सीतायण

सीतायण

रामावर चिडणारा मी
आता सीतेचा राग येतो
चारित्र्याने का कुठे
समाज कलंकित होतो

जंगलातच राहायचं होतं तर
अग्निपरीक्षा नाकारायची होती
कोणीतरी बोट दाखवण्याआधी
स्वतः वाट शोधायची होती

मर्यादांनी बांधलेल्याकडून
कशाला आधाराची अपेक्षा
प्रेमापोटीच का होईना
करून का घ्यावी उपेक्षा

तो नायक झाला
रामायण घडलं
अघटिताचं पातक
तुझ्या माथी पडलं

पुरुषी अरेराविचा गळा
तेंव्हाच घोटता आला असता
तुझं नाव काढलं की
कारुण्याचा वर्षाव झाला नसता

तू धैर्य दाखवलंस
थोडी तिडीक दाखवायचीस
तू औदार्य दाखवलंस
थोडी स्वार्थी बनली असतीस

तुझ्या एका त्यागाने
पुरुषार्थ झाकोळला
स्त्रीत्वाचा मतितार्थ
कालातीत डागाळला
      -अमोल मांडवे(ACP/DYSP)

Comments

  1. अप्रतिम अमोल, खुप छान

    ReplyDelete
  2. Excellent.. काव्याची गरजा पूर्ण लक्षात ठेवूनही अत्यंत उत्तम रचना, तितकीच अर्थपूर्ण

    ReplyDelete
  3. सुंदर. एकविसाव्या शतकाशी सुसंगत विचार

    ReplyDelete
  4. Khup ch marmik ahet tumchya kavita

    ReplyDelete
  5. Excellent sir.. that incident remarks the male domination

    ReplyDelete
  6. Khupch sundar...kadachit ase zale asate tr

    ReplyDelete
  7. खुप छान आहे कविता चांगले औचित्य साधुन सादर केलीत सर .

    ReplyDelete
  8. Wow. Very sharp.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला