संभ्रम

संभ्रम


दिवस आणि रात्रीमधील
अंधुक संधीप्रकाशाचा
ना हवा ना धड पाणी
मधेच तरंगत्या धुक्याचा

स्वप्नांच्या मागे धावणाऱ्या
साखर झोपेचा
वाट बघत घातलेल्या
आणखी एका खेपेचा

दिवसा उजेडात लावलेल्या
देवघरातील समईचा
हमखास अडचणीत आणूनही
न सुटणाऱ्या सवयीचा

गरजेच्या गणितात न बसणाऱ्या
एखाद्या सुप्त आवडीचा
विना-उत्तराचे प्रश्न चघळणाऱ्या
गावातील चावडीचा

दरवेळी विसराव्या वाटणाऱ्या
एखाद्या आठवणीचा
पिल्लांना पंख फुटल्यावर
घरट्यातील पक्षिणीचा

समुद्रात शिडाविना फिरणाऱ्या
किनारा-आसक्त नावेचा
अवचित सहज बहरलेल्या
नात्याच्या नावाचा

       -अमोल मांडवे


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला