Quarantine

Quarantine

(Sketch Credit : Amol Bhosale)


आमचेच आत्मे
पिना टोचून
आम्हीच टाकले
कोनाड्यात!

आमच्याच मनांना
डबीत भरून
आम्हीच टाकले
अडगळीत!

आमच्याच इंद्रियांना
लाडाऊन ठेऊन
आम्हीच बनवले
विषयासक्त!

स्वातंत्र्याच्या पतंगाचे
आम्हीच कापून दोर
अंगभर मढवला
स्वैराचार!

शरीरावरील एवढ्याशा
निर्बंधाने कोसळते
केवढे आभाळ
आमच्यावरच!

आत्म्यावर एकांतात
अंतिम संस्कार करून
'उर' बडवायला मात्र
गावासमोर!

कधीच मेलेल्या स्वतःच्या
मरणाच्या भीतीने
कोंडून घ्यावे लागते
आम्हास स्वतःलाच!
       - अमोल मांडवे


Comments

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला