तुझ्या प्रत्येक नसण्याबरोबर

तुझ्या प्रत्येक नसण्याबरोबर



तुझ्या प्रत्येक न येण्याबरोबर तू थोडी थोडी सरत गेलीस
वाळूच्या किल्ल्यासारखी लाटेबरोबर विरत गेलीस

तुझ्या प्रत्येक आठवणीसह स्वप्नांचं विश्व बहरून येतं
मात्र तुझं न येणं स्वप्नांसह आणखी काहीतरी घेऊन जातं

कारणं बरोबर असतीलही पण ती माझ्या प्रेमाहुन मोठी का व्हावी?
चुकार ढगाने एखाद्या संध्याकाळची लाली हिरावून का न्यावी?

दर वेळी तुझ्या चाहुलीने माझ्या क्षितिजावर वसंत उतरतो
वाट पाहून ग्रीष्मभर तुझी, मनी कुसळांचा माळच माळ उरतो

बंद पापण्याआडच्या माझ्या दुनियेत तू नित्य उत्कट भेटत गेलीस
मुठीतल्या ओल्या वाळूसारखी हलकेच डोळयांसमोर निसटत गेलीस

माझ्या अवकाशात विरहाचं चांदणं शिंपत गेलीस
आठवणींची कवाडं तुझ्याच हाताने लिंपत गेलीस

तुझ्या प्रत्येक नसण्याबरोबर तू थोडी थोडी सरत गेलीस
तुझ्या प्रेमासाठी कसलेल्या शिवारात विरह पेरत गेलीस
           ©अमोल मांडवे(ACP/DYSP)



Comments

  1. तुझ्या प्रत्येक नसण्याबरोबर ..बरोबर असण्याची एक पाऊल टाकत गेली ....
    One year is complete today..
    It is a beautiful poem...

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete

  2. तुझ्या प्रत्येक नसण्याबरोबर ..बरोबर असण्याच एक पाऊल टाकत गेली ....
    One year is complete today..
    It is a beautiful poem...

    ReplyDelete
  3. Khup sundar sir 👌🏻

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला