दुःख नियोग

दुःख नियोग


आपल्याच हातांनी 
धारदार तलवार
आपल्याच छातीत
वीतभर भोकसावी

हृदयातली पीडा
रक्ताच्या धारेसह 
बाहेर पडते का
स्वतःच पहावं

जखमेच्या पोकळीत,
तलवारीच्या पात्यावर,
ओघळत्या रक्तात,
कोणी-काही आहे का पहावं

कंठातून ओठामार्गे,
डोळ्यातून अश्रूमार्गे,
मज्जेतून वेदनेमार्गे,
कोणी-काही जातंय का पहावं

आठलेल्या रक्तात,
मिटलेल्या पापण्यात,
गोठलेल्या जाणिवांत,
कोणी-काही उरलंय का पहावं

सगळ्याची होळी करून
राखेचं अर्घ्य देऊन
सरिता सिंधुस मिळताच
दुःख नियोग


        -अमोल मांडवे(ACP/DYSP)





Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला