जंगलाचं रात-गाणं

जंगलाचं रात-गाणं
(In Photo: Harshwardhan Jadhav)


हुंकारून कोणी शृंगार वाटतं
गहिवरून कोणी दुःख मागतं
आरवून कोणी रान जागवतं
बावरून कोणी तार केकाटतं

चुकार पक्षी मधेच चिर्र करतो
रातकीडा एकसारखा किर्रर्र करतो
बुंध्यावर टक टक ढाल करतो
शेंड्यावर चक चक ताल धरतो

डरकाळीचं आव्हान
गुरगुरणारी माघार
भेदरलेली आरोळी
चवताळलेला फुत्कार

पानांची सळसळ
जणू बालपण खेळतं
फांद्यांमधली घरघर
जसं यौवन बोलतं

ऐकता अंतरंग वनीचे
नीरव स्तब्धता कानी येते
कवेत घेऊनी अरण्य
समाधानाची ऊब देते

         - अमोल मांडवे(ACP/DYSP)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला