वस्त्रहरण

प्रस्थापित गोष्टींचा जरा बारकाईने विचार केला की अनेक गोष्टी खटकू लागतात. संपूर्ण समाजच दांभिक असल्याचे दाखले मिळू लागतात. आणि मग रामायण-महाभारतात रचल्या गेलेल्या या गोष्टींची खरच समाज-घडणीसाठी आवश्यकता होती का असा प्रश्न पडतो. आणि मग त्याच गोष्टी एका वेगळ्या angle ने पहायची गरज वाटते.


वस्त्रहरण

अपमानापोटी जन्मलेली
एका स्त्रीसाठीची 'आसक्ती'
सामर्थ्याचा महामेरू असूनही
तिच्या इच्छेची वाट पाहणारी

या वृत्तीस आम्ही
दहा तोंडे लावून
दर वर्षी जाळतो,
टाळ्या पिटत नाचतो ही

भावास 'वर'लेल्या स्त्रीची
भावांनाच आसक्ती व्हावी
'आदर्श' म्हणवणाऱ्या आईनेही
ती पाचांत वाटून द्यावी

'त्यागाचे' यांच्या गोडवे 
हजार सहस्त्र ओव्या
भजनी किर्तनी महती
कारण 'हरी' पाठीराखा

बायकोची वस्त्रे
पणाला लावून
शमीवरची शस्त्रे
जनाला दाखवून

सहानुभूतीच्या रथात
युगानुयुगे आरूढ होऊन
लोकांच्या डोळ्यात धूळ उडवत
कृष्ण 'सारथ्य' सुरूच आहे

त्या धुळीला गुलाल समजून
आम्ही माथी लावून फिरतो
प्रस्थापितांनी केलेला अन्याय
साग्रसंगीत 'साजरा' करतो
           -अमोल मांडवे(ACP/DYSP)

Comments

  1. Few people are souls. You are gem. You have beautiful bank of emotions. Vastraharan narrates history but our thoughts , values and ethics in present.!! It's really difficult to feel the deepness and crux of of vastraharan

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला