तू घरी नव्हतास म्हणून.....
तू घरी नव्हतास म्हणून...... Sketch credit: Amol Bhosale(DSLR) तू घरी नव्हतास म्हणून मग भिजले पावसात अंगांगावरून ओघळणारा तुझा स्पर्श आठवत ओठांवरच्या थेंबांना तुझ्या ओठांची सर नाही पण ओठांवरून मानेवर मात्र पाऊस तुझ्यासारखाच उतरतो थंडगार पावसात वाऱ्याची झुळूकही उष्ण जाणवते खांद्यांवर विसवणाऱ्या तुझ्या फुलत्या श्वासांसारखी भिजल्या मातीच्या गंधाला तुझ्या गंधाची सर नाही ...