Posts

डंख

                         डंख तुझीच म्हणत म्हणत दुसऱ्याची होताना ढगाआड लपत लपत चंद्र पाताळी जाताना तुझ्या पावलांचे ठसे उरतातच भल्या पहाटेच्या मंद चांदण्यासारखे तुझ्या प्रेमळ आश्वासनांचा खच पडलेला दिव्याभोवती मरून पडलेल्या चिलटांसारखा तुझ्या पोकळ काळजीचा शब्दसडा विस्कटलेला वादळाने उधळलेल्या वाळक्या कस्पटांसारखा                    तुझ्या आठवणींचा व्रण उरतोच                    अश्वत्थामाच्या भळभळत्या जखमेसारखा तुझ्या गोड हाकांचा गहिवर झालेला गाईपासून तुटलेल्या वासराच्या हंबरड्यासारखा तुझ्या हळव्या स्पर्शाचा ओरखडा झालेला काट्यांमध्ये अडकून फाटलेल्या पदरासारखा                    तुझ्यावरच्या मायेचा अंश राहतोच                    दगडाखाली गारव्याला बसलेल्या विंचवासारखा       ...

"राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तयारी कशी करावी"

Image
MPSC चे यावर्षीचे वेळापत्रक आल्याने आणि पूर्वपरीक्षा फेब्रूवारी महिन्यात असल्याने बऱ्याच लोकांचा मोर्चा परत prelim च्या अभ्यासाकडे वळाला असेल. तसेच prelim 4 महिन्यावर आली असल्याने पहिल्या attempt वाल्यांना तयारी बाबत अनेक प्रश्न पडत असतील तर त्यावर काही उत्तरे जशी मला माझ्या स्पर्धापरिक्षा प्रवासात समजली तशी देत आहे. Prelim चा अभ्यास कधी सुरु करावा?                ज्यांनी अगोदर Mains दिली आहे किंवा mains चा पूर्ण अभ्यास केला आहे त्यांच्यासाठी 3 महिने हा कालावधी prelim साठी पुरेसा आहे. परंतु ज्यांना अगोदर prelim मध्ये अपयश आलेले आहे त्यांनी आणि पहिला attempt असलेल्यांनी 4-5 महिन्याचा कालावधी राखून ठेवावा. कारण prelim पास न झाल्यास mains च्या अभ्यासाचा कसलाही फायदा नाही. म्हणून किती अभ्यास लागणार आहे त्याचा अंदाज नसेल तर लवकर सुरु करणे कधीही उत्तम. प्रत्येकाला स्वतःच्या वाचनाच्या गतीनुसार आणि अगोदर च्या अभ्यासाच्या अंदाजावर किती कालावधी लागणार हे ठरवावे लागेल. कोणत्या पेपर ला जास्त महत्व द्यावे?             ...

संध्याकाळच्या गोष्ठी(१)

Image
                  संध्याकाळच्या गोष्ठी(१)                  SKETCH CREDIT: Amol Bhosale(Dy Superintendent of Land Records) पावसाचे काळे ढग दाटून आलेल्या आभाळासारखे डोळे भरून आले होते, अंधारून गेलं सगळं. ओघळणारा प्रत्येक अश्रू, काळ्या ढगातून लख:कन खाली येणाऱ्या विजेसारखा, जाळून टाकणारा. प्रत्येक अश्रू बरोबर एक एक आठवण गळून पडत होती. माझ्यातली ती हळू हळू विरून झडत होती. गालावरून ओघळणाऱ्या अश्रूंच्या स्पर्शात तिच्या सहवासाची उत्कट भावना परत आठवत होती. पण गम्मत बघा ना, बरं वाटण्याआधीच तो अश्रू गालावरून ओघळून मिसळून जायचा मातीत. समोर दिसायची मग फक्त रिकामी खुर्ची आणि चहाचा अर्धा संपलेला कप. सगळा चहा संपवण्या एवढाही वेळ नव्हता तिच्याकडे. अचानक वाटलं मीच बुडतोय त्या अर्ध्या राहिलेल्या चहात, पण ते पण धुसरच दिसायचं भरलेल्या जड पापण्याआडून. आणि मग अश्रूंचा महापूर. माझ्याच मरण्यावर माझ्याच डोळ्यांनी केलेल्या आक्रोशातून. थेंब थेंब ओघळणाऱ्या आठवणी खळखळ वाहू लागल्या, गढूळ ओढ्यासारख्या. या आठवसरींना उलट-सु...

पाऊस.. पडायचं विसरून गेलेला

Image
पाऊस.. पडायचं विसरून गेलेला    (Sketch credit-Amol Bhosale, Dy Superintendent of Land Records)       पाऊस.. पडायचं विसरून गेलेला       डोळ्यातला पूर ओसरून गेलेला ।। ढग येतात दाटून पण पांढरे फिक्कट गतप्राण डोळ्याचे तेजहीन बुब्बुळ जणू क्षितिजावरून येताना आशा आणणारा आईला पोटातल्या जिवाच्या पहिल्या चाहुलीसारखा पण तू आशेबरोबर पाणी आणायला विसरून गेलेला पुन्हा एकदा डोळ्यातला पूर ओसरून गेलेला ।।           कडाडणाऱ्या विजांचा प्रकोप           गडाडणाऱ्या ढगांचा प्रक्षोभ           लतातांडवात जाणारे जीव           छत्ररहितांची येणारी कीव सगळं क्षम्य होतं तू आणणाऱ्या अमृतासाठी तू मात्र आशेच्या किरणांवर ग्रहण पसरून गेलेला पुन्हा एकदा डोळ्यातला पूर ओसरून गेलेला ।। श्रावणात श्रावण पकडल्यासारखाच अडलास गणपतीत गणपतीसारखाच दीड दिवस पडलास हत्तीच्या नक्षत्रातसुद्धा रुसल्यासारखा वागलास आभाळाची माया,धरतीचा वसा सहज त्यागलास तरीही तुला बोल नाही ...

I had a dream. Yours.

Image
                     I had a dream. Yours.            {Sketch credit-Amol Bhosale(Dy.                     Superintendent of Land Records)}            I had a dream. I have rehearsed it in my mind so many times.            I have a house at the foothills of the almighty Sahyadri. A single storey house. Surrounded by the trees, many and different-a few flowering ones. Because she loves them.            My wife goes to work, kissing me on the forehead. I stand in the balcony, waving to her as she closes the old rusted iron gate of our compound wall. As she gets out of sight, i get on with my pen and paper. For the whole day, I think, I imagine, I see and finally I write... alphabets, words, lines, pages, poems, stories, books.         ...

तुझ्या आठवणीत भिजताना

Image
                     तुझ्या आठवणीत भिजताना                         ढग दाटून आले की तुझी किणकिणणारी पैंजणे आठवतात पाऊस आणणाऱ्या ढगांसारखी ती तुझ्या येण्याची चाहूल देतात    पावसाच्या कोसळणाऱ्या सरी पाहता                        तुझे ओलेचिंब केस आठवतात    खिडकीवर ओघळणाऱ्या सरींसारखे                        ते तुझ्या चेहऱ्यावर पसरतात    मग मी खिडकी उघडून काही धारा                        चेहऱ्यावर घ्यायचा प्रयत्न करतो    तू तुझ्या केसांमधील पाणी झटकून                          जागी करतीयेस असा भास होतो.                   मात...

"My Strategy" for MPSC State Services Mains- Amol Mandave(ACP/DYSP)

MPSC राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करताना जेवढा उत्साह असतो तेवढीच भीतीही असते. भविष्याच्या उत्तुंग स्वप्नांबरोबरच अनिश्चिततेची अंधारी झालर देखील असते. आपण प्रचंड उत्साहात आणि गतीने अभ्यास सुरु करतो. परंतु याचवेळी काही प्रश्न आणि शंका मनात घर करून बसलेल्या असतात. त्यापैकी काही  common  प्रश्नांची उत्तरे जशी मला माझ्या अभ्यासाच्या प्रवासात उमगली तशी सांगायचा एक प्रयत्न. Strategy: अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी अभ्यासक्रम आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका यांचा सखोल अभ्यास करणं अत्यावश्यक आहे. राज्यसेवची  preliminary परीक्षा जेवढी  unpredictable  आहे तितकीच मुख्य परीक्षा  predictable  आहे. मागील  5  वर्षांच्या प्रश्नपत्रिका नीट अभ्यासाल्या तरी  15-20%  अभ्यास पूर्ण होतो. आणि बाकीच्या अभ्यासाला दिशा मिळते ती वेगळी.            पुण्यातील विविध  classes  आणि  post-holders  यांनी अभ्यासक्रमातील सर्व घटकांवर पुस्तके काढून  sources  चा प्रश्न सोडवला असला तरी एकाच विषयाची अनेक पुस...