शेवटचा एक आठवडा#MPSC_Prelim

                        शेवटचा 1 आठवडा # MPSC राज्यसेवा पूर्वपरिक्षे पूर्वीचा




कोणत्याही पूर्व परिक्षेवेळी शेवटचा 1 आठवडा हा अत्यंत महत्वाचा असतो. या अगोदर केलेले सर्व श्रम फलित होणार की नाही हे बऱ्याचदा हा एक आठवडा ठरवतो. शेवटच्या 4 तासात उत्तम perform करून जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी या 1 आठवड्यात पुढील गोष्टी केल्या तर निश्चित फायदा होऊ शकेल-


1) विश्वास ठेवा की जेवढा गरजेचा होता तेवढा तुमचा अभ्यास ऑलरेडी झालेला आहे. चुकून काही राहीले असेल तर त्याने एकूण परीक्षा किंवा निकालावर फारसा परिणाम होणार नाही. त्यामुळे तुम्ही पास होण्याकरिता लागणारा सर्व अभ्यास केला आहे हे स्वतःच्या मनाला पटवून द्या.


2) परीक्षेत आपण पास होऊ की नाही हा विचार मनातून पूर्णतः काढून टाका. अभ्यास करणे तुमच्या हातात आहे ते करत राहा. तुम्ही आवश्यक तो अभ्यास केलेला आहे आणि आता फक्त फॉर्मलिटी म्हणून जाऊन परीक्षा द्यायची आहे अशा mindset ने परीक्षेला जा. 


3) शेवटचे 2 आठवडे म्हणजे शेवटची 1 revision. अगोदर वाचलेल्या सर्व गोष्टींची एक revision या वेळेत पूर्ण करा. सर्व विषयांना पोहोचायचा प्रयत्न करा. यामध्ये पुनः पूर्ण वाचन अपेक्षित नाही. सर्व अभ्यासक्रमाचा ओझरता आढावा आणि अत्यंत महत्वाच्या पायाभूत फॅक्ट डोळ्याखालून घालणे या कालावधीमध्ये महत्वाचे. सर्व गोष्टी डिटेल मध्ये वाचण्याचा अट्टाहास नको.


4)"अभ्यास झाला का?" किंवा "अभ्यास किती झाला" या विषयावरील बोलणे पूर्णपणे बंद करावे. यावर चर्चा करणाऱ्या लोकांपासून शक्यतो लांब राहावे. बऱ्याचदा अभ्यास किती झालाय यापेक्षा mindset काय आहे त्यावर यश ठरतं.


5) discussion ने अभ्यास या कालावधीमध्ये कमी करावा. 


6) CSAT चे प्रॅक्टिस शेवटच्या दिवसापर्यंत कायम ठेवावे. त्यामूळे पेपर दिवशी विचारांचा वेग जास्त राहून CSAT मध्ये जास्तीत जास्त attempt होऊ शकतो.


7. आता पेपर सोडवले तर ते चेक करून किती मार्क पडतात हे पाहणे बंद करावे. त्यामुळे अनावश्यक ताण येऊ शकतो किंवा mind occupy राहू शकते. त्यामुळे सराव करा पण चेक करून मार्क किती पडतात वगैरे पाहत बसू नका.


8. चालू घडामोडी वगैरे चे नवीन material वाचायची काहीही गरज नाही. अगोदर जे केले आहे तेच revise करावे.


9. या काळात peripheral topics पेक्षा मूलभूत विषयांवर जास्त भर द्यावा. त्याच्या revision कडे जास्त लक्ष द्यावे. Benifit to efforts ratio जास्तीत जास्त ज्यात राहतो असे विषय फोकस मध्ये असावेत.


10. Hall ticket, जो वापरणार असाल तो पेन आणि exam centre ला जाण्याची व्यवस्था या गोष्टीची अगोदर च तयारी करून ठेवा. हे सर्व शेवटच्या दोन दिवसात करायला गेला तर विनाकारण धावपळ होऊ शकते. त्याच बरोबर यावर्षी एक वेगळा नवीन मास्क व sanitizer परीक्षेला न्यायच्या साहित्यात घेऊन ठेवा. ऐनवेळी यातील काही विसरायला नको.


11. Centre ला जाताना खाण्यासाठी काहीतरी व पाणी घेऊन जा. बऱ्याच ठिकाणी जवळपास कोणतीही सोय नसते. आणि Covid च्या अनुषंगाने ते गरजेचे देखील आहे.


12. झोप आणि जेवण यांचे time table व्यवस्थित सेट करून घ्या. कमी झोपेमुळे किंवा यावेळी जेवण यामुळे concentration वर परिणाम होतो. तो यावेळी टाळलेला बरा. 


 अभ्यास जेवढा तेवढाच किंबहुना त्यापेक्षा जास्त तुमचा तुमच्या प्रयत्नांवरील तुमचा विश्वास यशासाठी जास्त महत्वाचा आहे. तुम्ही शक्य ते सर्व प्रयत्न व कष्ट केलेत हे स्वतःला ठामपणे सांगून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा. All The Best!!

                      - अमोल मांडवे(ACP)

Comments

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला