पथदर्शक

When we are demotivated due to ignorant society and uncalled criticism, this could be the way out!

 पथदर्शक


लोक तुझा कुत्सित उपहास करतील
तू मात्र हेतुपुरस्सर चालत राहा

लोक तुझ्याकडे दुर्लक्ष करतील
तू छान जागा पाहून खड्डा काढ

लोक तुझा सहेतुक परित्याग करतील
तू त्या खड्ड्यात माती अन खत टाक

लोक तुला तुच्छ म्हणून हिणवतील
तू एक इवलीशी बी आणून त्यात रोव

लोक तुझा सामूहिक तिरस्कार करतील
तू हळुवार पाणी घालून निर्माता हो

'लोक' अंतर्मुख होऊन खंगु लागतील
तुझं रोपटं बहरून वटवृक्ष होईल
        - अमोल मांडवे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला