Posts

तू घरी नव्हतास म्हणून.....

Image
              तू घरी नव्हतास म्हणून......                Sketch credit: Amol Bhosale(DSLR) तू घरी नव्हतास म्हणून                     मग भिजले पावसात अंगांगावरून ओघळणारा                     तुझा स्पर्श आठवत ओठांवरच्या थेंबांना                     तुझ्या ओठांची सर नाही पण ओठांवरून मानेवर मात्र                     पाऊस तुझ्यासारखाच उतरतो थंडगार पावसात वाऱ्याची                      झुळूकही उष्ण जाणवते खांद्यांवर विसवणाऱ्या                       तुझ्या फुलत्या श्वासांसारखी भिजल्या मातीच्या गंधाला                       तुझ्या गंधाची सर नाही पदरावरून कमरेवर मात्र                       पाऊस तुझ्यासारखाच दरवळतो पैंजनावरचे थेंब                     हळुवार पायावर उतरतात केसांमधले थेंब खट्याळ,                     पाठीवर खेळत बसतात पावसाच्या वाढत्या जोराला                     तुझी सर नाही ओसरता पाऊस मात्र तुझ्यासारखाच                     माझ्या मिठीत मुरत जातो                       -अमोल मांडवे(DYSP)                  

जायचं का परत खेड्याकडे?

                    जायचं का परत खेड्याकडे? दोन्ही जावई आज टीव्ही वर झळकले पण सासऱ्यांच्या जीव मात्र नखात आला. एकीकडं एका जावयाने कांद्याचं विक्रमी उत्पन्न काढलं म्हणून सरकारकडून बक्षीस मिळालं तर दुसरा जावई एल्फिन्स्टन ला झालेल्या चेंगराचेंगरीतून जेमतेम वाचला. पोरीनं बसून खावं म्हणून तिला मुंबईला कामाला असलेला मुलगा पहिला. दुसरीला मात्र नाईलाजास्तव एका शेतकऱ्याला दिली ते पण तिला काम करावं लागणार नाही या बोलीवर.            पहिली जिला सुखात राहावी म्हणून मुंबईत दिली तिचं काही नवऱ्याच्या पगारात भागेना. पगार चांगला होता आणि वेळच्या वेळी वाढत पण होता पण महागाई काय जवळ येऊ देत नव्हती. नवरा 6 ची ट्रेन पकडतो म्हणून हिची धावपळ 5 पासूनच. धावपळ करूनदेखील काही ताजे नव्हतेच मिळत खायला. गटारावरच्याच भाज्या. पगारात भागत नाय म्हणून मग शिवण मशीन. त्यात पण जास्त पैसे मिळेनात म्हणून मग आणखी असले छोटे मोठे उद्योग करत बस. नवरा काय 9 वाजेपर्यंत पोचायचा नाही रात्री. पोचल्यावर लोकलच्या गर्दीचा सगळा राग बायको आणि पोरांवर. घरात ना कसला संवाद ना शांती. पोरांना इंग्लिश शाळेत टाकलं पण नाव सोडून त्यातही काही व

अनोळखी वाटेवर अनामिक व्यक्तीवर अव्यक्त प्रेम

Image
अनोळखी वाटेवर अनामिक व्यक्तीवर अव्यक्त प्रेम               तुला काय वाटेल या भीतीने                        माझं वाटणं विरून गेलं पाझर फुटण्याआधीच डोळ्यातलं                        पाणी झरून गेलं 'अनोळखी पणाच्या' ग्रहनाने                        चंद्र झोकाळून टाकला 'अनामिक पणाच्या' अंतराने                        बंधही जाळून टाकला अंधाराच्या गर्दीत माझं मंद                        टिमटीमनं मुरून गेलं कालांतराने पहाट झालीही,                         पण चांदणं सरून गेलं... आपल्या तारा जुळण्याआधी तुझे सुत जुळाले आपले बोलणे होण्याआधी गीत तुझे वळाले मला 'मी' नीटसा कळण्याआधी तुला प्रेम कळाले मावळतीच्या सुर्याइतके चित्र जलद पळाले... हातपाय मारण्या आधीच                          पाणी डोक्या वरून गेलं वाचला जीव त्यातूनही पण                          मन मात्र मरून गेलं कालांतराने पहाट झालीही,                           पण चांदणं सरून गेलं... तूच एकदा म्हणालीस, बोलला नाहीस ते आधी तूच सांग आता, खरचं आली का तशी वेळ कधी मला वाटलं एकदा, वेळ आली,... पण

"लवकर सेटल व्हायचंय?" मग नक्की वाचा.

Image
           "लवकर सेटल व्हायचंय?" मग नक्की वाचा.             [Sketch credit goes to a dear friend, Amol Bhosale(DSLR), who has amazing command over lines and he can put life into anything. Will always be grateful.☺]           दिवसेंदिवस मागे सरकून 'विमानतळाला' जागा करून देणाऱ्या 'केशसंभारा'वरून हात फिरवताना सहजच वृत्तपत्रातील त्या जाहिरातीवर लक्ष गेलं, "'well settle' असलेला मुलगा पाहिजे." लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या रणकुंडात उडी घेतली असल्याने तसा 'सेटल' होण्याशी अजून विशेष संबंध आला नव्हता. पण 'सेटल' होणे म्हणजे नक्की काय? या प्रश्नाने मात्र तेंव्हापासून अगदी पिच्छाच पुरवला.          माझे तेंव्हा engineering कॉलेजला admission झाले तेंव्हा शेजारचे काका म्हणाले होते, 'अरे या कॉलेज ला प्रवेश मिळाला म्हणजे तू आता सेटल झालास असेच समज.' म्हणजे 'कॉलेज ला प्रवेश मिळणे' हे सेटल होण्याचे पहिले परिमाण. टाटा मोटर्स ची नोकरी लागली तेंव्हा बरेच जण म्हणाले, 'एवढ्या नामांकित कंपनी मध्ये नोकरी लागली म्ह

MPSC राज्यसेवा मुलाखतीची तयारी: भाग 2

         MPSC राज्यसेवा मुलाखतीची तयारी: भाग 2 मुलाखत हा राज्यसेवेच्या प्रवासातील तिसरा आणि निर्णायक टप्पा. Mains च्या score ने तुम्ही final list मध्ये येणार की नाही हे ठरते तर तुमचा rank कोणता राहणार हे interview ने ठरते. फक्त interview मुळे post मिळालेली अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे जरी फक्त 100 मार्क्स साठी असला तरी interview अतिशय महत्वाचा आहे. संभाव्य चुका:          Mains पास होउनदेखील काही विद्यार्थी मुलाखतीचा म्हणावा तेवढा चांगला अभ्यास करत नाहीत किंवा त्याकडे थोडे दुर्लक्ष करतात याची दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे cutoff च्या खूप जवळ मार्क्स असणे आणि दुसरे म्हणजे cutoff पेक्षा खूप जास्त मार्क्स असणे.           ज्यांचे मार्क्स cutoff च्या जवळ असतात ते असा ग्रह करून घेतात की margin कमी असल्यामुळे आपल्याला पोस्ट मिळणार नाही. मग अभ्यास कशाला करायचा. मग अभ्यास नसल्याने आपसूकच मार्क्स कमी येतात. ज्याचें मार्क्स cutoff पेक्षा खूप जास्त असतात त्यांना आपल्याला कोणती ना कोणती post मिळणारच असं वाटून  complacency येण्याची शक्यता असते. त्यामुळे नकळत अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. Cuto

राज्यसेवा मुलाखतीची तयारी::भाग 1

                राज्यसेवा मुलाखतीची तयारी::भाग 1 MPSC राज्यसेवा MAINS ची ANSWER KEY आल्यामुळे बऱ्याच लोकांना मुलाखतीचे वेध लागले असतील. बरेच जण कसे प्रश्न विचारले जातात याबद्दल चौकशी करतात. म्हणून माझी आणि माझ्या काही अधिकारी मित्रांच्या INTERVIEW TRANSCRIPT इथे SHARE करत आहे. तसेच PROFILE मधील एखाद्या घटकाबद्दल कसे प्रश्न विचारू शकतील यासाठी एका घटकावर काढलेले काही प्रश्न देखील टाकतोय.  Nilam Bafna(DC) 1. 10 वी चे मार्क्स 2. 12 वी चे मार्क्स 3. Degree कुठून केली? कधी passout झाला? 4. Job पण केला का? कुठे? 5. Hobby काय आहे? 6. Extra curricular activities? 7. तुम्ही mechanical engineering केलंय तर Newton's first law of motion सांगा 8. 2nd, 3rd law सांगा 9. तिन्ही laws चे practical example सांगा 10.  3rd law चे example तुम्ही सांगितले पण याच संदर्भाने गांधीजींचे एक वाक्य माहिती आहे का? ते याला contradict करत नाही का? 11. What is satyagraha/Passive resistance? 12. सध्या Medical termination of pregnancy act बद्दल news आली होती. कोणत्या कोर्ट ने एका

तुझ्यावरचा राग

Image
                  तुझ्यावरचा राग         (Sketch Credit - Amol Bhosale, DSLR) कधी कधी सकाळीच तुझा प्रचंड राग येतो वागण्याचा विचित्र तुझ्या जीवघेणा त्रास होतो एखादेदिवाशी अचानक वेड्यासारखी वागतेस ऐकायचंच नाही कुणाचं ठरवूनच टाकतेस जेवढं समजवावं तेवढा पारा चढतो शहाणपणाच्या गोष्टींनी तिढा आणखी वाढतो तुझी आदळआपट आणि माझी चिडचिड माझी आरडाओरड आणि तुझी धुसमुस मी नाष्ता न करता तसाच तडक निघतो तुझ्या ताटातला नाश्ताही ताटातंच निवतो माझा राग तो गाडीच्या दारांवर निघतो तुझा मात्र माडीच्या पायऱ्यांवर सजतो नकोशी सकाळ जाते सरून तुझ्या चुका आठवत बांध तुझाही फुटतो तू कधीचा आलेली साठवत आतड्याला पीळ पडला कि मग येते आठवण तुझी 'हॉटेलात खाऊ' ची हौस पहिल्या घासात भागते माझी तेंव्हा मला जाण होते तुझ्या अगतिकतेची कळ उठते काळजात माझ्या अहंपणाची काय हवं असतं तिला? कधीतरी तिच्या हातच्या चवीची स्तुती कधी तिने उधळून टाकलेल्या प्रेमाची नुसती पोचपावती "दमली असशील" म्हणून नकळत पुढे झालेला पाण्याचा ग्लास वॉशिंग मशीन चं चालू केलेलं बटन, ऐकून तिचा दमता श्वास कधीतरी अचानक म

तिच्या घराचा ओटा: भाग 2

Image
                     तिच्या घराचा ओटा: भाग 2                        (Thank you Amol Bhosale(DSLR) for such a wonderful sketch. You make the article worth it.)         ओट्यावर झोपून होतो. आजूबाजूला पाडलेला वाळक्या पानांचा सडा दूर करावा एवढाही उत्साह नव्हता. सहा महिने बंद असलेल 'तिच्या' घराचं दार आजही बंद होतं. मातीत दिसणाऱ्या खुणांवरून कळत होतं की घर आता रिकामं नाही. साप, विंचू , पाली यांचा वावर असणार. एके दिवशी अगदी उशालाच चांगली तीन फूट कातण सापडली. पण बरंय, एकट असण्यापेक्षा सोबत बरी. सोडून जाणाऱ्या माणसांपेक्षा न मागता साथ देणारे प्राणी काय वाईट. आणि असाही मी तक्रार करण्यापलीकडे गेलो होतो.      दाढी वाढली होती, करायला वेळ नव्हता असं नाही. स्वतःच्याच दुःखाच्या तिव्रतेची स्वतःलाच जाणीव करून देण्याचा केविलवाणा प्रयत्न. रात्री जे लोक पाहायचे ते वेडाच म्हणायचे.  सुरुवातीला काही वेळा तर एका आजीबाईने जेवण आणून दिलं. हळू हळू कळलं लोकांना कि हे ते 'वेड' नव्हे. सकाळी ऑफिस ला गेल्यावर मात्र वैयक्तिक वेदनांची पुसटशी देखील खून नाही दिसायची. बरं वाटायचं. रात्री ऑफिस का

MPSC राज्यसेवा CSAT ची तयारी कशी करावी

      MPSC राज्यसेवा CSAT ची तयारी कशी करावी             मागच्या लेखात prelim च्या अभ्यासाचा overall आढावा घेऊन झाल्यावर आता CSAT च्या पेपर चे महत्व आणि त्यात जास्तीत जास्त मार्क्स कसे पाडता येतील, हे जसं मला समजलं तसं मांडायचा हा एक प्रयत्न. CSAT पेपर चे महत्व:-          एप्रिल 2017 मध्ये झालेल्या राज्यसेवा prelim चा cutoff अनपेक्षित रित्या वाढून 189 वर गेला. पण यात खूप आश्चर्य चकित होऊन चालणार नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांनी CSAT ला 130-150 दरम्यान मार्क मिळवले. त्यामुळे एकूण 200 चा टप्पा पार करणे त्यांना अवघड गेले नाही.           Prelim हि 400 मार्कांची असते. त्यात GS आणि CSAT दोन्हींना प्रत्येकी 200 गुण असतात. परंतु आपल्यापैकी किती जण जेवढा वेळ GS च्या तयारीला देतात तेवढाच CSAT ला देतात?? कोणीही नाही.           पाच पाच महिने prelim च्या GS चा अभ्यास करणारे विद्यार्थी CSAT कसेबसे 2 महिने करतात आणि तेही रोज एखादा तास. परीक्षा जवळ आली कि करू म्हणून CSAT नेहमी मागे ठेवले जाते. आणि मग जशी परीक्षा जवळ येते तसं TENSION वाढत जातं आणि मग विद्यार्थी GS वरचाच FOCUS वाढवतात आणि CS

तिच्या घराचा ओटा: भाग 1

Image
                      तिच्या घराचा ओटा: भाग 1                           (Sketch Credit - Amol Bhosale, DSLR)         आयुष्याची नवीन सुरूवात करत होतो. नवीन सुरूवात नविन घरात करायची असच दोघांनी ठरवलेलं. घर अगदी तिला हवं तसं बनवत होतो. समोर मोठा ओटा हवा होता तिला-संध्याकाळी बसायला आणि मुलांना खेळायला.  बसून राहिली होती दिवसभर ओटा बांधून होईपर्यंत. नुसता सूचनांचा भडीमार. गवंडी वैतागले होते तिला अक्षरशः. म्हणायची देवघर छोटं पण प्रसन्न असावं. मोठी परसबाग लावली तिने तिच्या हातानेच. सगळ्यांची नजर चुकवून यायची ती झाडे लावायला. मोगरा आणि निशिगंध तिच्या विशेष आवडीचा. मला मोठी झाडे आवडतात म्हणून तीही लावली तिने चारी कोपर्यावर. आणि त्यांच्या बाजूने बाकीची फुलझाडे. म्हणायची तुझ्या झाडाशेजारी माझी रोपटी कशी भराभर वाढतील आणि फुलतिल.           सगळ्या परसबागेत तिच्याच पावलांचे ठसे उमटले होते. मी कधी गेलो तरी ते पुसले जाणार नाही याची काळजी घ्यायचो. घराचं काम चालूच होतं. ती भिंतीवरून हात फिरवायची आणि हळवी व्हायची. सारखा आपला घर आपला घर चा जप चालायचा. ओल्या भिंतीवर हाताचे ठसे उमटवायची तिला भारी हौस.

डंख

                         डंख तुझीच म्हणत म्हणत दुसऱ्याची होताना ढगाआड लपत लपत चंद्र पाताळी जाताना तुझ्या पावलांचे ठसे उरतातच भल्या पहाटेच्या मंद चांदण्यासारखे तुझ्या प्रेमळ आश्वासनांचा खच पडलेला दिव्याभोवती मरून पडलेल्या चिलटांसारखा तुझ्या पोकळ काळजीचा शब्दसडा विस्कटलेला वादळाने उधळलेल्या वाळक्या कस्पटांसारखा                    तुझ्या आठवणींचा व्रण उरतोच                    अश्वत्थामाच्या भळभळत्या जखमेसारखा तुझ्या गोड हाकांचा गहिवर झालेला गाईपासून तुटलेल्या वासराच्या हंबरड्यासारखा तुझ्या हळव्या स्पर्शाचा ओरखडा झालेला काट्यांमध्ये अडकून फाटलेल्या पदरासारखा                    तुझ्यावरच्या मायेचा अंश राहतोच                    दगडाखाली गारव्याला बसलेल्या विंचवासारखा                                        डंख मारणारा.......

"राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तयारी कशी करावी"

Image
MPSC चे यावर्षीचे वेळापत्रक आल्याने आणि पूर्वपरीक्षा फेब्रूवारी महिन्यात असल्याने बऱ्याच लोकांचा मोर्चा परत prelim च्या अभ्यासाकडे वळाला असेल. तसेच prelim 4 महिन्यावर आली असल्याने पहिल्या attempt वाल्यांना तयारी बाबत अनेक प्रश्न पडत असतील तर त्यावर काही उत्तरे जशी मला माझ्या स्पर्धापरिक्षा प्रवासात समजली तशी देत आहे. Prelim चा अभ्यास कधी सुरु करावा?                ज्यांनी अगोदर Mains दिली आहे किंवा mains चा पूर्ण अभ्यास केला आहे त्यांच्यासाठी 3 महिने हा कालावधी prelim साठी पुरेसा आहे. परंतु ज्यांना अगोदर prelim मध्ये अपयश आलेले आहे त्यांनी आणि पहिला attempt असलेल्यांनी 4-5 महिन्याचा कालावधी राखून ठेवावा. कारण prelim पास न झाल्यास mains च्या अभ्यासाचा कसलाही फायदा नाही. म्हणून किती अभ्यास लागणार आहे त्याचा अंदाज नसेल तर लवकर सुरु करणे कधीही उत्तम. प्रत्येकाला स्वतःच्या वाचनाच्या गतीनुसार आणि अगोदर च्या अभ्यासाच्या अंदाजावर किती कालावधी लागणार हे ठरवावे लागेल. कोणत्या पेपर ला जास्त महत्व द्यावे?               खरे तर हा प्रश्नच पडू नये. जर प्रत्येक पेपर 200 मार्क ला असेल तर एकाला

संध्याकाळच्या गोष्ठी(१)

Image
                  संध्याकाळच्या गोष्ठी(१)                  SKETCH CREDIT: Amol Bhosale(Dy Superintendent of Land Records) पावसाचे काळे ढग दाटून आलेल्या आभाळासारखे डोळे भरून आले होते, अंधारून गेलं सगळं. ओघळणारा प्रत्येक अश्रू, काळ्या ढगातून लख:कन खाली येणाऱ्या विजेसारखा, जाळून टाकणारा. प्रत्येक अश्रू बरोबर एक एक आठवण गळून पडत होती. माझ्यातली ती हळू हळू विरून झडत होती. गालावरून ओघळणाऱ्या अश्रूंच्या स्पर्शात तिच्या सहवासाची उत्कट भावना परत आठवत होती. पण गम्मत बघा ना, बरं वाटण्याआधीच तो अश्रू गालावरून ओघळून मिसळून जायचा मातीत. समोर दिसायची मग फक्त रिकामी खुर्ची आणि चहाचा अर्धा संपलेला कप. सगळा चहा संपवण्या एवढाही वेळ नव्हता तिच्याकडे. अचानक वाटलं मीच बुडतोय त्या अर्ध्या राहिलेल्या चहात, पण ते पण धुसरच दिसायचं भरलेल्या जड पापण्याआडून. आणि मग अश्रूंचा महापूर. माझ्याच मरण्यावर माझ्याच डोळ्यांनी केलेल्या आक्रोशातून. थेंब थेंब ओघळणाऱ्या आठवणी खळखळ वाहू लागल्या, गढूळ ओढ्यासारख्या. या आठवसरींना उलट-सुलट फिरवून तडाखे देणारा वारा होताच. पावसा आधीच्या वावटळीत हेलकावे खाणारं कस्पट भिजून चिखला

पाऊस.. पडायचं विसरून गेलेला

Image
पाऊस.. पडायचं विसरून गेलेला    (Sketch credit-Amol Bhosale, Dy Superintendent of Land Records)       पाऊस.. पडायचं विसरून गेलेला       डोळ्यातला पूर ओसरून गेलेला ।। ढग येतात दाटून पण पांढरे फिक्कट गतप्राण डोळ्याचे तेजहीन बुब्बुळ जणू क्षितिजावरून येताना आशा आणणारा आईला पोटातल्या जिवाच्या पहिल्या चाहुलीसारखा पण तू आशेबरोबर पाणी आणायला विसरून गेलेला पुन्हा एकदा डोळ्यातला पूर ओसरून गेलेला ।।           कडाडणाऱ्या विजांचा प्रकोप           गडाडणाऱ्या ढगांचा प्रक्षोभ           लतातांडवात जाणारे जीव           छत्ररहितांची येणारी कीव सगळं क्षम्य होतं तू आणणाऱ्या अमृतासाठी तू मात्र आशेच्या किरणांवर ग्रहण पसरून गेलेला पुन्हा एकदा डोळ्यातला पूर ओसरून गेलेला ।। श्रावणात श्रावण पकडल्यासारखाच अडलास गणपतीत गणपतीसारखाच दीड दिवस पडलास हत्तीच्या नक्षत्रातसुद्धा रुसल्यासारखा वागलास आभाळाची माया,धरतीचा वसा सहज त्यागलास तरीही तुला बोल नाही लावला रे कोणी तू मात्र हुंदकेही ऐकायचे विसरून गेलेला पुन्हा एकदा डोळ्यातला पूर ओसरून गेलेला ।। हातातोंडाशी आलेलं पीक मात्र अवेळी घेऊन

I had a dream. Yours.

Image
                     I had a dream. Yours.            {Sketch credit-Amol Bhosale(Dy.                     Superintendent of Land Records)}            I had a dream. I have rehearsed it in my mind so many times.            I have a house at the foothills of the almighty Sahyadri. A single storey house. Surrounded by the trees, many and different-a few flowering ones. Because she loves them.            My wife goes to work, kissing me on the forehead. I stand in the balcony, waving to her as she closes the old rusted iron gate of our compound wall. As she gets out of sight, i get on with my pen and paper. For the whole day, I think, I imagine, I see and finally I write... alphabets, words, lines, pages, poems, stories, books.            Then the distant horizon becomes a shade of  yellow and orange. Even the waves washing the shore wear those shades.             I put my pen down though all the other processes are ON. Three cups of coffee. I have made them. I love doing it. I

तुझ्या आठवणीत भिजताना

Image
                     तुझ्या आठवणीत भिजताना                         ढग दाटून आले की तुझी किणकिणणारी पैंजणे आठवतात पाऊस आणणाऱ्या ढगांसारखी ती तुझ्या येण्याची चाहूल देतात    पावसाच्या कोसळणाऱ्या सरी पाहता                        तुझे ओलेचिंब केस आठवतात    खिडकीवर ओघळणाऱ्या सरींसारखे                        ते तुझ्या चेहऱ्यावर पसरतात    मग मी खिडकी उघडून काही धारा                        चेहऱ्यावर घ्यायचा प्रयत्न करतो    तू तुझ्या केसांमधील पाणी झटकून                          जागी करतीयेस असा भास होतो.                   मातीचा गंध तुझ्यासारखाच                   मोगरा धुंद तुझ्यासारखाच     खळखळतं पाणी तुझ्या                               खिदळण्याची याद आणतं      पानांवरचं टपोरं दव                               तुझ्या डोळ्यांनीच साद घालतं.      पावसानंतरचं कोवळं ऊन                               तुझ्या लटक्या रागासारखं असतं      डोळ्यात रागाचा आव असूनही                               गालावरचं हसू काही लपत नसतं                   वाऱ्याचा स्पर

"My Strategy" for MPSC State Services Mains- Amol Mandave(ACP/DYSP)

MPSC राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करताना जेवढा उत्साह असतो तेवढीच भीतीही असते. भविष्याच्या उत्तुंग स्वप्नांबरोबरच अनिश्चिततेची अंधारी झालर देखील असते. आपण प्रचंड उत्साहात आणि गतीने अभ्यास सुरु करतो. परंतु याचवेळी काही प्रश्न आणि शंका मनात घर करून बसलेल्या असतात. त्यापैकी काही  common  प्रश्नांची उत्तरे जशी मला माझ्या अभ्यासाच्या प्रवासात उमगली तशी सांगायचा एक प्रयत्न. Strategy: अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी अभ्यासक्रम आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका यांचा सखोल अभ्यास करणं अत्यावश्यक आहे. राज्यसेवची  preliminary परीक्षा जेवढी  unpredictable  आहे तितकीच मुख्य परीक्षा  predictable  आहे. मागील  5  वर्षांच्या प्रश्नपत्रिका नीट अभ्यासाल्या तरी  15-20%  अभ्यास पूर्ण होतो. आणि बाकीच्या अभ्यासाला दिशा मिळते ती वेगळी.            पुण्यातील विविध  classes  आणि  post-holders  यांनी अभ्यासक्रमातील सर्व घटकांवर पुस्तके काढून  sources  चा प्रश्न सोडवला असला तरी एकाच विषयाची अनेक पुस्तके उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो. आणि त्यांचा बराच वेळ कोणतं पुस्तक वाचावं याचा विचार करण्यातच जा