Posts

स्पर्धा परिक्षेची तयारी करताय, मग या गोष्टी टाळा:: भाग 4

© स्पर्धा परिक्षेची तयारी करताय, मग या गोष्टी टाळा:: भाग 4          आता झालेली पूर्वपरीक्षा व त्यामध्ये cutoff खूप जास्त जाईल अशी चर्चा. मग थोडेफार कमी मार्क्स पडलेल्या लोकांना पुढे काय करावे ते सुचतच नाही. तेंव्हा त्यांच्याकडून पुढे सांगितलेली चूक होऊ शकते. ते टाळण्यासाठी मार्गदर्शन करणारा हा लेख. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना टाळायच्या गोष्टी संदर्भातील लेखमालेतील चौथा लेख.       4. परीक्षेच्या एका टप्प्यावर अयशस्वी झाल्यावर फक्त त्याच टप्प्यावर लक्ष केंद्रित करणे:-          स्पर्धा परीक्षेच्या प्रक्रियेत अपयश येणे हे अतिशय साहजिक आहे. अपयश ही यशाची पायरी आहे हे वाक्य स्पर्धा परीक्षेच्या प्रवासाला तंतोतंत लागू पडते. त्यामुळे अपयश पचवणे आणि त्यातून यशाचा मार्ग बनवणे हे या प्रक्रियेचा एक अविभाज्य आणि अतिशय महत्वाचा असा भाग आहे.           परंतु बऱ्याचदा या प्रक्रियेत एका टप्प्यावर अपयश आले की विद्यार्थी त्याच टप्यावर सगळे लक्ष केंद्रित करतात आणि मग परीक्षेच्या इतर टप्प्यांवर आपोआप दुर्लक्ष होते. उदाहरणार्थ जर एक जण पूर्व परिक्षेतच उत्तीर्ण होत नसेल तर तो पुढची पूर्व परीक्षा येण

ऋतु

Image
ऋतु तसा प्रेमाचा कोणताही ऋतू नसतो तरी अवकाळी ढग आठवांना धुमारे आणतातच हवेतील गारवा वाढू लागला की तिच्या स्पर्शाची ऊब प्रकर्षाने आठवते नव्या पालवीची सळसळ ऐकून पैंजनाची किणकिण अजून ऐकू येते पहिल्या थेंबाबरोबर येणारा मातीचा गंध त्या गच्च मिठीच्या आठवणीत विरतो पावसासाठी झुरणारी रानपाखरं पाऊस आल्यावर पानांआड अंग चोरतात पळत येऊन मिठीत शिरणारी जणू ती स्पर्शाबरोबर लाजून आरक्त होणारी काळ्याभोर ढगांनी अंधारून येतं डोळे मिटून मग स्पर्शानेच पाहणं होतं  कोसळणाऱ्या आभाळाला न जुमानता  स्वप्नांचे इमले च्या इमले उभे राहतात पण कडाडणाऱ्या विजांची नजर लागतेच गारांबरोबर स्वप्नांचे इमलेही कोसळतात पाऊस संपता संपता गारवा संपतो उरते नुसती धग, कासावीस करणारी या पावसात जन्मलेली गवताची पाती अंकुरतात, फुलतात, टिकून राहतात तुझ्यामाझ्यातल्या अंतराला न जुमानता जिवंत असणाऱ्या आंतरिक ओढीसारखी           -©अमोल मांडवे(DYSP/ACP)

लेखणीग्रस्त

Image
    लेखणीग्रस्त जुन्या कवितांनी अलवार माझाच खून केला नव्या कवितेचा उमाळा आतच जळून गेला पहिल्या कवितेने प्रेमवीर केलं       दुसऱ्या कवितेने जणू सर्वस्व नेलं तिसऱ्यात तर झाली अब्रुची लक्तरे   पेन ठेवतो, हाती पांढरं निशाण आलं प्रत्येक कवितेला हवीच का नायिका?    दरवेळी मीच ती जगायला हवीय का? वाचणाऱ्याच्या एखाद्या शाबासकीसाठी    दरवेळी बळी मी जायलाच हवाय का? नागड्या चेहऱ्याने वावरलो आजवर, परि माझ्या अभिव्यक्तीचे मुखवटे जड जाहले कवितांच्या थारोळ्यात रक्तबंबाळ नि सुन्न मी ते रुधिरही काहींनी रंग म्हणूनी फासले कवितेचे कागद फाडून टाकले तरी ठिगळ कसं लागायचं चारित्र्याचं फुटलेलं आभाळ शब्दांनी कसं सांधायचं. माझ्यातले उरलेले "मी" पण लटकवावे फासावर की, माझ्यांनीच माझ्या "मी" चे गळे आवळलेलं पहायचं.                          -अमोल मांडवे(DYSP/ACP)

CSAT प्रत्यक्ष पेपरच्या 2 तासांचे नियोजन

Image
            CSAT प्रत्यक्ष पेपरच्या 2 तासांचे नियोजन                           अगदी 100% विद्यार्थी मन लाऊन अभ्यास करत नसले तरी 70-80% तरी अगदी मन लाऊन अभ्यास करतात. सगळा syllabus पूर्ण करतात, अगदी काही लोकांची तर पुस्तकं च्या पुस्तकं पाठ असतात. काहीही विचारा उत्तरं त्यांच्या जिभेवर असतात. एक एक विषय दहा-दहा, पंधरा-पंधरा वेळा वाचलेले लोकं असतात. परीक्षा पास होण्यासाठी लागतो त्याच्या कित्येक पट जास्त अभ्यास झालेला असतो अनेकांचा. पण एवढं सगळं असून यातील बरेच जण अंतिम यादीत मात्र नसतात. पूर्व परीक्षेचा पहिला टप्पाच अनेकांना अनेक वर्षे पार करता येत नाही.           काय चुकते नक्की? अभ्यास कमी असतो का? की गरजेपेक्षा जास्त अभ्यास होतो? की केलेल्या अभ्यासाचा योग्य वापर करायचे चुकते? की परीक्षेच्या वेळच्या तणावामुळे अडचणी येतात? परीक्षेची आणि निकालाची भीती इथे प्रॉब्लेम करून जाते का? की ऐन वेळी वेळेचे गणित चुकते? की गोंधळ उडतो अनेक गोष्टी एका वेळी सांभाळता सांभाळता?           यातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे लपली आहेत तुम्ही परीक्षेचा दिवस आणि परीक्षेचे दोन अधिक दोन असे चार तास

स्पर्धा परिक्षेची तयारी करताय, मग या गोष्टी टाळा: भाग 3

स्पर्धा परिक्षेची तयारी करताय, मग या गोष्टी टाळा:  भाग 3          स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यात प्रत्यक्षात यशस्वी होणाऱ्यांची संख्या पाहता 1000 जणांत 1 जण यशस्वी होतो. यशाची आणि अपयशाची कारणे व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असतात परंतु काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या आणि यशाचा मध्ये अडथळा निर्माण करू शकतील किंवा आपले यश लांबवू शकतील. म्हणून स्पर्धा परीक्षेची तयारी करताना काही गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. तशा काही गोष्टींचा हा उहापोह करण्यासाठी एक नवीन लेखांची मालिका लिहित आहे.            त्या मालिकेतील हा तिसरा लेख. राज्यसेवेच्या जाहिरातीत यावर्षी असलेल्या कमी जागा, न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असल्याने काही गोष्टींबाबतची अनिश्चितता या एकूण पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे अभ्यासावरून लक्ष विचलित होण्याची शक्यता असते. प्रचंड स्पर्धेच्या क्षेत्रात असे थोडेसे Diversion खूप नुकसानकारक ठरू शकतो म्हणून अशा गोष्टींबाबतचा हा लेख. 3. जे आपल्या नियंत्रणात नाही त्या गोष्टींचा खूप विचार करत बसणे.            स्पर्धा परीक्षा म्हटले की अनेक बाबी, अनेक पैलू

स्पर्धा परिक्षेची तयारी करताय, मग या गोष्टी टाळा: भाग 2

Image
स्पर्धा परिक्षेची तयारी करताय, मग या गोष्टी टाळा:  भाग 2          स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यात प्रत्यक्षात यशस्वी होणाऱ्यांची संख्या पाहता 1000 जणांत 1 जण यशस्वी होतो. यशाची आणि अपयशाची कारणे व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असतात परंतु काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या आणि यशाचा मध्ये अडथळा निर्माण करू शकतील किंवा आपले यश लांबवू शकतील. म्हणून स्पर्धा परीक्षेची तयारी करताना काही गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. तशा काही गोष्टींचा हा उहापोह करण्यासाठी एक नवीन लेखांची मालिका लिहित आहे.            त्या मालिकेतला हा दुसरा लेख. राज्यसेवेची मुख्यपरीक्षा समोर असताना विद्यार्थ्यांचे 100% लक्ष अभ्यासावर असले पाहिजे. तसेच सकारात्मकता या टप्प्यावर खूप महत्वाची आहे. त्यादृष्टीने अभ्यासाच्या प्रक्रियेतील काही गोष्टींवर टाकलेला हा प्रकाशझोत. 2. Negative बोलणे, आपण कसा कमी अभ्यास करतो हे लोकांना पटवून देत बसणे:-           'तुम्ही जसा विचार करता तसे बनता' असे गांधीजी म्हणाले होते. आपल्याला प्रत्येकाला असा अनुभव येतंच असतो.            स्पर्धापरिक्षांच्या

माझिया प्रियाला

Image
माझिया प्रियाला,         सुरुवात कशाने करावी ठरवताना अडखळलो म्हणून हा पत्राचा अट्टाहास, पण सुरुवात कुठून करावी हा ही गहन प्रश्नच. एरवी एवढा नसतो अडखळलो पण तुझ्याबाबतीत उगीचच विचार कंप पावतात.         तुला काय वाटेल हे माहिती नसताना पत्र लिहितोय आणि त्यात पुन्हा तुझ्या नावापुढं 'माझिया' वापरतोय, रागावू नकोस. शब्द कदाचित चुकतील, पण तू भावना समजून घे. त्रयस्थाच्या नजरेने सुरुवातीला पूर्ण पत्र वाचून काढ. कदाचित स्वतः म्हणून वाचायला गेलीस तर विचारांचा गोंधळ उडेल आणि कदाचित पूर्ण पत्रावर तुझं लक्षच नाही राहणार. इतक्या सुचनांबद्दल परत रागावू नकोस कारण पुढचं सगळं खूप नाजूक आहे. प्रत्येक शब्द जिवाच्या मोलाचा आहे, आत्ता फक्त माझ्या आणि काही वेळानंतर कदाचित तुझ्याही.  sketch credit to dearest friend Amol Bhosale(DSLR)          सरळच सांगायचं तर, 'माझं प्रत्येक स्वप्न तुझ्याभोवती गुंफलय, माझा प्रत्येक श्वास तुझ्या श्वासात घुटमळतोय. माझ्या प्रत्येक पावलाचा ठसा तुझ्या हळुवार पावलांना अलगद उचलायला आसुसलेला आहे. तुझी स्वप्ने पाहताना मला डोळे बंद करावे लागत नाहीत. तुझी आठवण याय

स्पर्धा परिक्षेची तयारी करताय, मग या गोष्टी टाळा : भाग 1

स्पर्धा परिक्षेची तयारी करताय, मग या गोष्टी टाळा: भाग 1          स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यात प्रत्यक्षात यशस्वी होणाऱ्यांची संख्या पाहता 1000 जणांत 1 जण यशस्वी होतो. यशाची आणि अपयशाची कारणे व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असतात परंतु काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या आणि यशाचा मध्ये अडथळा निर्माण करू शकतील किंवा आपले यश लांबवू शकतील. म्हणून स्पर्धा परीक्षेची तयारी करताना काही गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. तशा काही गोष्टींचा हा उहापोह करण्यासाठी एक नवीन लेखांची मालिका लिहित आहे.           या लेखांच्या मालिकेतला हा पहिला लेख. असे एका लेखामध्ये एक किंवा दोन गोष्टींवर चर्चा होईल. नजीकच्या काळात परीक्षेचा कोणता टप्पा जवळ आहे त्यानुसार या बाबींचा क्रम ठरविला आहे. मुख्य परीक्षेचा अपेक्षित असलेला निकाल व मुलाखतीची तयारी अशा वेळीची विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन लिहिलेला लेख. 1. मुख्यपरिक्षेच्या Key नुसार येणाऱ्या मार्कांवरून पोस्ट मिळणार की नाही, कोणती मिळू शकते याची गणिते मांडत बसणे-          मुख्य परीक्षा झाली की लगेच आयोगाची answer key येते आणि

पहिला पाऊस, पहिलं प्रेम आणि पहिला स्पर्श

Image
           पहिला पाऊस, पहिलं प्रेम आणि पहिला स्पर्श.                                   (प्रास्ताविक: प्रस्तुत लेखामध्ये दोन कथांचे समांतर सादरीकरण केले आहे. एकी मध्ये जमिनीला ढगाबद्दल वाटणारी ओढ, तर दुसरीमध्ये मुलाचे एका मुलीवरील प्रेम दाखवले आहे. जमिनीच्या आणि मुलाच्या, दोघांच्या भावनांतील सारखेपणा दाखवण्यासाठी, दोघांकरिता एकाच अर्थाची दोन वेगवेगळी वाक्ये वापरली आहेत. 'ती' हे जमिनीसाठी आणि 'तो' हे मुलासाठी वापरले आहे.)         'ती' झाडांच्या वाळक्या आणि गळक्या पानांचा आश्रय घेत होती, आणि 'तो' पेन आणि कागदाचा.          'ति'ला ग्रीष्माच्या दाहकतेची पर्वा नव्हती, पण 'ति'ला त्या ढगाचा विरह सहन होत नव्हता. 'ती' त्याच्याकडे आशाळभूत नजरेने याचना करीत होती, काही थेंबांची. पण तो त्याच्या असंख्य थेंबरूपी नेत्रातून फक्त अहंकारी कटाक्ष टाकत होता, 'ति'च्याकडे. त्याच्याजवळच्या असंख्य थेंबापैकी काही 'ति'ला हवे होते, कारण भाळली होती 'ती' त्याच्यावर. कित्येक दिवस तिष्ठत होती, त्याची वाट बघत. पण एवढाच तिटक

तू घरी नव्हतास म्हणून.....

Image
              तू घरी नव्हतास म्हणून......                Sketch credit: Amol Bhosale(DSLR) तू घरी नव्हतास म्हणून                     मग भिजले पावसात अंगांगावरून ओघळणारा                     तुझा स्पर्श आठवत ओठांवरच्या थेंबांना                     तुझ्या ओठांची सर नाही पण ओठांवरून मानेवर मात्र                     पाऊस तुझ्यासारखाच उतरतो थंडगार पावसात वाऱ्याची                      झुळूकही उष्ण जाणवते खांद्यांवर विसवणाऱ्या                       तुझ्या फुलत्या श्वासांसारखी भिजल्या मातीच्या गंधाला                       तुझ्या गंधाची सर नाही पदरावरून कमरेवर मात्र                       पाऊस तुझ्यासारखाच दरवळतो पैंजनावरचे थेंब                     हळुवार पायावर उतरतात केसांमधले थेंब खट्याळ,                     पाठीवर खेळत बसतात पावसाच्या वाढत्या जोराला                     तुझी सर नाही ओसरता पाऊस मात्र तुझ्यासारखाच                     माझ्या मिठीत मुरत जातो                       -अमोल मांडवे(DYSP)                  

जायचं का परत खेड्याकडे?

                    जायचं का परत खेड्याकडे? दोन्ही जावई आज टीव्ही वर झळकले पण सासऱ्यांच्या जीव मात्र नखात आला. एकीकडं एका जावयाने कांद्याचं विक्रमी उत्पन्न काढलं म्हणून सरकारकडून बक्षीस मिळालं तर दुसरा जावई एल्फिन्स्टन ला झालेल्या चेंगराचेंगरीतून जेमतेम वाचला. पोरीनं बसून खावं म्हणून तिला मुंबईला कामाला असलेला मुलगा पहिला. दुसरीला मात्र नाईलाजास्तव एका शेतकऱ्याला दिली ते पण तिला काम करावं लागणार नाही या बोलीवर.            पहिली जिला सुखात राहावी म्हणून मुंबईत दिली तिचं काही नवऱ्याच्या पगारात भागेना. पगार चांगला होता आणि वेळच्या वेळी वाढत पण होता पण महागाई काय जवळ येऊ देत नव्हती. नवरा 6 ची ट्रेन पकडतो म्हणून हिची धावपळ 5 पासूनच. धावपळ करूनदेखील काही ताजे नव्हतेच मिळत खायला. गटारावरच्याच भाज्या. पगारात भागत नाय म्हणून मग शिवण मशीन. त्यात पण जास्त पैसे मिळेनात म्हणून मग आणखी असले छोटे मोठे उद्योग करत बस. नवरा काय 9 वाजेपर्यंत पोचायचा नाही रात्री. पोचल्यावर लोकलच्या गर्दीचा सगळा राग बायको आणि पोरांवर. घरात ना कसला संवाद ना शांती. पोरांना इंग्लिश शाळेत टाकलं पण नाव सोडून त्यातही काही व

अनोळखी वाटेवर अनामिक व्यक्तीवर अव्यक्त प्रेम

Image
अनोळखी वाटेवर अनामिक व्यक्तीवर अव्यक्त प्रेम               तुला काय वाटेल या भीतीने                        माझं वाटणं विरून गेलं पाझर फुटण्याआधीच डोळ्यातलं                        पाणी झरून गेलं 'अनोळखी पणाच्या' ग्रहनाने                        चंद्र झोकाळून टाकला 'अनामिक पणाच्या' अंतराने                        बंधही जाळून टाकला अंधाराच्या गर्दीत माझं मंद                        टिमटीमनं मुरून गेलं कालांतराने पहाट झालीही,                         पण चांदणं सरून गेलं... आपल्या तारा जुळण्याआधी तुझे सुत जुळाले आपले बोलणे होण्याआधी गीत तुझे वळाले मला 'मी' नीटसा कळण्याआधी तुला प्रेम कळाले मावळतीच्या सुर्याइतके चित्र जलद पळाले... हातपाय मारण्या आधीच                          पाणी डोक्या वरून गेलं वाचला जीव त्यातूनही पण                          मन मात्र मरून गेलं कालांतराने पहाट झालीही,                           पण चांदणं सरून गेलं... तूच एकदा म्हणालीस, बोलला नाहीस ते आधी तूच सांग आता, खरचं आली का तशी वेळ कधी मला वाटलं एकदा, वेळ आली,... पण

"लवकर सेटल व्हायचंय?" मग नक्की वाचा.

Image
           "लवकर सेटल व्हायचंय?" मग नक्की वाचा.             [Sketch credit goes to a dear friend, Amol Bhosale(DSLR), who has amazing command over lines and he can put life into anything. Will always be grateful.☺]           दिवसेंदिवस मागे सरकून 'विमानतळाला' जागा करून देणाऱ्या 'केशसंभारा'वरून हात फिरवताना सहजच वृत्तपत्रातील त्या जाहिरातीवर लक्ष गेलं, "'well settle' असलेला मुलगा पाहिजे." लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या रणकुंडात उडी घेतली असल्याने तसा 'सेटल' होण्याशी अजून विशेष संबंध आला नव्हता. पण 'सेटल' होणे म्हणजे नक्की काय? या प्रश्नाने मात्र तेंव्हापासून अगदी पिच्छाच पुरवला.          माझे तेंव्हा engineering कॉलेजला admission झाले तेंव्हा शेजारचे काका म्हणाले होते, 'अरे या कॉलेज ला प्रवेश मिळाला म्हणजे तू आता सेटल झालास असेच समज.' म्हणजे 'कॉलेज ला प्रवेश मिळणे' हे सेटल होण्याचे पहिले परिमाण. टाटा मोटर्स ची नोकरी लागली तेंव्हा बरेच जण म्हणाले, 'एवढ्या नामांकित कंपनी मध्ये नोकरी लागली म्ह

MPSC राज्यसेवा मुलाखतीची तयारी: भाग 2

         MPSC राज्यसेवा मुलाखतीची तयारी: भाग 2 मुलाखत हा राज्यसेवेच्या प्रवासातील तिसरा आणि निर्णायक टप्पा. Mains च्या score ने तुम्ही final list मध्ये येणार की नाही हे ठरते तर तुमचा rank कोणता राहणार हे interview ने ठरते. फक्त interview मुळे post मिळालेली अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे जरी फक्त 100 मार्क्स साठी असला तरी interview अतिशय महत्वाचा आहे. संभाव्य चुका:          Mains पास होउनदेखील काही विद्यार्थी मुलाखतीचा म्हणावा तेवढा चांगला अभ्यास करत नाहीत किंवा त्याकडे थोडे दुर्लक्ष करतात याची दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे cutoff च्या खूप जवळ मार्क्स असणे आणि दुसरे म्हणजे cutoff पेक्षा खूप जास्त मार्क्स असणे.           ज्यांचे मार्क्स cutoff च्या जवळ असतात ते असा ग्रह करून घेतात की margin कमी असल्यामुळे आपल्याला पोस्ट मिळणार नाही. मग अभ्यास कशाला करायचा. मग अभ्यास नसल्याने आपसूकच मार्क्स कमी येतात. ज्याचें मार्क्स cutoff पेक्षा खूप जास्त असतात त्यांना आपल्याला कोणती ना कोणती post मिळणारच असं वाटून  complacency येण्याची शक्यता असते. त्यामुळे नकळत अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. Cuto