मर्यादा

मर्यादा


निखाऱ्याने जळत राहावे
पोलादी इराद्यांना आकार द्यावे
पाणी पडण्यापूर्वीच मात्र
स्वतःहून विझून राख व्हावे

सूर्याने प्रखर तळपावे
तृणी-पानी जीवन द्यावे
ढगाने झाकोळण्याआधी
डोंगराआड बुडून जावे

रात्रीनेही मनसोक्त जागावे
मनोमनी स्वप्न पेरावे
परी ऊनं पडण्याआधी
संधीप्रकाशात दडून बसावे

वाऱ्यानेही वाहत जावे
सागरावरी वादळ व्हावे
किनाऱ्याच्या कुशीत जाता
प्रेमभराने झुळूक बनावे

समुद्राने सामावून घ्यावे
लाटेरूपी थोडे देत जावे
अमूर्त तरी अमर्यादंच तो
किनाऱ्यापाशी परी नम्र व्हावे     

भरभरून प्रेम करावे
कोणाचेतरी होऊन जावे
स्व व स्वत्व संपण्याआधीच
काही पाश सैल करावे

       -अमोल मांडवे(ACP/DYSP)

Comments

  1. खूप छान रचना..

    ReplyDelete
  2. अप्रतिम, सुंदर व मनाला भावतील अशी शब्दरचना :)

    ReplyDelete
  3. अनमोल आणि सुंदर शब्दांची मांडणी

    ReplyDelete
  4. अप्रतिम लिहलेस तू

    ReplyDelete
  5. Masst ch as always

    ReplyDelete
  6. खूब छान आहे ..sir

    ReplyDelete
  7. Omg this poem is sooooo sweet and i loved it!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! wow its just so awesome!!!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला