दुर्योधन(मूर्तिमंत वाईटपणा)

चांगल्या-वाईटाच्या आपल्या कल्पना इतक्या दृढ असतात की आपण त्याची लेबल घेऊनच फिरत असतो. कोणाला ती चिटकवता येतील हाच शोध सतत सुरू असतो. एकदा लेबल लागलं की त्या माणसाला त्यातून बाहेर पडायचे सर्व दरवाजे आपण बंद करून टाकतो. फक्त आपल्या कोणालातरी वाईट म्हणायच्या अट्टाहासासाठी. त्या वाईटात चांगलं शोधायचा प्रयत्न.


दुर्योधन(मूर्तिमंत वाईटपणा)


असेलही दगडच तरी
त्याचा पाझर कोरडा असतो का?
पायात मोडून तुटणाऱ्या
काट्याचा काही जीव नसतो का?

गाढव म्हणून हिणवलं तरी
जगाचं ओझं वाहतंच की
कुत्रं भटकं असलं तरी
दगड लागला की दुखतंच की

चपलाच घेणारा माथ्यावर सदोदित
कधी मंदिराच्या पायरीचा दगड असतो
स्वच्छ घराची लाज सांभाळत पाठीमागे
एक बेअब्रू झालेला उकिरडा दिसतो

न बरसणाऱ्या ढगालाही
कोरडा का असेना उमाळा असतो
वांझ नारळाच्या मनातही
एक हिरवा-ओला शहाळा वसतो

वाईटाच्या शिक्क्याखाली
चांगुलपणाचा कोंडमारा होतो
जीव घेणाराचाही जीव
मरणारा जाताना घेऊन जातो
                         - अमोल मांडवे



Comments

  1. Apratim shabdache arth ahet.

    ReplyDelete
  2. कवितेचे प्रत्येक कड़वे अनेक गोष्टी विचार करायला भाग पाडते...very profound

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला