विदर्भ-संध्या

विदर्भ-संध्या


पालाशाच्या माथ्यावर
लक्ष सूर्य मावळले
पालाशाचे रंग केसरी
ओठी तुझ्या अवतरले


पश्चिमेला क्षितिजावर
घन काळे-दाट उतरले
डोंगराच्या खांद्यावर
आभाळ ते गहिवरले

विद्युल्लतेच्या कटाक्षाने
क्षण काही उजळले
घराघरातून पाड्यावर
समया-दिवे पाजळले

पानझडीची करडी चादर
तृणांचे गालिचे पसरले
शेंड्यांवरची चुकार पाने
परी तयांनी नभ झाकोळले



बांबूच्या बनी सळसळ
वाऱ्याने सूर आळविले
फांदीवर भेदरले घरटे
पंख पिलांनी पांघरले



दिवस रात्रीच्या प्रणयात
अरण्य सारेच हरविले
संध्येच्या रम्य मिठीत
भावही मनीचे शहारले
                         -अमोल मांडवे(ACP/DYSP)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला