगी पडेल अशी अपेक्षा आहे.

पुस्तक ज्ञानदीप बुक सेंटर आणि खालील लिंक वर ONLINE उपलब्ध आहे.

https://www.amazon.in/Dnyandeep-Planner-Rajyaseva-Yashachi-Gurukilli/dp/B07DK8T85X/ref=mp_s_a_1_1?ie=UTF8&qid=1534097621&sr=8-1&pi=AC_SX118_SY170_FMwebp_QL65&keywords=amol+mandave&dpPl=1&dpID=51OeXDlhoCL&ref=plSrch

              - अमोल मांडवे( DySP/ ACP) 

Comments

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला